Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उच्च न्यायालयातील सुनावणीमुळे चिक्की घोटाळा पुन्हा चर्चेत

चिक्की घोटाळ्यात अद्याप गुन्हा का नोंदविण्यात आला नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

August 13, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
pankja munde hc

मुक्तपीठ टीम

भाजपा सत्ताकाळात गाजलेला पोषण आहार पुरवठ्यातील चिक्की घोटाळा आता पुन्हा चर्चेत आला आहे. खरंतर काँग्रेस राष्ट्रवादीनं त्यावेळी भाजपाला आणि त्यातही तत्कालिन महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना लक्ष्य केले होते. पण पुढे ते प्रकरण चर्चेतूनच बाद झाले. पण आता मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीमुळे पुन्हा चिक्की घोटाळा गाजू लागलाय. राज्यभरातील अंगणवाड्यांमधील लहान मुलांना पोषण आहाराच्या माध्यमातून चिक्कीचा पुरवठा आणि इतर वस्तूंची खरेदी घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदाराविरोधात अद्याप गुन्हा का नोंदविण्यात आला नाही? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला केली.

 

काय आहे चिक्की घोटाळा प्रकरण

  • माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या चिक्कीचे आणि मुलांशी संबंधित वस्तूंचे कंत्राट काही ठरावीक कंत्राटदारांना प्रक्रिया पार न पाडताच दिले असल्याचा आरोप आहे.
  • या खरेदी प्रक्रियेत २०६ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचाही आरोप आहे.
  • ‘वेगवेगळ्या संस्थांना २४ कंत्राटे देण्यात आली.
  • मात्र, या संदर्भात १९९२च्या राज्य सरकारच्या जीआरप्रमाणे योग्य ती निविदा प्रक्रिया पार पडली नसल्याचे दिसते.
  • या कंत्राटदारांना सरकारकडून त्यांचे पैसे देण्यात आले.

 

न्यायालयाचाय आदेशाने चिक्कीपुरवठा आणि पैसे थांबले!

  • मात्र, उच्च न्यायालयात २०१५मध्ये हा विषय आल्यानंतर न्यायालयाने अंगणवाड्यांमधील चिक्कीपुरवठा थांबवावा आणि उर्वरित पैसे देऊ नये, असा अंतरिम आदेश दिला.
  • गुरुवारी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की , निकृष्ट दर्जाची चिक्की मुलांना वाटली.
  • त्यात वाळू असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झाले, असे राज्य सरकारच्याच पूर्वीच्या एका प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते’, अशी माहिती अॅड. गौरी यांनी दिली.
  • ‘सरकारी अधिसूचनेचे उल्लंघन करून ही कंत्राटे देण्यात आली होती का? नियम पाळले होते का? ही कंत्राटे बेकायदेशीर होती की कंत्राटदार अपात्र होते? हे आम्हाला सांगा.
  • तेव्हाच आम्ही कंत्राटदाराने पुरविलेल्या वस्तू निकृष्ट होत्या की नव्हत्या, या प्रश्नाकडे वळू.

 

भेसळप्रकरणी गुन्हा दाखल झाला का?

  • अन्नात भेसळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला का?, असे म्हणत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.
  • या घोटाळ्याची चौकशी करावी , यासाठी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात काही जनहित याचिका दाखल झाल्या आहेत .

Tags: BJPChikki scammumbai high courtpankaja mundeचिक्की घोटाळापंकजा मुंडेभाजपामुंबई उच्च न्यायालय
Previous Post

यशोमती ठाकूर यांचं प्रत्युत्तर, नवनीत राणांकडून काही कंत्राटदारांसाठी अंगणवाडीताईचा अपमान!

Next Post

“पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीने संबंध ठेवणे बेकायदेशीर नाही!”

Next Post
Mumbai

“पत्नीच्या इच्छेविरुद्ध पतीने संबंध ठेवणे बेकायदेशीर नाही!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!