Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंद्रपुरच्या रामाळा तलावाची लवकरच प्रदुषणमुक्ती

March 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
ramala talav

मुक्तपीठ टीम

 

चंद्रपुर येथील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. तलावात मिसळणाऱ्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करणे व तलाव स्वच्छ करणे याबाबत लघु, मध्यम व दीर्घ स्वरुपाचा कृती आराखडा तयार करुन ७ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना दिले. तसेच तलाव स्वच्छ करणे या बाबीला प्राथमिकता देऊन हे काम लवकरात लवकर होईल याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देशही आदित्य ठाकरे यांनी दिले.

 

ऑनलाईन झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, ईकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोत्रे उपस्थित होते.

 

“रामाळा तलाव चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असून सुमारे ६०० वर्षे जुना आहे. तलावात आजुबाजुच्या वस्तीतून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी तसेच लगतच्या रेल्वे डेपोमधून येणारे सांडपाणी मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले असून संपूर्ण तलाव जलपर्णीने भरला आहे. तलावातील पाणी स्वच्छ करण्याचा तसेच तलावातील गाळ काढण्याचा मागील १०-१२ वर्षापासून प्रयत्न होत असून तलाव पूर्णत: स्वच्छ करणे व गाळ काढण्याचे काम अद्यापपावेतो पूर्ण झालेले नाही. तलाव स्वच्छ करणे व आजुबाजुचा परिसर सुशोभित करण्याकरिता अंदाजे ४०.५० कोटी रुपये इतका निधी आवश्यक आहे”, अशी माहिती यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

 

रामाळा तलाव स्वच्छतेसंदर्भात काम हाती घेतल्याने उपोषणास न बसण्याबाबतच्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विनंतीनुसार इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी उपोषणास न बसण्याबाबत मान्य केले.


Tags: इकोप्रो संस्थाचंद्रपूरपर्यटनमंत्री आदित्य ठाकरेबंडु धोत्रेरामाळा तलाव
Previous Post

ऑनलाइन बैठकीत मंत्रीमहोदयांचा पारा का चढला?

Next Post

नीलम गोऱ्हेंच्या मध्यस्थीनंतर लक्ष्मण गायकवाडांनी सोडले उपोषण

Next Post
neelam gorhe

नीलम गोऱ्हेंच्या मध्यस्थीनंतर लक्ष्मण गायकवाडांनी सोडले उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!