मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रोज कोरोनाची नवीन प्रकरणं नोंदवली जात आहे. अशातच आता एप्रिल महिना, मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पहातां या महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात. बरेच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर घरातील पालक कोरोनाग्रस्त आहेत. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांची ही मागणी आहे. भविष्य मोलाचे पण जीव अनमोल विचार व्हावा, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
इयत्ता ९वी व १०वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले परंतु या परीक्षा देत असतांना राज्यातील अनेक अंध विद्यार्थ्यांसमोर अडचणी उदभवल्या आहेत ज्याकडे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू गायकवाड यांनी कृपया लक्ष द्यावे, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.
चित्रा वाघ यांनी पुढील समस्याही लक्षात आणून दिल्या आहेत:
अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देताना लेखनिक सहाय करतात शिक्षणमंत्र्यांनी १८मार्च २०२१ ला लावलेल्या झूम मिटींगमध्ये आम्ही लेथनिक देऊ असे म्हंटलेले पण लेखनिक संदर्भात हेल्पलाईन वेबसाईटवर कुठेही दिसत नाही, असेही चित्रा वाघ यांनी शिक्षणमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे.
- अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील शहरात शिक्षणासाठी येऊन समाजकल्याण विभाग शासकीय वसतीगृहात रहातात पण वसतीगृह अजून सुरू झालेले नाही.
- अशा परिस्थितीत हे अंध विद्यार्थी रहाणार तरी कुठे परिक्षा देणार तरी कशी ?? यासाठी लोकल स्तरावर परीक्षाकेंद्र आयोजित व्हावे याबाबत ही झुम मिटींग मध्ये चर्चा झालेली परंतु अद्याप परीक्षाकेंद्र बदलून देण्यासाठी राज्य किंवा विभागीय मंडळाने कुठला कक्ष नेमलाय का?
- असेल तर परीक्षाकेंद्र बदलून मिळण्याची प्रक्रीया काय हे स्पष्टपणे सांगणे गरजेचे
- मिटींग मध्ये ज्या अधिकाऱ्यांचे नंबर दिले गेले ते मिटींगनंतर अंध विद्यार्थी संघटना महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचे फोनही उचलत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पहातां या महिन्यात होणार्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात
बरेच विद्यार्थी कोरोना +ve आहेत तर घरातील पालक कोरोनाग्रस्त आहेत
मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांची हि मागणी आहे
भविष्य मोलाचे पण जीव अनमोलविचार व्हावा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/8KxzIsZORu
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 8, 2021