Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महापुरुषांची बदनामी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही – छगन भुजबळ

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
chhagan bhujbal

मुक्तपीठ टीम

महापुरुषांची बदनामी महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात जो जो उभा राहील तो आपला आहे आणि त्यांच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड आयोजित एक दिवसीय शिबिराला त्यांनी उपस्थिती लावली यावेळी ते बोलत होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की या फुले शाहु आंबेडकरांच्या राज्यात वारंवार महापुरुषांचा अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून वारंवार महाराष्ट्राला अपमानित करण्याचे काम यांचे चालू आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापुरुषांनी भीक मागितली असे विधान केले मात्र त्यांना ठाऊक नसेल १८६९ साली टाटा उद्योग समूहाचा वार्षिक उलाढालीचा आकडा हा २० हजार होता. तर पूना कमर्शियल इन कॉन्ट्रॅक्टींग या कंपनीचा वार्षिक उलाढालीचा आकडा होता २१ हजार रुपये आणि या कंपनीचे सर्वेसर्वा होते महात्मा ज्योतिबा फुले.महात्मा फुले स्वत: उद्योगपती होते मोठमोठी कामे ते करत असत. आणि त्यातून मिळालेल्या पैश्याने त्यांनी समाजसुधारणेचे काम केले. लोकमान्य टिळकांना एका खटल्यातून सोडवण्यासाठी रूपये १०,००० इतकी रक्कम महात्मा फुले यांनी दिली होती.

कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोर शिकविल आणि या सनातन्यांच्या छाताडावर थयाथया नाचविल कर्मवीरांनी तर शिक्षणाच्या कामासाठी स्वताच्या पत्नीचे दागिने विकले पण मुलांना शिकवीले

राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जायला लागले आहेत. मागील सहा महिन्यांपासून राज्याच नकारात्मक वातावरण. .सुरुवातीच्या काळात दहीहंड्या फोडण्यात मग्न झालेल्या या सरकारने आता नवस फेडण्यासाठी दौरे सुरू केले आहे, अशा राज्यात कोणते उद्योगपती थांबतील? केंद्र सरकारने सुरू केलेले, मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया हे सगळे प्रकल्प अयशस्वी ठरले त्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.महाराष्ट्रातून लाखो कोटी रुपयाचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला काहीही दिले जात नाही अशी खंत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

बेळगाव – महाराष्ट्र प्रश्नांवर हे सरकार गप्प राहते तिकडचे मुख्यमंत्री दम देतात आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री गप बसतात. पवार साहेब आणि मी बेळगाव साठी लाठ्या काठ्या खाल्या आहेत. हा महाराष्ट्र आहे हे दाखवून द्यायला हवे असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले …..

यावेळी बोलताना ते म्हणाले की उद्या शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यांची इच्छाशक्ती आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम आपण सर्वांनी शिर्डीच्या शिबीरात पाहिले आहे. आजारी असताना देखील शिबीराला उपस्थिती लावली होती. आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला तयार रहावं लागणार आहे.राज्यातील महापालिका किंवा जिल्हापरिषदांच्या निवडणुका कधीही घोषित होतील… पवार साहेबांना वाढदिवसाचे काही भेट द्यायची असेल तर निवडणुकींच्या माध्यमातुन त्यांना बळ द्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.


Tags: chhagan bhujbalMaharashtraछगन भुजबळफुले शाहु आंबेडकरमहापुरुषांची बदनामीमहाराष्ट्र
Previous Post

निर्भया पथकातील वाहने आमदारांच्या सरंक्षणासाठी; शिंदे टोळीतील आमदारांना नक्की कशाची भीती वाटते? – जयंत पाटील 

Next Post

तुकडे तुकडे गँग मुंबईची शकलं शकलं करतील – ॲड. आशिष शेलार

Next Post
Ashish Shelar

तुकडे तुकडे गँग मुंबईची शकलं शकलं करतील - ॲड. आशिष शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!