मुक्तपीठ टीम
चीनकडून पुन्हा एकदा तैवानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलाय. चीनचं एक फायटर जेट तैवानच्या दक्षिण पश्चिम हवाई संरक्षण क्षेत्रात दाखल झाल्याची माहिती मिळतेय. उल्लेखनीय म्हणजे,चीनकडून या महिन्यात बारा वेळा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलाय. चीनला प्रत्यूत्तर देताना तैवाननं आपली विमानं धाडली, रेडिओ इशारे दिले तसंच एअर डिफेन्स मिसाईल सिस्टमही तैनात केलं.
बीजिंगचा तैवानवर आपला हक्क असल्याचा दावा…
- एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक लढाऊ विमानाची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलरद्वारे त्याच्या ओळखीसह प्रदान केली जाते.
- या महिन्यात आतापर्यंत या संरक्षण क्षेत्रात चीनच्या ३८ विमानांचा मागोवा घेण्यात आला आहे.
- त्यापैकी जवळपास २६ लढाऊ विमाने, नऊ स्पोर्ट प्लेन आणि तीन हेलिकॉप्टर होते.
- विशेष म्हणजे, बीजिंग तैवानवर आपला हक्क सांगत आहे.
- तैवानमध्ये सुमारे अडीच कोटी लोक राहतात.
- चीन तैवानमध्ये राहणाऱ्या या लोकांना आपले नागरिक मानतो आणि तैवान आपल्या मुख्य भूभागाचा भाग मानतो.
याबाबत तो खूप आक्रमकही आहे.
हिवाळी ऑलिम्पिकदरम्यान चीनकडून हवाई हद्दीचे उल्लंघन झाले नाही…
- तैवानला त्याच्या मुख्य भूमीशी जोडण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचे चीनचे अध्यक्ष वारंवार बोलले आहेत.
- याबाबत त्यांनी थेट धमकीही दिली आहे.
- बीजिंगमध्ये जोपर्यंत हिवाळी ऑलिम्पिक खेळ सुरू होते, तोपर्यंत चीनच्या लढाऊ विमानांनी एकदाही तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले नाही, हेही येथे नमूद करणे आवश्यक आहे.
- परंतु या खेळांच्या समाप्तीपासून, त्याची लढाऊ विमाने दररोज तैवानच्या एअर डिफेन्स झोनमध्ये प्रवेश करत आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने तैवानचे अनेक धोरणात्मक करार
- विशेष म्हणजे, तैवान सात दशकांपासून चीनच्या मुख्य भूभाग वेगळे आहे.
- चीनच्या चुकीच्या कारवाया पाहता, तैवानने आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक करार केले आहेत.
- यामध्ये अमेरिकेसोबत केलेल्या कराराचा समावेश आहे. चीनकडून तैवानच्या हवाई सीमा उल्लंघनाबाबत अमेरिका सातत्याने चुकीचे चित्रण करत आहे.
- या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन अनेकदा आमनेसामने आले आहेत.
- एवढेच नाही तर चीनला पाहता अमेरिकेने या भागात आपली विमानवाहू नौकाही तैनात केली आहे.