Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हजारांपेक्षा कमी झालेली रुग्णसंख्या दिलासादायक

ऑक्सिजन प्रकल्पांचे काम प्राधान्याने पूर्ण करावे: छगन भुजबळ

August 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
chhagan bhujbal

मुक्तपीठ टीम

काही दिवसांपासून स्थिर असलेली कोरोनाबाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या हजारांपेक्षा कमी झाल्याने दिलासादायक परिस्थिती आहे. ही रुग्णसंख्या अजून कमी होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजीत आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. याबैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्ष दुधेडिया, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी आदी बैठकीस उपस्थित होते.

 

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर लक्षात घेता टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात यावे. त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात चार ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प सुरू झाले असून आठ प्रकल्पांच्या टेस्टिंगचे काम सुरू आहे. या ऑक्सिजन प्रकल्पांच्या टेस्टिंगच्या कामात ज्या जबाबदार यंत्रणेकडून दिरंगाई होत असेल त्या संबंधित यंत्रणेवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री भुजबळ यांनी दिले आहेत.

 

त्याचप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेत करण्यात येणाऱ्या उपायोजनांच्या दृष्टिने बालरुग्णालये तयार करण्यात आली आहे. म्युकरमायकोसिस एकूण ७५८ रुग्णांमध्ये घट होवून सध्या ४६ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ६३२ रुग्ण बरे झाले असून ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणात आतापर्यंत २२ लाख ११ हजार ७१८ लोकांना दोन्ही डोस देण्यात आले असून याचेप्रमाण ३०.१४ टक्के आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याने पालकमंत्री भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले की, कोरोना काळात कोरोना विषयक उपाययोजनांसाठी आतापर्यंत ५६ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या पुर्व तयारी साठी साधारण एक हजार नवीन बेड्स वाढविण्यात आले असून आजच्या स्थितीला ९७ टक्के बेडस शिल्लक आहेत. महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात १०० किलोलिटरचे ऑक्सिजन टँक बसविण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच अजून तीन महिने पुरेल इतका औषधसाठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. आठ ऑक्सिजन प्रकल्पांच्या टेस्टिंगचे सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी बैठकीत पालकमंत्री यांना सांगितले.

 

बैठकीच्या सुरूवातील जिल्‍हा क्रीडा विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘चला खेळ खेळूया’ या पुस्तकाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


Tags: chhagan bhujbalcoronaऑक्सिजनकोरोनाछगन भुजबळ
Previous Post

“कोरोना काळात प्रत्येक जीव महत्वाचा; सर्वांनी पार पाडावी आपली जबाबदारी”: छगन भुजबळ

Next Post

कलिना विद्यापीठ परिसरात मुलांसाठी ‘कोरोना काळजी केंद्र’ सुरु

Next Post
Maha CM

कलिना विद्यापीठ परिसरात मुलांसाठी 'कोरोना काळजी केंद्र' सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!