अजिंक्य घोंगडे
पोलीस दक्ष असतील किती फायदा होते ते नांदेडमधील घटनेमुळे दिसून आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यातील स्थानकावर उतरलेल्या वडिलांपासून दुरावलेली दोन मुले पोलिसांमुळे पुन्हा वडिलांकडे परतू शकणार आहेत. ही मुले झोपलेली असल्यानं वडिल मागेच राहिल्याचं त्यांच्या लक्षातही आलं नव्हतं.
अमृतसर-हुजूर साहिब नांदेड सचखंड विशेष एक्सप्रेस मध्ये ड्युटी वर असतांना प्रमोद कुमार, तिकीट चल निरीक्षक, नांदेड यांना दोन मुले डी-१ कोच मध्ये झोपलेल्या अवस्थेत आढळले, अधिक चौकशी केली असता ते या गाडीने झोपे मध्ये पुढे आले असल्याचे लक्षात आले.
प्रमोद कुमार यांनी दोन्ही मुलांना औरंगाबाद येथे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स च्या उप-निरीक्षकांच्या स्वाधीन केले. आर.पी.एफ. औरंगाबाद यांनी अधिक चौकशी केली असता त्यांना त्यांच्या वडिलांचा नंबर सापडला. मुलांचे वडील राकेश कुशवाह यांच्याशी मोबाईल वर बोलणे झाले असता हि मुले श्री कुशवाह याच्या सोबत ललितपुर येथून इंदोरला जाण्यासाठी प्रवास करत असल्याचे लक्षात आले. राकेश कुशवाह हे बिना रेल्वे स्टेशनवर पाणी घेण्यासाठी खाली उतरले आणि बाटलीत पाणी भरण्यात मग्न होते तोच सचखंड एक्सप्रेस पुढील प्रवासास निघून गेली. हे दोन्ही मुले झोपित असाल्यामुळे पुढे आली. या मुलांचे नाव अरुण वय- ९ वर्ष व अभिषेक वय- ६ वर्ष अशी आहेत. नियमानुसार दोन्ही मुलांना बाल कल्याण समिती, औरंगाबाद यांच्या समोर पुढील कार्यवाही करिता सादर केले आहे.