मुक्तपीठ टीम
गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण हा चीनमध्ये आढळला होता. चीनच्या वुहाण या शहरातून कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळला. पण त्याची उत्पत्ती कुठे झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. चीनकडून कोरोनाची माहितीही लपवण्यात आली होती. यासाठी तपासकर्त्यांना चीनमध्ये जाऊन याचा तपास करायचा आहे, पण बीजिंगला ते मान्य नाही, त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद वाटतेय. यामुळे चीन आपल्या बचावाकरिता नवनवीन युक्त्या अवलंबत आहे. आता या संसर्गाचे कारण चीनने ब्राझीलचे गोमांस, सौदी अरेबियाचा झिंगा आणि अमेरिकेचे डुक्कराचे मांस असल्याचा दावा केला आहे. या सिद्धांताला चालना देण्यासाठी चिनी माध्यमे सातत्याने बातम्या प्रसिद्ध करत असल्याचा दावा एका अहवालात केला जात आहे.
पॉलिसी रिसर्च ग्रुप (POREG) नावाच्या जागतिक थिंक टँकसाठी मायकेल श्लीब्स यांनी अशा चीनी अकाऊंट वर संशोधन केले जे कोरोनाच्या खोट्या अफवा पसरवत आहेत. त्यांना आढळले की चीनच्या समर्थनार्थ पोस्ट करणारे शेकडो सोशल मीडिया अकाऊंट दावा करत आहेत की, आयात केलेले थंड मांस हे कोरोना विषाणूचे खरे कारण आहे. ब्राझिलियन गोमांस, सौदी अरेबियाची झिंगा आणि अमेरिकेचे डुकराचे मांस यामुळे कोरोना पसरला हे सिद्ध करण्यात चीनी मीडिया रस घेत आहे.
ग्लोबल थिंक टँकच्या मते, श्लीब्सने जवळजवळ १८ महिने चीन समर्थक अकाऊंटचा अभ्यास केला आणि आढळले की झिंगा किंवा डुकराचे मांस सिद्धांत सामायिक करणे कोलकाता येथील वाणिज्य दूतावासात काम करणार्या चिनी राजदूताने सुरू केले होते. अहवालानुसार, झा लिओऊ यांनी हा सिद्धांत नोव्हेंबर २०१९ मध्ये पोस्ट केला होता आणि आता तो वेगाने पसरला आहे. झिंगा पुरवठादार आणि मेन स्थित सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या दोघांनीही हे दावे स्पष्टपणे नाकारले असले तरी चीनवर त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.
रिपोर्टनुसार, ‘चीनच्या मीट मार्केट वुहानला कोरोनाचा केंद्रबिंदू मानण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत या दाव्याला उत्तर देण्यासाठी चीनने दूषित मांसाच्या सिद्धांताचा प्रचार सुरू केला आहे.
तुम्हाला सांगू द्या की, महामारीच्या सुरुवातीपासूनच चीनवर आपली माहिती लपवल्याचा आरोप होत आहे. या वर्षी जानेवारीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या चमूनेही चीनला भेट दिली होती, मात्र कोरोनाच्या उत्पत्तीबाबत कोणताही ठोस निष्कर्ष निघू शकला नाही. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की चीनने अनेक दिवसांपासून कोरोना संसर्गाची माहिती जगापासून लपवून ठेवली होती, मात्र चीन हे दावे फेटाळत आहे.