Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑक्सिजन पुरवठ्याच्या झटपट निर्णयासाठी चंद्रकांत पाटलांनी मानले मोदींचे आभार

April 25, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
pm narendra modi (2)

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शनिवारी ऑक्सिजनसाठीच्या उपकरणांवरील आयातकर व आरोग्य सेस तीन महिन्यांसाठी पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रासाठी आठ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून देण्याचा पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (पीपीसीआर) या नागरिकांच्या उपक्रमाचा प्रयत्न यशस्वी होईल. प्राणवायूच्या उपलब्धतेसाठी झटपट निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष आणि पीपीसीआरचे समन्वयक उद्योजक सुधीर मेहता यांनी महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांसाठी हजारो ऑक्सिजन सिंगापूर येथून मागविण्याची कल्पना मांडली. ही उपकरणे तेथे उपलब्ध असून झटपट आणता येतील, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी पीपीसीआर पुढाकार घेईल आणि सिंगापूर येथील जागतिक गुंतवणूकदार कंपनी टेमासेकच्या सहाय्याने आयात करेल, अशी त्यांनी तयारी दर्शविली. कोरोना रुग्णांना अत्यंत उपयुक्त ठरू शकतील असे 8043 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स मागविण्याची त्यांची योजना आहे. त्यासोबतच बीआयपीएपी या ऑक्सिजन पुरवठ्यासाठीच्या अन्य उपकरणाची सुमारे साडेतीन हजार युनिटही आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण यासाठी सर्वात मोठा अडथळा आयातकराचा होता. कोट्यवधींचा आयातकर भरायचा झाला तर हा प्रयत्न सफल होणे अवघड होते.

ते म्हणाले की, ऑक्सिजन उपकरणांची आयात केल्यास त्यावर केंद्र सरकारने तीन महिन्यांसाठी करात सूट द्यावी, अशी विनंती मा. सुधीर मेहता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल यांना पत्र विनंती पत्र पाठविले. सध्याच्या कोरोनाच्या संकटात नागरिकांकडून चांगला प्रयत्न होत असल्याने त्याला पाठिंबा म्हणून आपणही  पंतप्रधानांना पत्र पाठविले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारचा करात सूट देण्याचा निर्णय झाला. ऑक्सिजन उपकरणांची आयात करताना काही प्रशासकीय अडथळा येणार नाही, याची खात्री करण्यासाठी कस्टम विभागातील एका सह सचिवाला विशेष जबाबदारी देण्याचीही सूचना पंतप्रधानांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत संवेदनशीलतेने व गतीने या बाबतीत निर्णय घेतल्याबद्दल आपण त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचाही आपण आभारी आहोत.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या महासाथीच्या संकटात सरकार व नागरिकांनी सहकार्याने काम करण्याची गरज आहे. पुण्यातील उद्योजकांनी या बाबतीत पुढाकार घेऊन सध्या चालू असलेल्या सेवाकार्यात मोलाची भर घातली आहे.


Tags: BJPchandrakant patilPM Narendra modiऑक्सिजन पुरवठापंतप्रधान नरेंद्र मोदीभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलभारतीय जनता पार्टी
Previous Post

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

मुंबई महानगर क्षेत्रात हवेतून ऑक्सिजनच्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात

Next Post
eknath shinde

मुंबई महानगर क्षेत्रात हवेतून ऑक्सिजनच्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!