मुक्तपीठ टीम
आयकर विभागाने ITR-U भरणं राहून गेलेल्यांसाठी अपडेटेड रिटर्नची संधी आहे. आयकर खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यासाठी करदात्यांना दोन वर्षांसाठी असे अपडेटेड रिटर्न भरता येईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२० चा अर्थसंकल्प सादर करताना अपडेटेड रिटर्नच्या संधीची घोषणा केली होती. जर, तुम्ही आर्थिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ साठी कोणत्याही कारणास्तव रिटर्न भरले नाहीत, तर तुम्हाला अजूनही संधी आहे…
अपडेटेड रिटर्न (ITR-U) म्हणजे काय?
- वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त विधेयक २०२२ मध्ये प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९(8A) अंतर्गत अपडेटेड रिटर्नची घोषणा केली होती.
- या अंतर्गत, मूल्यांकन वर्ष संपल्यापासून पुढील २४ महिन्यांच्या आत कोणत्याही आर्थिक वर्षासाठी अपडेटेड रिटर्न (ITR-U) भरता येईल.
- २०१९-२० या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
- जर करदात्याने मूळ रिटर्न, विलंबित रिटर्न किंवा सुधारित रिटर्न भरले नसेल, तर तो ITR-U देखील दाखल करू शकतो.
ITR-U अपडेटेड रिटर्न भरण्याची संधी कधी आहे?
- नियमांनुसार, आर्थिक वर्ष २०१९-२० चे मूल्यांकन वर्ष ३१ मार्च २०२१ रोजी संपेल.
- त्यांना ३१ मार्च २०२३ पर्यंत आयटीआर अपडेट दाखल करण्याची संधी आहे.
- त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी मूल्यांकन वर्षाची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ रोजी संपली.
- अशा करदात्यांना ३१ मार्च २०२४ पर्यंत अपडेट रिटर्न भरण्याची संधी आहे.
अपडेटेड आयटीआर रिटर्नचे कारणही द्यावे लागणार
- करदात्याला अद्ययावत विवरणपत्र भरायचे असेल, तर त्याला/तिने त्याची कारणे द्यावी लागतील.
- येथे आठ प्रकारची कारणे सांगितली आहेत.
- या कारणांमुळे रिटर्न न भरणे, उत्पन्नाची अचूक माहिती न देणे असे पर्याय देण्यात आले आहेत.
- तसेच, करदात्याला प्राप्तिकर रिटर्नच्या विविध फॉर्ममध्ये यासाठी योग्य फॉर्म निवडावा लागतो.
५० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर जमा करावा लागेल
- अपडेट रिटर्न भरल्यावर दंड जमा करावा लागेल.
- मूल्यांकन वर्ष संपल्यापासून १२ महिन्यांच्या आत ITR-U दाखल केल्यास, २५% अतिरिक्त कर आकारला जाईल.
- अपडेटेड रिटर्न १२ महिन्यांनंतर आणि २४ महिन्यांच्या आत भरल्यास ५० टक्के अतिरिक्त कर आकारला जाईल.
- तुमच्याकडे काही अतिरिक्त कर दायित्व असल्याशिवाय हे विवरणपत्र दाखल केले जाऊ शकत नाही.