मुक्तपीठ टीम
आजपासून अनेक खाद्यपदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत १८ जुलैपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार असल्याची माहिती समोर आली. यानुसार आजपासून पॅकबंद आणि लेबल केलेले पीठ, पनीर आणि दहीवर पाच टक्के जीएसटी लागू करण्यात आले आहे.
हे बदल आजपासून लागू…
- हा निर्णय गेल्या महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ४७ व्या जीएसटी बैठकीत घेण्यात आला.
- पॅकबंद आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखाना, कोरडे सोयाबीन, मटार यांच्या खरेदीवर आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे.
- आता ५ हजार रुपयांपेक्षा जास्त भाड्याने असलेल्या रुग्णालयाच्या रुमवरही ५ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.
- चेकबुक जारी करताना बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी.
- दररोज १ हजार रुपयांपेक्षा कमी भाड्याने असलेल्या हॉटेलच्या खोल्यांवर १२ टक्के जीएसटी.
- टेट्रा पॅकवरील दर १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
- प्रिंटिंग/ड्राइंग इंक, एलईडी दिवे यांवर र १२ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी.
- मॅप, अॅटलसवर १२ टक्के जीएसटी भरावा लागेल.
- ब्लेड, चाकू, पेन्सिल शार्पनर, चमचे, काट्याचे चमचे, स्किमर इत्यादींवर १८ टक्के जीएसटी.
- पिठाची गिरणी, डाळ यंत्रावर ५ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी.
काय स्वस्त आहे ?
- ओस्टोमी उपकरणे आणि रोपवेद्वारे माल आणि प्रवाशांच्या वाहतूकवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी लागू होईल.
- ट्रक, मालवाहतुकीचे भाडे जेथे इंधनाच्या किमतीचा समावेश असेल तेथे आता १८ टक्क्यांच्या तुलनेत १२ टक्के दर लागू होईल.
- इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी पॅकने सुसज्ज असोत किंवा नसोत, पाच टक्के सवलतीच्या जीएसटी दरास पात्र असतील.