Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“भाजपा संघटन वाढीसह कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की करावी!”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा संकल्प

April 6, 2021
in घडलं-बिघडलं
0
chandrakant patil

मुक्तपीठ टीम

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन यंदा साजरा होत असताना भविष्याच्या दृष्टीकोनातून संघटना वाढीसह पक्षातील नव्या कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की होणे गरजेचे आहे. त्यासाठी अभ्यास वर्गाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जावेत, असा संकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

 

भारतीय जनता पक्षाच्या ४१ व्या स्थापना दिनानिमित्त पुणे शहर भाजपा कार्यालयात आयोजित व्हर्चुअल रॅलीला पाटील संबोधित करत होते. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते.

 

पाटील म्हणाले की, आगामी काळात भाजपा विरुद्ध इतर असाच राजकीय आणि वैचारिक संघर्ष होणार आहे. छत्तीसगडमधील घटना अतिशय वेदनादायीच आहे. देशभरात एक सुप्त संघर्ष सुरु आहे. हे सुप्त संघर्ष निर्माण करणारे स्लीपर सेल अतिशय शांतपणे आपल्या विरोधात संघर्ष निर्माण करत आहेत. त्यामुळे आगामी काळात जो वैचारिक संघर्ष होईल, तो प्रामुख्याने आपण विरुद्ध इतर असाच होणार आहे.

 

ते म्हणाले की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण स्वबळावर लढून आपल्याला १२२ जागा मिळाल्या. या निवडणुकीत आपल्याला एक कोटी ४७ लाख मते मिळाली. २०१९ च्या निवडणुकीत शंभर जागा कमी लढूनही आपल्याला एक कोटी ४२ लाख मते मिळाली. २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवून, दोन कोटी पेक्षा जास्त मते मिळवायची आहेत. यासाठी बूथ रचना अतिशय सक्षम झाली पाहिजे.

 

गिरीश बापट म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कोणी एका व्यक्तीने स्थापन केलेला नाही. त्यामुळे कुठल्याच एखाद्या कुटुंबाची यावर मालकी राहिलेली नाही. हा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष राहिला आहे. आपल्या नेत्यांनी देखील आपल्या कामामधून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. त्यामुळे कार्यकर्ता हा या पक्षाचा प्राण आहे. कारण, आपली वैचारिक बैठक पक्की आहे.

 

महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ आणि पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश घोष यांनी केले.

 

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या ४१ व्या स्थापना दिनानिमित्त प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

यावेळी प्रदेश कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी, कार्यालय सह-प्रभारी सुमन घैसास, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक तसेच प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Tags: BJPउमा खापरेकेशव उपाध्येगिरीश बापटचंद्रकांतदादा पाटीलभारतीय जनता पक्षविश्वास पाठक
Previous Post

कोरोना निर्बंधांमुळे अस्वस्थता, नव्याने निर्णय घेण्याची फडणवीसांची मागणी

Next Post

बाबासाहेबांची जयंती गर्दी टाळत, शिस्तीचे दर्शन घडवत साजरी करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

Next Post
Uddhav Thackeray

बाबासाहेबांची जयंती गर्दी टाळत, शिस्तीचे दर्शन घडवत साजरी करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!