मुक्तपीठ टीम
चीनचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शी जिनपिंग यांच्या कठोर कोरोना उपायांच्या निषेधार्थ आता लोक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभर निषेध करत आहेत. शी जिनपिंग हे पहिले चीनचे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत ज्यांना चिनी जनतेने पायउतार होण्यास सांगितले आहे.
जिनपिंग यांना जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही चीनमधील जनता अनेक मुद्द्यांवर शी जिनपिंग यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. या वेळी नागरिकांसह विद्यार्थीही रस्त्यावर उतरून शी जिनपिंग यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
“राजीनामा द्या, शी जिनपिंग! सत्ता सोडा, कम्युनिस्ट पक्ष!” चिनी जनतेचा रस्त्यावर उतरून रोष!
- कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाची एकपक्षीय राजवट संपवण्याची मागणीही लोकांनी केली आहे.
- रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी “राजीनामा द्या, शी जिनपिंग! सत्ता सोडा, कम्युनिस्ट पक्ष!” अशा घोषणा दिल्या आहेत.
- चीनच्या जनतेने त्यांना आजीवन शासक नको, असेही सांगितले.
- ते म्हणाले असा शासक आम्हाला नको आहे.
- कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना लोकांवर आपली पकड नीट राखू शकत नाही आणि लोकांच्या संतापाचे मुख्य कारण म्हणजे कोरोना साथीला योग्य प्रकारे न हाताळणे.
बीजिंगमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर आक्रमक!
- बीजिंगमधील सिंघुआ विद्यापीठात विद्यार्थी शी जिनपिंग आणि सीसीपी सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत.
- लोकशाही आणि कायद्याचे राज्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा घोषणा देत आहेत.
- शी जिनपिंगच्या विरोधात मोठ्या संख्येने तरुण शांघाय, वुहान, उरुमकी, चेंगडू आणि ग्वांगझूच्या रस्त्यावर उतरून संपूर्ण चीनमध्ये अशाच प्रकारचे निषेध करत आहेत.
लॉकडाऊनमुळे लोकांच्या रोजीरोटीचे नुकसान…
- शी जिनपिंग यांची झीरो कोरोना पॉलिसी कोरोना रोगाला आवर घालण्यात अयशस्वी ठरली आहे.
- जनतेचे स्वातंत्र्य, आरोग्य आणि उपजीविकेला हानी पोहोचली आहे, असा जनतेचा आग्रह आहे.
- चीन लॉकडाऊन आणि प्रवासी निर्बंधांसह कठोर निर्बंधांचे पालन करत आहे.
राजकीय बंड होण्याची शक्यता…
- सध्याची परिस्थिती पाहता शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची जनतेची मागणी असाधारण आहे.
- त्यामुळे राजकीय सत्तापालट होऊ शकतो.
- चीनमधील सध्याच्या परिस्थितीचा परिणाम सीसीपी नेते आणि शी जिनपिंग यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून राजकीय सत्तापालट होण्याची शक्यता आहे.