Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडणूक प्रतिज्ञापत्र खटल्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आरोप निश्चित

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
devendra fadanvis

मुक्तपीठ टीम

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपुरातील कनिष्ठ न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. २०१४मधील विधानसभा निवडणुकीच्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्याविरोधातील दोन गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागपुरातील वकील सतीश उके यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही.एम.देशमुख यांच्या न्यायालयाने शनिवारी फडणवीसांविरोधात आरोप निश्चित केले. परंतु, फडणवीस यांच्या वकिलांनी हे आरोप मान्य नसल्याची भूमिका न्यायालयात मांडली.

 

नेमकं काय आहे प्रकरण?

  • देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरोधातील गुन्ह्यांची माहिती त्यांनी दिलेली नाही, असा आरोप आहे.
  • त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करणारी वकील सतीश उके यांनी केली आहे.
  • त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
  • न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले.

 

न्यायालयाकडून काय विचारणा?

  • आरोपींविरुद्ध (म्हणजे फडणवीस) प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • फडणवीस यांची उपस्थिती आवश्यक आहे का, हेही ऐकले.
  • फडणवीस यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०५ अन्वये न्यायालयात वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट मिळावी आणि त्यांचे वकील उदय डबले हजर राहून त्यांच्या वतीने आरोपांना उत्तर देतील असे प्रतिज्ञापत्र अर्ज दाखल केला होते.
  • न्यायालयाने त्यांचा अर्ज स्वीकारला आहे.
  • न्यायालयाने विचारणा केली असता, फडणवीसांच्या वकिलाने गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले.
  • फडणवीस यांना आरोप योग्य प्रकारे समजले आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीत याचिका आणि निवेदन दाखल करण्यात कोणताही पूर्वग्रह नाही आणि भविष्यातही ते वाद घालणार नाहीत, असे शपथपत्र दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

 

न्यायालयाने मागितली साक्षीदारांची यादी

  • न्यायालयाने या प्रकरणातील फिर्यादीला साक्षीदारांची नवीन यादी सादर करण्यास सांगितले.
  • उके यांनी असा युक्तिवाद केला आहे की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये आपल्यावरील दोन प्रलंबित गुन्हेगारी खटले उघड न करून खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.
  • फडणवीस यांच्यावर १९९६ आणि १९९८ मध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
  • उमेदवाराविरोधातील प्रत्येक गुन्ह्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देणे आवश्यक असतानाही त्यांनी २०१४च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्या दोन गुन्ह्यांची माहिती दिलेली नाही.

 

सर्वोच्च न्यायालयानेही नाही रोखली न्यायालयीन कार्यवाही…

  • अॅड. सतीश उके यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे दडवल्याप्रकरणीच्या तक्रारीविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागितली होती.
  • मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नकार देत उके यांच्या तक्रारीनुसार नागपूर कनिष्ठ न्यायालयात चालवण्यास सांगितले.
  • त्याविरोधात फडणवीस यांनी पुनर्विलोकन याचिकाही दाखल केली होती.
  • पण सर्वोच्च न्यायालयाने ती पुनर्विलोकन याचिकाही फेटाळली.
  • त्यानंतर नागपूर कनिष्ठ न्यायालयात न्या. व्ही.एम.देशमुख यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे.

Tags: devendra fadnavisदेवेंद्र फडणवीसनागपुरसतीश उके
Previous Post

क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील ‘२२ वी किलर स्क्वॉड्रन्स’ तुकडीला प्रेसिडेंट’स स्टॅंडर्ड विशेष सन्मान प्रदान केला जाणार

Next Post

वैद्यकीय क्षेत्रात समर्पण भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next Post
वैद्यकीय क्षेत्रात समर्पण भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

वैद्यकीय क्षेत्रात समर्पण भावनेने कार्य करताना संशोधनही होणे गरजेचे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!