Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिकच्या कोरोना परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

March 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
uddhav

मुक्तपीठ टीम

गेल्यावेळेपेक्षा यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याने नागरिकांनी शासन प्रशासनास सहयोग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले. ओझर विमानतळ येथील बैठक कक्षात कोरोना विषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोविडचे लसीकरण करून घेण्याबाबत जनतेमध्ये जागृती वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. त्यादृष्टीने नाशिक शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मनपा आयुक्तांना दिले.

गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस विभागाला दिली.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दी नियंत्रण यात समन्वय साधणारे असल्यामुळे त्याची कठोर अंमलबजावणी करावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच नागरिकांचा या सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहून याबाबत पुढील निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

 

‘मी जबाबदार’ मोहिमेअंतर्गत भित्तीपत्रकांचे अनावरण

शासनाच्यावतीने ‘मी जबाबदार’ मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने या मोहिमेला पुढे घेवून जाण्यासाठी भित्तीपत्रकाच्या माध्यमातून विशेष उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत भित्तीपत्रकांचे अनावरण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून या भित्तीपत्रकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होईल व जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेला नागरिक प्रतिसाद देतील असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी वरील त्रिसूत्री सोबतच लसीकरणाचा बाधित क्षेत्रामध्ये सुयोग्य वापर करून रुग्ण वाढ थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सिव्हिल सर्जन यांचेकडून आरोग्य विषयक विविध बाबींची माहिती घेतली.

 

कोरोनाचा सामना करण्यासाठी टेस्ट ट्रॅक ट्रीट या त्रिसूत्रीवर भर: जिल्हाधिकारी सूरज मांढरे

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटीलेशन बेड , रेमडिसिव्हर व अन्य औषधे यासह आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून शासनाने घालून दिलेल्या टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी सर्व यंत्रणा मिळून करतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले. तसेच मागील वर्षीची लाट व यावर्षीची लाट यातील क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबी मधील फरक आणि त्यादृष्टीने प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक मनपा प्रशासनामार्फत सुरू असलेल्या विविध उपाययोजना जसे वैद्यकिय यंत्रणेचे बळकटीकरण, बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोधमोहिम, बाधित क्षेत्रातील मनपा पोलीस पथकांची कार्यवाही इत्यादी बाबत माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

 


Tags: chief minister uddhav thackerayCorona situationnashikमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

कौशल्य विद्यापीठे स्थापनेसंदर्भात छाननी समिती गठीत

Next Post

ओबीसींच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका

Next Post
vijay

ओबीसींच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!