मुक्तपीठ टीम
मुंबईतील साकीनाका परिसरात अमानुष अत्याचार झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतापाचा भडका उडाला आहे. भीम आर्मीनं निदर्शने सुरु केली आहेत. राजावाडी रुग्णालयात पोहचलेल्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना भावना आवरणं कठिण झालं. त्यांनी अश्रुला मोकळी वाट करून देतानाच आघाडी सरकारविरोधातील संतापाला मोकळी वाट करुन दिली. शिवसेनेच्या नेत्या, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही संताप व्यक्त केला आहे.
चित्रा वाघांच्या डोळ्यात अश्रू आणि मुखी अंगार!
- खरंतर मी आता निशब्द झाले, माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्द नाहीत.
- ज्या पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाला, तो राक्षसी होता.
- मी डॉक्टरांशी आता बोलले, मी तिला त्या ठिकाणी बघून आले अक्षरश: तिचे आतडे कापले गेले.
- तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला.
- ज्या पद्धतीमध्ये हे अत्याचार चालले ते कुठेतरी थांबायला पाहिजे.
- आता आमचे शब्द संपले. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये.
आठ दिवसता किती अत्याचार…
- गेल्या आठ दिवसांमध्ये आपण बघतोय किती अत्याचार झालेत.
- साडे तेरा वर्षाच्या मुलीवर ठाण्यासारख्या ठिकाणी अत्याचार झाले.
आज सकाळीच अमरावतीमध्ये एका सतरा वर्षाच्या मुलीवर - बलात्कार झाला, सात महिन्यांची गर्भवती मुलगी तिने स्वतःला संपवून टाकलं.
आपण काहीच करू शकलो नाहीत!
- साकीनाक्यातील महिला मृत्यूशी झुंज देत होती आणि आता तर तुम्ही तिला बघितलं, आपण काही करू शकलो नाही आहोत.
- आम्ही अलीकडे पलीकडे काही चालू शकले नाही आणि याच पद्धतीने त्याच्यामध्ये पद्धतीने या महिलेला मारले गेले ज्या पद्धतीने या महिलेवर अत्याचार झालेला आहे हे निश्चितपणे एका माणसाचे काम नाही.
ठाकरे-पवारांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही!
- राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही.
- त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही.
- अत्याचाराच्या या घटना थांबवण्यासाठी महिला अॅट्रोसिटी कायदा आणायला हवा, ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांवर अन्यायासाठी कायदा आहे, तसाच महिला अॅट्रोसिटीचा कायदा आणा, त्यासाठी कमिट्या स्थापन करा.
साकीनाक्यात महिलेवर अमानुष अत्याचार
- मुंबईतील साकीनाका परिसरात अमानुष अत्याचार झालेल्या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
- या महिलेवर अत्याचार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता.
- तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते.
तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. - पोलिसांनी नराधम आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
- मुंबईच्या साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना १० सप्टेंबरला समोर आली.
- साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना ९ सप्टेंबरच्या रात्री घडली.
- आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं.
- या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. मुंबईतील घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबरला) घडली.
- या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
- तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
साकीनाका खैरानी रोड येथे काल रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबईच्या साकीनाका भागात अमानुष अत्याचार झालेल्या महिलेचा मृत्यू! संतापाचा भडका!!