Tuesday, May 20, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“१० ते १२ जून या कालावधीत ठाणे जिल्हयात अतिवृष्टी होण्याची शक्यता”

नागरिकांनी अलर्ट राहण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

June 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
Thane

मुक्तपीठ टीम

ठाणे जिल्हयातील १० ते १२ जून २०२१ पर्यंत या काळात सोसाट्याचा वारा आणि अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे अचानक येणारा पूर किंवा भरतीच्या काळात अधिक पाऊस झाल्यास काही भाग जलमय होण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका संभवतो. तरी ग्रामस्थांनी अलर्ट राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी

मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये अजिबात जावू नये.अतिमहत्त्वाचे काम असल्याखेरीज कुणीही घराच्या बाहेर पडू नये. आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तसेच समुद्र, खाडी, नदी किनारी धोकादायक भागात / पूर क्षेत्रात असल्यास तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबतघेवून स्थलांतरीत व्हावे. आपले घर दरड कोसळण्याच्या भागात असेल / तिव्र उतारावर असेल / सैल मातीच्या भागात असेल किंवा धोकादायक धरणाच्या खालील भागात असेल तर तात्काळ जवळच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे.

 

घराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तु, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासून लांब रहावे.आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे. तसेच जनावरांना कुठल्याही पध्दतीने बांधून ठेवू नये.

 

आपले जवळ केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल), बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तु उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी दुरचित्रवाणी वरील बातम्या तसेच भ्रमणध्वनीवरील अधिकृत मेसेजेस आणि जिल्हा प्रशासनाकडून मिळणाऱ्या संदेश पाहावेत. सोबत आवश्यक अन्न धान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.पिण्याचे पाणी शुध्दीकरण करुन वापरावे. उदा. पाणी उकळून प्यावे. पाण्यात मेडीक्लोर मिसळावे. डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी मच्छर अगरबत्ती / मच्छरदाणीचा वापर करावा.

 

ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात. सद्यस्थितीत जिल्हयात Covid Quarantine / isolated असलेले नागरीक व वादळवाराचे पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित स्थळी पाठवतांना एकमेंकात मिसळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्वाचा असल्यामुळे प्रथम जिवीतास प्राधान्य द्यावे.

 

मदत आवश्यक असल्यास आपले महानगरपालिका/जिल्हा नियंत्रण कक्षातील खालील दुरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा.

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे – ०२२-२५३०१७४०/२५३८१८८६, ठाणे महानगरपालिका – ०२२-२५३७१०१०, नवी मुंबई महानगरपालिका – ०२२-२७५६६१६२, कल्याण – डोंबिवली डोंबिवली महानगरपालिका – ०२५१-२२११३७३, मिरा भाईदर महानगरपालिका ०२२-२८११७१०२/०४
उल्हासनगर महानगरपालिका – ०२५१-२७२०१४३, भिवंडी निजामपूर महानगरपालिका – ०२५२२-२३२३९८ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राजेश नार्वेकर यांनी केले आहे.


Tags: Heavy rainthaneजिल्हाधिकारी कार्यालयठाणे
Previous Post

“स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ”

Next Post

राज्यात १६ हजार रुग्ण कोरोनामुक्त! नंदुरबारमध्ये ३, भंडाऱ्यात ७ नवे रुग्ण! 

Next Post
MCR 1-5-21

राज्यात १६ हजार रुग्ण कोरोनामुक्त! नंदुरबारमध्ये ३, भंडाऱ्यात ७ नवे रुग्ण! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!