Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अहो आश्चर्यम! शिवसेनेच्या ‘सामना’त भाजपाच्या चंद्रकांत पाटलांचा लेख!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
saamna & patil

मुक्तपीठ टीम

(दै. सामनात आज चमत्कार घडला आहे. शिवसेनेवर आणि त्यातही दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी नेहमीच ज्यांचा राजकीय सामना रंगतो ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा लेख सामनाने प्रकाशित केला आहे. अर्थात त्यालेखासोबत संजय राऊतांची त्यांच्या शैलीतील टिपणी आहेच. (तीही ‘मुक्तपीठ’ने स्वतंत्र प्रकाशित केली आहे.)

 

चंद्रकांत पाटलांचा दैनिक सामनामधील लेख

तुम्ही मला सातत्याने भरपूर प्रसिद्धी मिळवून देता . राजकारणात प्रसिद्धी महत्त्वाची असते . ‘एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी ‘ , असे राजकारणासाठी म्हणतात . तुम्ही माझ्यावर नियमित टीका करता आणि त्याची चर्चा मीडिया करते , मग मला आपसूक प्रसिद्धी मिळते . प्रसिद्धीच्या बाबतीत आम्ही संघवाले तसे कच्चे आहोत . आम्हाला संघात शिकवले जाते की , ‘ अच्छा कर और कुएं मे डाल . ‘ म्हणजे चांगले काम करा आणि विसरून जा . संघात प्रसिद्धी आणि स्वतःचे बॅडिंग असे विषय वर्ज्य असतात . त्यामुळे संघ ही जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना असूनही कोठेही प्रसिद्धीचा बडेजाव नसतो . माझ्यासारख्या संघ स्वयंसेवकाला हे प्रसिद्धीचे प्रकरण मोठे अवघड जाते . पण संजय राऊत , तुम्ही माझ्यावर टीका करता आणि आपसूक प्रसिद्धी मिळते . आता मी संघाचे नाही तर एका राजकीय पक्षाचे काम करतो . राजकारणात संघासारखे प्रसिद्धीपराङ्मुख असून चालत नाही . म्हणजे प्रसिद्धीकडे पाठ फिरवून चालत नाही . हो , जरा वेगळा शब्द वापरला की तुम्हाला अर्थ सांगावा लागतो . राजकारणात प्रसिद्धी तर हवीच . ती तुम्ही मला मिळवून देता म्हणून तुमचे आभार .

 

मी तुम्हाला उत्तर देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही!

मी तुम्हाला उत्तर देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही , असे म्हणण्याचे कारण की , मी महाराष्ट्रातील सर्वात मोठया पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे . माझ्या अध्यक्षतेखाली भाजपाने तुमच्या पक्षासोबत युती करून विधानसभा निवडणूक पूर्ण बहुमताने जिंकली आहे . मी पाच वर्षे राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो . आयुष्यातील उमेदीच्या काळात तारुण्यातील अनेक दशके अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम केले आहे . काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर टीका केली तर मी त्याला उत्तर देणे हे बरोबरीचे झाले असते . ते राजकारणातील प्रोटोकॉलला धरून झाले असते . पण तुमचे तसे नाही . तरीही तुमचे आभार मानतो . तसे तुमचे आभार मानण्याचे बरेच दिवस डोक्यात होते . कारण तुम्ही वारंवार मला अग्रलेखातून लक्ष्य करता . तुम्ही अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या बडय़ा नेत्यांवर टीका करता आणि माझ्यावरही टीका करता त्यामुळे मला बडय़ा नेत्यांच्या रांगेत नेण्याचा सन्मानही देता . त्याच पद्धतीने आज तुम्ही ‘ तोंडास फेस , कोणाच्या ? ‘ या शीर्षकाचा अग्रलेख लिहून मला पुन्हा प्रसिद्धी मिळवून दिली आहे . आता मात्र तुमचे आभार मानलेच पाहिजेत असे वाटल्याने हे पत्र लिहिले .

 

ईडीचा अनुभव येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो!

तुम्ही अग्रलेखात लिहिले आहे की , ‘ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की , ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल . पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला ? संजयराव, तुमचा प्रश्न रास्त आहे . मला ईडीचा अनुभव नाही . तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो . आर्थिक गैरव्यवहार केले की , ईडीचा अनुभव येतो . तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता . अखेर बरीच धावपळ करून , ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात . हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार . असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला , पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे .

 

एका आरोपात मुश्रीफ आडवे!

कोल्हापूरचा पहेलवान गडी मुश्रीफ तर कुणाला ऐकणार नाही , असाही दावा संजयराव तुम्ही अग्रलेखात केला आहे . पण वस्तुस्थिती वेगळीच आहे . किरीट सोमय्या यांनी एक आरोप केला तर मुश्रीफ थेट बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तेच आडवे झाले . मग हे गडी पहेलवान कसे आहेत , हे तरी सांगा .

