Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सावरकरांचे सामाजिक समतेचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

May 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
chandrakant patil

मुक्तपीठ टीम

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सामाजिक समतेसाठी प्रत्यक्ष कृती केली आणि फार मोठा विचार मांडला. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

 

स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा, महाराष्ट्रचा शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ आणि आदर्श शैक्षणिक समूह, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सावरकर एक गौरव गाथा’, या ऑनलाईन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बोलत होते. यावेळी स्वा. सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, प्रकोष्ठचे संयोजक अमित कुलकर्णी, सहसंयोजक व आदर्श शैक्षणिक संस्था पनवेल या संस्थेचे प्रमुख विसपुते, सहसंयोजक भारत खराटे आणि स्वरदा फडणीस उपस्थित होते.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध असताना स्वा. सावरकरांनी १९२४ ते १९३७ या कालावधीत सामाजिक सुधारणांसाठी ऐतिहासिक कार्य केले. त्यांनी समाजातील चुकीच्या रूढी व परंपरांवर आघात केला व सामाजिक समतेचा फार मोठा विचार मांडला. जातीभेद संपत नाही आणि स्त्री पुरुष भेद संपत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असे मत त्यांनी मांडले. आज परिस्थिती बदलली असली तरी लोकांची मनस्थिती बदललेली नाही. त्यामुळे सामाजिक समतेबद्दलचे सावकरांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता आहे.

 

ते म्हणाले की, सावरकरांनी सामाजिक समतेचा विचार मांडला आणि प्रत्यक्ष कृतीही केली. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात विविध जातीच्या लोकांची सहभोजने केली तसेच विठ्ठल मंदिर सर्व जातींच्या लोकांना खुले असावे म्हणून आंदोलन केले. सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रवेशास परवानगी असलेले पतीत पावन मंदिर स्थापन केले.

 

स्वा. सावरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून रत्नागिरीतील पतित पावन मंदिर ते मुंबईतील चैत्यभूमी अशी यात्रा काढण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्या काळात सावरकरांविषयी खूप वाचले. त्यांनी जी मते मांडली ती आगामी काळात खरी ठरली. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आपण प्रभावित झालो, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी सांगितली.

 

आपले राष्ट्र सामर्थ्यशाली हवे. दुबळे राष्ट्र विकास करू शकत नाही, असे सावकरांचे ठाम मत होते. अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संरक्षणाबद्दल ठाम पावले टाकल्यामुळे भारत कोणत्याही देशाशी संघर्ष करू शकतो, असा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.

 


Tags: BJPchandrakant patilprime minister narendra modiचंद्रकांत पाटीलपंतप्रधान नरेंद्र मोदीस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
Previous Post

“मराठा समाजाने हक्काचे मागितले तर काँग्रेसला राग का येतो?”

Next Post

“सिडको महागृहनिर्माण योजनेमधील रद्द अर्जदारांना वाटपपत्रांचे पुनर्वाटप होणार”

Next Post
CIDCO

"सिडको महागृहनिर्माण योजनेमधील रद्द अर्जदारांना वाटपपत्रांचे पुनर्वाटप होणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!