मुक्तपीठ टीम
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक कार बनवली आहे. या ई-कारची सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे विंटेज लूक असणारी ही इलेक्ट्रिक कार वाहन उत्पादकांच्या इलेक्ट्रिक कारपेक्षा खूपच स्वस्त आहे. या कारमध्ये ड्रायव्हरसह ५ लोक बसू शकतात आणि दिसायला खूपच आकर्षक आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये १८५ किमी धावते. विशेष म्हणजे ही कार चालू असतानाच चार्जही करता येते.
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची ई-कार निर्मिती
- इंजिनीअरिंगचा विद्यार्थी हिमांशू भाई पटेल यांचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक कार अवघ्या ३० रुपयांमध्ये १८५ किमीपर्यंतचे अंतर पार करेल.
- कारचा टॉप स्पीड ५० किलोमीटर प्रति तास आहे.
- हिमांशूने ५ महिन्यांच्या मेहनतीनंतर ही कार तयार केली आहे.
- हिमांशू गुजरातमधील गांधीनगर येथे शिकत आहे. आणि तो सागर जिल्ह्यातील मकरोनिया येथील रहिवासी आहेत.
कार बनवण्यासाठी घेण्यात आलेले श्रम आणि लागलेला खर्च
- देशातील विविध वाहन उत्पादक कंपन्यांनी अनेक इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत.
- हिमांशूने बनवलेली ही कार सध्या बाजारात असलेल्या इतर कारच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे.
- हिमांशू भाई पटेल यांनी सांगितले की, ही कार बनवण्यासाठी २ लाख रुपये खर्च आला आहे.
ई-कारच्या बॅटरी आणि चार्जिंगविषयीचे महत्त्वाचे मुद्दे
- या इलेक्ट्रिक कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे ४ तास लागतात.
- या इलेक्ट्रिक कारची बॅटरी विजेने चार्ज करण्यासाठी ३० रुपये खर्च येतो. विशेष म्हणजे रिमोट कंट्रोलने कार सुरू आणि थांबवताही येते.
कारचे जबरदस्त फिचर्स
- कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्पीड मीटर, बॅटरी पॉवर मीटर, फास्ट चार्जरसह अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.
- कार रिव्हर्स करण्यासाठी बटण देण्यात आले आहे.
- सुरक्षा फिचर्स म्हणून, चोरीपासून संरक्षण करण्यासाठी अलार्म देखील आहे.
- शॉर्टसर्किट झाल्यास, कारमध्ये बसवलेले एमसीबी ट्रिप होईल, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळला जाईल.