मुक्तपीठ टीम
एकीकडे लडाखच्या सीमेवर आपले सैन्य चीनशी लढत आहेत, तर दुसरीकडे चीनचे आव्हान देशामध्येही उभे आहे. सीमेवर लष्कर तर देशात आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यात चीन गुंतला आहे. ईडीच्या तपासानंतर अशाच सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. ईडीच्या तपासात ही बाब समोर आली आहे की, मोबाईल अॅपच्या माध्यमातून चीन भारताचे आर्थिकदृष्ट्याही प्रचंड नुकसान करत आहे. ईडीला कर्ज, सट्टेबाजी आणि डेटिंगशी संबंधित १०० हून अधिक चिनी अॅप सापडले आहेत, ज्याद्वारे चीनने हजारो कोटी रुपयांची कमाई केली आहे.
ईडीच्या तपासात धक्कादायक बाब उघड!!
- तपासादरम्यान, ईडीला कर्ज, सट्टेबाजी आणि डेटिंगशी संबंधित १०० हून अधिक अॅप सापडले आहेत, जे चीनमधून नियंत्रित आहेत.
- केवळ सट्टेबाजी अॅपद्वारे १ हजार ३०० कोटी रुपये कमावल्याचे सांगण्यात येत आहे.
- काही चिनी नागरिकांनी बेकायदेशीरपणे अनेक भारतीय कंपन्या स्थापन केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
- या कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटींचा महसूल जमा झाला.
- मग हे पैसे भारत सरकारपासून लपवून चीनला नेले.
- चार्टर्ड अकाउंटंटच्या मदतीने हे चीनी नागरिक हेराफेरी करत आहेत.
- सुरुवातीला डमी भारतीय संचालकांचा वापर करून कंपन्या तयार केल्या जातात,काही काळानंतर चिनी नागरिक भारतात येतात आणि या कंपन्यांमध्ये संचालक होतात आणि मग त्यांचा खेळ सुरू करतात.
भारतीयांचाही यात सहभाग!
- अंमलबजावणी संचालनालयाने HSBC बँकेतील दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये अवैध पैसे ट्रांसफरसाठी चिनी सट्टेबाजी आणि डेटिंग अॅपशी जोडलेल्या ४७ कोटी रुपये गोठवले होते.
- यानंतर ईडीने व्यवहारांची एफआययू (फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट) कडे तक्रार केली नसल्याने पेटीएम, कॅशफ्री आणि रेझरपे यासह अनेक पेमेंट गेटवेवर लक्ष केंद्रित केले.
- या दरम्यान गेल्या आठवड्यात इन वॉलेट्समधून १७ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.
- ही रक्कम कथितपणे चायना लोन अॅप आणि संबंधित संस्थांच्या मालकांची असल्याचे सांगण्यात आले.
- हे अॅप्स भारतातील खंडणीमध्येही सामील आहेत. तपासादरम्यान असे आढळून आले की, भारतीय नागरिकही यामध्ये सामील आहेत आणि त्यांना बँक आणि व्यवसाय खाते उघडण्याच्या उद्देशाने ठेवले जाते.