मुक्तपीठ टीम
सिडनीमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ज्याप्रमाणे संयम, शौर्य दाखवले त्याचीच झलक ब्रिस्बेनमधील सामन्यातही पाहायला मिळाली. गाबा कसोटीच्या पाचव्या आणि निर्णायक दिवशी चेतेश्वर पुजारी आपल्या वेदनांकडे दुर्लक्ष करून मैदानात कणखण भिंतीप्रमाणे उभा होता. चेतेश्वर पुजारीची तुलना बर्याचदा राहुल द्रविडशी केली जाते. पण गाबा कसोटीमध्ये चेतेश्वरच्या फलंदाजीमध्ये वेगळेपण पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा बाउंसर आणि शॉर्ट पिच गोलंदाज पॅट कमिन्सने आपल्या धडाकेबाज गोलंदाजीने चेतेश्वर पुजारीला बिथरवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने आपल्या खेळावर सयंम ठेवला. वेदना वाढवणाऱ्या प्रत्येक चेंडूबरोबर त्याचे आत्मबल तितकेच वाढत असावे!
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चहापानापर्यंत सात वेळा पुजारीवर षटकारांचा हल्ला केला. पण ऑस्ट्रेलिया संघाची ही रणनीती पुजारीचा आत्मविश्वास ढासळू शकली नाही. प्रत्येक दुखापतीनंतर पुजारी शॉर्ट मिडऑनकडे जायचा आणि परत मैदानात परतायचा. त्याने कधीही खेळावरील संयम गमवाला नाही. तर दुसरीकडे, शुभमन गिलने जोरदार फटकेबाजी सुरू ठेवली. शुभमन गिल हा ९१ धावांवर बाद झाला. पण जोपर्यंत पुजारी मैदानात आहे तोपर्यंत भारतीय संघ हरु शकत नाही हे ऑस्ट्रेलिया संघाला माहित होते.
One cannot shake @cheteshwar1‘s resolve. He receives a nasty blow on his hand, is writhing in pain, but continues to bat for #TeamIndia 💪🏾 #AUSvIND
Details – https://t.co/OgU227P9dp pic.twitter.com/eClLRRdYeE
— BCCI (@BCCI) January 19, 2021
पॅट कमिन्सकडून आलेला एक षटकार पुजारी चुकवू शकला नाही. त्याला कळेपर्यंत चेंडू त्याच्या पर्यंत पोहचला होता. पुजारीने डोक दुसऱ्या बाजूला केलं आणि तो चेंडू त्याच्या हेल्मेटच्या मागच्या बाजूला लागला. त्यावेळीही पुजारीने आपल्याला काहीच दुखापत झाली नाही असे दाखवले आणि आपला खेळ चालू ठेवला.
एका चेंडूने अचानक वेग घेतला आणि तो पुजारीच्या बोटाला जाऊन लागला. यावेळी त्याला प्रचंड वेदना जाणवू लागल्या. या दुखापतीनंतर सगळ्यांनाच प्रश्न पडला की आता पुजारी खेळेल की नाही? पण पुजारी हिंमत हरला नाही आणि तो पुन्हा मैदानात उतरला. त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले संजय मांजरेकर यांनी भावनिक होऊन टीम इंडियाला जर एखादा ब्रेवरी अवॉर्ड द्यायचा झाला तर तो चेतेश्वर पुजारीला देण्यात यावा असे म्हणाले.