 

कोल्हापुरातील शिवसेनेच्या पराभवाचा तुम्हाला आनंद?

संजय राऊत तुम्ही अग्रलेखात एक षटकार ठोकला आहे त्याचा उल्लेख तर करायलाच हवा . हसन मुश्रीफांचे कौतुक करता करता तुम्ही म्हटले आहे , “ कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरूडला विजय मिळवावा लागला . ” कमाल आहे ! आमचे काय झाले आम्ही बघून घेऊ , पण कोल्हापूर जिह्यात शिवसेनेचाही पराभव झाला त्याचा तुम्हाला आनंद झाला की काय ? कालची विधानसभा निवडणूक कोल्हापूर जिह्यात भाजपा शिवसेनेबरोबर युती करून आणि जागावाटप करूनच लढली होती , हे विसरलात की काय ? या निवडणुकीत कोल्हापूर जिह्यात शिवसेना सहापैकी पाच जागांवर पराभूत झाली आणि एकच आमदार उरला , हे माहितीसाठी . सध्या तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली माहिती असते . पण शिवसेनेचा विसर पडला , असे वाटल्याने सांगितले . तुमचे हे असे वागणे आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचा उदो उदो करताना तुम्ही शिवसेनेलाही सुपडा साफ म्हणायला कमी करत नाही .

 

राष्ट्रवादी अडचणीत आल्यावर उसळता, तसे शिवसेनेसाठी नाही!

त्यामुळेच असेल कदाचित , राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री अडचणीत आल्यावर तुम्ही उसळलात आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून हल्ला केलात . पण अशी तत्परता तुम्ही शिवसेनेचे नेते अडचणीत आल्यावर दाखवत नाही . शरद पवारांवर कोणी टीका केली की त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे तुम्ही अंगावर येता . त्यामुळेच तुम्हाला शिवसेनेत कोणी गांभीर्याने घेत नाहीत , असे दिसते . तुमच्या मध्यस्थीने आणि पुढाकाराने शिवसेनेने भाजपासोबतची विजयी युती तोडली आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता मिळवली . पण तुमच्या उद्योगामुळे शिवसेना किती अडचणीत आली याची तुम्हाला पर्वा नाही . उद्धवरावांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली , पण खरे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले . शिवसेनेच्या इतर बहुतांश नेत्यांना तर खुर्चीसुद्धा मिळाली नाही . या प्रकारात शिवसेनेचा मूळ मतदार नाराज झाला आणि काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस तर उभेही करत नाहीत . अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पक्षाला ‘ ना घर का ना घाट का ‘ , असे करून ठेवले . भाजपाचे नुकसान करणारया शिवसेनेची राजकीय पत तुम्ही संपवलीत . तुम्ही सातत्याने शरद पवारांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भजन करत असता त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही . तुम्ही पलटी मारली असेल तर तो तुमच्या पक्षप्रमुखांचा प्रश्न आहे .

 

सज्जनांच्या टीकेचा धोका, तुमच्यासारख्यांमुळे फायदाच!

असो . तरीही तुमचे आभार . कारण तुमच्यामुळे संघ परिवार संतापला आहे , भाजपाचा मतदार दुखावला आहे आणि शिवसेनेचा मतदार अस्वस्थ झाला आहे . त्यामुळे तुम्ही जेव्हा माझ्यावर टीका करता त्यावेळी या सर्व घटकांमध्ये माझ्याबद्दल चांगला मेसेज जातो . राजकारणात मित्र कोण आहेत या इतकेच शत्रू कोण आहेत हेसुद्धा महत्त्वाचे असते . किंबहुना ते अधिक महत्त्वाचे असते . राजकारणात ‘ निगेटिव्ह पब्लिसिटी’चाही उपयोग असतो . फक्त तशी टीका योग्य ठिकाणाहून व्हावी लागते . सज्जनांनी टीका केली तर धोका असतो . तुमच्यासारख्यांच्या टीकेचा फायदाच होतो . धन्यवाद .

– चंद्रकांत पाटील
(प्रदेशाध्यक्ष, भाजपा-महाराष्ट्र)

ट्विटर @ChDadaPatil

 

हे ही वाचा: “‘सामना’चे धन्यवाद ! चंद्रकांतदादांच्या लेखणीला फेस ! अहंकाराचे बुडबुडे”!!


Tags: BJPchandrakant patilsaamanashivsena sanjay rautचंद्रकांत पाटीलदै. सामनाभाजपासंजय राऊत
Previous Post

जुन्या स्मार्टफोननाही गुगलचा दिलासा! मालवेअर, फोन हॅकिंगपासून सुरक्षा!

Next Post

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ४१ जागांसाठी अॅप्रेंटिसशिप संधी

Next Post
mahaparekshan

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ४१ जागांसाठी अॅप्रेंटिसशिप संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!