Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची निर्मिती, ३० रुपयांमध्ये १८५ किमी धावणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
E-car Himanshu Bhai Patel

मुक्तपीठ टीम

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक कार बनवली आहे. या ई-कारची सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे विंटेज लूक असणारी ही इलेक्ट्रिक कार वाहन उत्पादकांच्या इलेक्ट्रिक कारपेक्षा खूपच स्वस्त आहे. या कारमध्ये ड्रायव्हरसह ५ लोक बसू शकतात आणि दिसायला खूपच आकर्षक आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये १८५ किमी धावते. विशेष म्हणजे ही कार चालू असतानाच चार्जही करता येते.

 

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची ई-कार निर्मिती

  • इंजिनीअरिंगचा विद्यार्थी हिमांशू भाई पटेल यांचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार अवघ्या ३० रुपयांमध्ये १८५ किमीपर्यंतचे अंतर पार करेल.
  • कारचा टॉप स्पीड ५० किलोमीटर प्रति तास आहे.
  • हिमांशूने ५ महिन्यांच्या मेहनतीनंतर ही कार तयार केली आहे.
  • हिमांशू गुजरातमधील गांधीनगर येथे शिकत आहे. आणि तो सागर जिल्ह्यातील मकरोनिया येथील रहिवासी आहेत.

 

कार बनवण्यासाठी घेण्यात आलेले श्रम आणि लागलेला खर्च

  • देशातील विविध वाहन उत्पादक कंपन्यांनी अनेक इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत.
  • हिमांशूने बनवलेली ही कार सध्या बाजारात असलेल्या इतर कारच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे.
  • हिमांशू भाई पटेल यांनी सांगितले की, ही कार बनवण्यासाठी २ लाख रुपये खर्च आला आहे.

 

ई-कारच्या बॅटरी आणि चार्जिंगविषयीचे महत्त्वाचे मुद्दे

  • या इलेक्ट्रिक कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे ४ तास लागतात.
  • या इलेक्ट्रिक कारची बॅटरी विजेने चार्ज करण्यासाठी ३० रुपये खर्च येतो. विशेष म्हणजे रिमोट कंट्रोलने कार सुरू आणि थांबवताही येते.

 

कारचे जबरदस्त फिचर्स

  • कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्पीड मीटर, बॅटरी पॉवर मीटर, फास्ट चार्जरसह अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.
  • कार रिव्हर्स करण्यासाठी बटण देण्यात आले आहे.
  • सुरक्षा फिचर्स म्हणून, चोरीपासून संरक्षण करण्यासाठी अलार्म देखील आहे.
  • शॉर्टसर्किट झाल्यास, कारमध्ये बसवलेले एमसीबी ट्रिप होईल, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळला जाईल.

Tags: Cheap electric care-carelectric carEngineering studentHimanshu Bhai PatelMadhya PradeshmuktpeethSagar Districtsingle chargeइंजिनीअरिंग विद्यार्थीइलेक्ट्रिक कारई-कारमध्य प्रदेशसागर जिल्हासिंगल चार्जस्वस्त इलेक्ट्रिक कारहिमांशू भाई पटेल
Previous Post

राज्यात ओमायक्रॉनचा नवा रुग्ण नाही! राज्यात कोरोनाचे ८०७ नवे रुग्ण, ८६९ रुग्ण बरे होऊन घरी!  

Next Post

बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली – कृषी मंत्री दादाजी भुसे

Next Post
dadaji bhuse

बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली - कृषी मंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!