Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाकिस्तानात चिकन कडाडलं…५०० रुपये किलो!

March 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
chicken

मुक्तपीठ टीम

पाकिस्तानमध्ये चिकनच्या किंमतीत अनपेक्षित वाढ झाल्याने कराची जनता निराश झाली आहे. कराचीमध्ये चिकनचा दर गगनाला भिडलेला आहेत. कराचीमध्ये चिकनचे दर काही दिवसातच प्रति किलो ५०० रुपयांवर पोहचले आहेत. पाकिस्तानात केवळ चिकनच महागले नसून अंडी आणि आल्याचे दरही वाढले आहेत. प्रति डजन अंडी ३५० रुपये तर एक किलो आले १००० रुपयांना विकले जात आहे. तसेच घरगुती गॅसच्या दरातही वाढ झाल्याने पाकिस्तानच्या सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे.

कराची येथील एका विक्रेत्याने सांगितले की, चिकनच्या किंमतीत झालेल्या वाढीचे मुख्य कारण चारा आणि कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ आहे. यामुळे पोल्ट्री उत्पादनांचा खर्चही वाढला आहे. नुकसानाची भरपाई करण्यासाठी आम्हाला चिकनची किंमत वाढवावी लागत आहे. येत्या काही दिवसात चिकनची किंमत कमी होईल, असे विक्रेतांच्या संघटनांनकडून सांगितले जात आहे.

 

कराचीमध्ये जिवंत कोंबडीची किंमत ३७० रुपये प्रति किलो तर चिकनची किंमत ५०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये दर वाढल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. तर लोहोरमध्ये चिकनची किंमत ३६५ रुपये प्रति किलो असल्याचे सांगितले जात आहे.

महागाईवर नियंत्रण आणण्यास इम्रान खान अपयशी

  • गेल्या महिन्यात पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा (केपी) च्या बाजार समित्या रद्द केल्या.
  • इम्रान यांनी इस्लामाबादमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणासंदर्भात बैठकीच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेतला होता.
  • दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इम्रान खान यांनी ट्विट करून असा दावा केला होता की, आता त्यांच्या देशात साखर ८१ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
  • त्यांनी स्वत: चे कौतुक केले आणि म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या धोरणांमुळे गेल्या महिन्यात प्रति किलो १०२ रुपये दराने विकल्या जाणाऱ्या साखरेची किंमत आता ८१ रुपयांवर आली आहे.
  • पण आता सातत्याने पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तू्ंच्या दरात वाढ होत असल्याने इम्रान खान यांचे सरकार महागाई नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags: Imran KhanPakisthanइम्रान खानपाकिस्तान
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचे* : १) “लव सुलभ” या चित्रपटाचे चित्रीकरण ठाणे येथे सुरू झाले आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रियदर्शन जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे. २) अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या हॉट लूकने प्रेक्षकांचे मन घायाळ करत असते. काही दिवसांपूर्वीच उर्वशीचा ‘एक लडकी भीगी भागी सी’ अल्बम रिलीज झाला आहे. यात तिचा पावसात लाल साडीवर ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. या अल्बमला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. ३) भाजपा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या जागतिक महिला दिनानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीस आपले नवीन गाणे घेऊन आल्या आहेत. त्यांचे हे गाणे नाट्य संगीतावर आधारित आहे. ४) हेमंत ढोमे यांनी काही दिवसांपूर्वी‘झिम्मा’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज केले होते. या सिनेमात अनेक लोकप्रिय चेहरे पाहण्यास मिळणार आहेत. एकाच सिनेमात एवढी मोठी स्टार कास्ट असल्याने सिनेमा विषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘झिम्मा’च्या टिझरवरूनच हा सिनेमा जबरदस्त असेल हे लक्षात येत आहे. ५) ‘हरफनमौला’ या गाण्यात आमिरचा रोमॅण्टिक अंदाज पाहण्यास मिळतोय. एलीसोबत आमिर या गाण्यात जबरदस्त डान्स करत आहे. आमिर खानचा ‘कोई जाने ना’ सिनेमा २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील ‘हरफनमौला’ या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

Next Post

१६ ठिकाणे कोरोनाचे हॉटस्पॉट, मात्र ठाण्यात लॉकडाऊन नाही

Next Post
thane munciple

१६ ठिकाणे कोरोनाचे हॉटस्पॉट, मात्र ठाण्यात लॉकडाऊन नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!