Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“नैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने करणे काळाची गरज” – छगन भुजबळ

May 1, 2022
in सरकारी बातम्या
0
सक्षम-२०२२ संरक्षण क्षमता महोत्सव 3

मुक्तपीठ टीम

कच्च्या तेलाचा कमी होत चाललेला साठा, इंधन खरेदीसाठीचे परावलंबित्व आणि वाढते तापमान या सर्व पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली असून इंधनाचा वापर काटकसरीने करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने सक्षम-२०२२ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीराम भावसार, भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक पी. के. रामनाथन, ओ ॲन्ड एम गेलचे कार्यकारी संचालक शालिग्राम मोवर, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) चे पश्चिम विभागाचे संचालक शशिकांत पाटील, प्रादेशिक संचालक अजित धाक्रस, इंडियन ऑइल सीजीएम सुब्रात कार, हिंदुस्तान पेट्रोलियमचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण राव,राज्य समन्वय संतोष निवेंदकर यावेळी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सक्षम महोत्सवाअंतर्गत इंधन बचतीचे जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.या उपक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीला इंधन बचतीचे महत्व कळेल. आज जागतिक पातळीवर इंधनामुळे युध्द होत आहेत. याचे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहेत.  त्यामुळे इंधन बचतीच्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे मत  मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.         

इंधन बचत जनजागृतीपर वादविवाद  स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण       

हिंदी वादविवाद स्पर्धेत अंजुमन खैरूल इस्लाम उर्दू गर्ल्स हायस्कूल कुर्लाच्या शेख अरफा अब्दुल रेहमान, खान फातिमा जाहिर यांनी गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आली, कुलाबा म्युन्सिपल सेंकडरी स्कूलच्या आयेशा शेख, मोनू वाल्मिकी यांना गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मराठी वादविवाद स्पर्धेत इंडियन एज्युकेशन सोसायटी भांडूप या विद्यालयातील स्वाहा कांबळी, स्वधा कांबळी यांनी सिल्वर ट्रॉफी प्रदान करण्यात आला. विद्यानिधी व्हीपी मराठी मिडीयम स्कूल जुहूच्या प्रणिता येडगे,धनश्री गिरे यांनी गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आला. इंग्रजी वादविवाद स्पर्धेत के.आर.कोटकर सेंकडरी ॲण्ड हायर सेकेंडरी विद्यालय डोंबिवली विधी चोठानी,वैष्णवी चौगुले यांनी सिल्वर  ट्रॉफी प्राप्त केली. महिला समिती ज्यु.कॉलेज ठाकुर्लीतील प्रथमेश सोमवंशी,तनय मोरे यांना गोल्डन ट्राफी प्राप्त केली.यावेळी शिक्षक तसेच जनजागृतीपर लेख लिहिणारे लोकशाहीचे सुबोध रणशिवरे, जनमाध्यमचे सुशील कुमार, जनपथ समाचारचे दुलाल देबनाथ व दोपहर का सामनाचे आनंद तिवारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.इंधन बचत काळाची गरज हे प्रशांत मनोरे लिखीत पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच इंधन बचतीची शपथही देण्यात आली.


Tags: chhagan bhujbalMaharashtraNatural gasछगन भुजबळनैसर्गिक इंधनमहाराष्ट्र
Previous Post

तलाव ठेक्याने घेणाऱ्या राज्यातील मच्छिमार सहकारी संस्थांना दिलासा

Next Post

मुंबईत कुरियर पार्सलमधून ड्रग स्मगलिंग! अंमली पदार्थांसह तिघांना अटक!!

Next Post
mumbai airport and custom depta

मुंबईत कुरियर पार्सलमधून ड्रग स्मगलिंग! अंमली पदार्थांसह तिघांना अटक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!