Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोच्या जानेवारी-२०२२ गृहनिर्माण योजनेच्या यशस्वी अर्जदारांची यादी येथे तपासा…

सिडकोची घरे ही सर्वसामान्यांसाठी परवडणारी - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
List of cidcos jan 2022 applicants

मुक्तपीठ टीम

“सध्याच्या महागाई आणि मंदीच्या काळात सिडकोची परवडणाऱ्या दरातील घरे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी
फायदेशीर ठरणारी आहेत,” असे उद्गार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. सिडकोच्या जानेवारी-
२०२२ गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीचा प्रारंभ एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात
आला यावेळी त्यांनी दूरस्थ पद्धतीने आपला संदेश व्यक्त केला. आता सिडकोच्या जानेवारी-२०२२ गृहनिर्माण योजनेच्या यशस्वी अर्जदारांची यादी वेबसाइटलवर उपलब्ध असणार आहे.

 

या प्रसंगी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय
संचालक, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, शशिकांत महावरकर, मुख्य दक्षता अधिकारी, फैयाज
खान, महाव्यवस्थापक (गृहनिर्माण), सिडको यांसह सिडकोतील विभाग प्रमुख आणि अधिकारी दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते.

 

सिडको साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासोबतच अन्य अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे नवी मुंबईमध्ये घर
लाभलेल्या अर्जदारांना घरांमध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात फायदेशीर ठरणार असल्याचे सांगत एकनाथ शिंदे
यांनी सोडतीमध्ये घर लाभलेल्या यशस्वी अर्जदारांचे अभिनंदन केले.

 

डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी प्रास्ताविकामध्ये गृहनिर्माण योजनेची संक्षिप्त
माहिती देत सिडको सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.

 

सदर संगणकीय सोडत प्रक्रियेवर देखरेख करण्याकरिता सिडकोतर्फे सुरेश कुमार, माजी लोकायुक्त यांच्या
पर्यवेक्षणाखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या देखरेख समिती व्यतिरिक्त, अर्जदारांपैकी संतोष पिंपळे, मधुकर
पिसाळ आणि राजेश चव्हाण यांनी पंच म्हणून काम पाहिले. सोडतीमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांनी सिडकोमुळे नवी
मुंबईसारख्या सोयी सुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी बोलून
दाखवली.

 

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतर्फे २६ जानेवारी २०२२ रोजी प्रारंभ करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत
सुरुवातीस ५,७३० सदनिका तळोजा नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यानंतर अधिकाधिक नागरिकांना
योजनेचा लाभ घेता यावा म्हणून द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील आणखीन काही
रिक्त सदनिकांची भर घालून एकूण ६,५०८ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण ६,५०८ घरांपैकी १,९०५ घरे
ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि ४,६०३ सदनिका ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या
होत्या. या योजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

 

सिडकोतर्फे गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीसाठी वापरण्यात येणारी प्रणाली (सॉफ्टवेअर) ही पुणे स्थित प्रोबेटी
सॉफ्ट या नामांकित कंपनीकडून विकसित करण्यात आली आहे. सदर प्रणाली ही पूर्णत: मानवी हस्तक्षेपविरहित आहे.
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संगणक विभागाकडून या प्रणालीची तपासणी करण्यात आली आहे.
या प्रणालीद्वारे काढण्यात येणाऱ्या सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांमधील निवडक प्रतिनिधींना पंच म्हणून सहभागी करून
घेतले जाते. तसेच सोडती दरम्यान पात्र अर्जदारांच्या आणि सदनिकांच्या यादीची यादृच्छिक (Random) पद्धतीने
सरमिसळ करण्यात येते. अत्यंत पारदर्शक व निष्पक्ष अशा या प्रक्रियेद्वारे सर्व अर्जदारांना समान संधी सुनिश्चित करण्यात
येते.

 

जानेवारी-२०२२ गृहनिर्माण योजनेच्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


Tags: CIDCOEknath ShindeHousing for allगृहनिर्माण योजनानगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसिडको
Previous Post

गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता: ८११ झाडांवर नोटीस, पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर आढावा!

Next Post

बूस्टर डोससाठी नव्या नोंदणीची गरज नाही! खासगी रुग्णालयांमध्ये ‘हे’ दर!

Next Post
2nd dose of vaccine

बूस्टर डोससाठी नव्या नोंदणीची गरज नाही! खासगी रुग्णालयांमध्ये 'हे' दर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!