मुक्तपीठ टीम
चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पामधील आणखी एक पॅकेज ‘लार्सन अँड टुब्रो’ने पटकावले आहे. चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे ‘पॅकेज सी-थ्री’ (CP08 EV01) ‘एलअँडटी’ला प्रदान करण्यात आले आहे.
नेहरू नगर, कंदनचावडी, पेरुंगुडी, तोराइपक्कम, मेट्टुकुप्पम, पीटीसी कॉलनी, ओक्कीयामपेट, कारापक्कम, ओक्कीयाम तोराईपक्कम आणि शोलिंगनाल्लूर येथील दहा (१०) एलिव्हेटेड मेट्रो स्थानके, तसेच ‘एलिव्हेटेड रॅम्प’सह सुमारे १० किमी लांबीचा ‘एलिव्हेटेड व्हायाडक्ट’ यांचे बांधकाम करण्याचे काम या CP08 EV01 पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. हे एलिव्हेटेड मेट्रो रेल्वे पॅकेज ३५ महिन्यांत बांधले जाणार आहे.
‘एलअँडटी’कडे या अगोदरच ‘सीएमआरएल’च्या दुसऱ्या टप्प्यातील चार पॅकेजेसचे काम सुरू आहे. त्यापैकी एक भूमिगत मेट्रोचे आहे आणि इतर तीन एलिव्हेटेड मेट्रोची पॅकेजेस आहेत. ‘एलअँडटी’ने यापूर्वी ‘सीएमआरएल’च्या पहिल्या टप्प्यामध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प कार्यान्वित केले होते.