मुक्तपीठ टीम
मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी माफिया डॉन छोटा राजनची सुटका केली आहे. अडतीस वर्षांपूर्वी दोन पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर होता. छोटा राजनविरुद्ध कलम ३०७ आणि कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडे वर्ग केला होता. त्याप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यानुसार त्याची सुटका झाली आहे. जवळजवळ चार दशकांपूर्वीच्या प्रकरणात झालेली सुटका नेमकी कशामुळे शक्य झाली, ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
- विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी राजनला त्याच्यावरील आरोपांमधून सुटका केली.
- न्यायालयाचे कामकाज हे समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे चालते.
- हा गुन्हा ३८ वर्षांपूर्वीचा होता. तारखा पडत राहिल्या पण सुनावणी सुरु झाली तेव्हा वेगळ्याच अडचणी आल्या.
- खटल्याशी संबंधित बहुतांश साक्षीदारांचा ठावठिकाणा सापडत नसल्याने साक्षी होऊ शकल्या नाहीत.
- या प्रकरणाची कागदपत्रेही गहाळ झाल्याचे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले.
- त्यामुळेच सीबीआयने क्लोजर रिपोर्टही सादर केला होता.
सीबीआयने सादर केला क्लोजर रिपोर्ट
या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे गहाळ असून साक्षीदारही गायब असल्याचे सीबीआयने म्हटले होते.
दारु नेताना रोखणाऱ्या पोलिसांवर हल्ल्याचा आरोप
न्यायालयाने एजन्सीला तपास सुरू ठेवण्यास सांगितले होते. १९८३ मध्ये पोलिसांनी एक टॅक्सी थांबवली होती. या टॅक्सीत राजन आणि त्याचे साथीदार दारूची तस्करी करत होते. दोन पोलिसांनी टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, अटक करण्यापूर्वी राजनने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सध्या राजन तिहार तुरुंगात!
२०१५ मध्ये इंडोनेशियातून आणल्यानंतर राजनला दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. राजनवर सुमारे ७० खटले सुरू आहेत. २०११ मध्ये पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती.