Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भगवानदादा: चाळीतून चाळीत…आपल्या अस्सल स्टायलीत बॉलिवूडला नाचवणारा डांसिंग स्टार!

चाळीतले टॉवर - भाग १९

September 6, 2026
in प्रेरणा
0
chalitale tower

डॉ.जितेंद्र आव्हाड

दादरच्या हिंदमातापासून अवघ्या पाच-सात मिनिटांच्या अंतरावर ‘लल्लूभाई मॅन्शन’ उभी आहे. या इमारतीने एका ताऱ्याचा उदय आणि अस्तही पाहिला आहे. त्याचे नाव मास्टर भगवान ऊर्फ भगवानदादा.

 

एका गिरणी कामगाराचा, आबाजी पालव यांचा हा मुलगा. चाळीत राहणारा. परळ-दादरमध्ये बालपण गेलेले. शिक्षण तसे कमीच. चौथीपर्यंत. घरची परिस्थितीही बेतास बातबात; पण त्याच्या मोठमोठ्या डोळ्यांत स्वप्ने होती. आकाशाला गवसणी घालण्याची. सिनेमाच्या चमचमत्या दुनियेतील तारा बनण्याची. त्याच्या नजरेसमोर आदर्श होता मास्टर विठ्ठल यांचा. मूकपटातील गाजलेले अभिनेते ते. तेव्हाचे ही-मॅनच. ‘इंडियन डग्लस’ म्हणायचे त्यांना. त्यांची बलदंड शरीरयष्टी, त्यांच्या चित्रपटांतील त्या हाणामाऱ्या यांचे मोठे आकर्षण होते भगवानदादांच्या मनात. शाळा सुटलेली होती, व्यायामशाळा सुरू झाली होती. मास्टर विठ्ठल यांच्यासारखे बलदंड व्हायचे होते त्यांना. त्या काळात छोटी-मोठी कामे करायचे ते आणि त्यातून वेळ काढून चित्रपटांचे स्टुडिओ गाठायचे, कोणी काम देईल या आशेवर.

 

ते ज्या गिरणगावात राहत होते, तो अवघा भाग तेव्हा राजकीय विचारांनी भारलेला होता. दादांनाही त्या विचाराने आकर्षित केले होते. राष्ट्र सेवा दलाची पूर्वसुरी असलेल्या हिंदुस्थानी सेवा दल या संघटनेचे काम ते करीत असत. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहातही त्यांनी भाग घेतला होता. त्याच वर्षी त्यांना एका मूकपटात काम मिळाले. ‘सिराज अली हकीम’ या चित्रपट निर्मात्याने त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांना संधी दिली. व्हिक्टर ह्युगोच्या ‘द हंचबॅक ऑफ नोत्र-डाम’ या कादंबरीवर आधारलेल्या ‘बेवफा आशिक’ या चित्रपटातील कुबड्या तरुणाची विनोदी भूमिका त्यांनी साकारली. ती इतकी जमून गेली होती की, पुढे सहा महिने त्यांना काम मिळेना. लोक त्यांना खरोखरच कुबड़ा समजत होते.

 

पुढे त्यांना मूकपटात कामे मिळत गेली आणि १९३४ मध्ये ते बोलपट निर्मितीत उतरले. त्या पहिल्या चित्रपटाचे नावही मोठे समर्पक होते – हिंमत-ए-मर्दा. त्यानंतर त्यांनी हंसा वाडकर यांच्याबरोबर ‘बहादूर किसान’ या चित्रपटात काम केले. तो चित्रपट गाजला. त्या चित्रपटात त्यांचे सहायक होते रामचंद्र चितळकर तथा सी. रामचंद्र त्यांना संगीतकार म्हणून पहिला ब्रेक दिला तो भगवानदादांनी त्या चित्रपटाचे नाव होते- अलबेला.

 

साल १९५१. त्यात दादांची नायिका होती गीता बाली. प्रचंड गाजला हा चित्रपट, त्यातील ‘भोली सूरत दिल के खोटे’, ‘शोला जो भडके’, ‘धीरे से आजा रे अखियन में’ या गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि त्यातील दादांची नृत्यअदा; ती तर ‘आयकॉनिक’ बनली. या चित्रपटाने दादांना नामवंत केले, श्रीमंत केले. ऐश्वर्य इतके मिळाले की आता या चाळकरी तरुणाच्या मालकीचा जुहूत समुद्रकिनारी २५ खोल्यांचा बंगला होता. दारात सात मोटारींचा ताफा होता. आठवड्यातील प्रत्येक वारी वेगळी मोटार. त्याआधी १९४२ साली त्यांनी आपल्या जागृती पिक्चर्स या बॅनरची स्थापना केली होती. चेंबूरला स्वतःचा जागृती स्टुडिओ उभारला होता.पण ‘अलबेला’चे सुपरहिट यश लाभले नाही त्यांना. त्यानंतर दादांनी आणखीही काही चित्रपट काढले; पण आता दुर्दैवाचा फेरा सुरू झाला होता. ते कोसळले. डोक्यावर कर्ज झाले. ते फेडण्यासाठी बंगला, गाड्या विकाव्या लागल्या आणि हा तारा पुन्हा चाळीत आला; पण त्यांची जिद्द आणि चित्रपटांवरील प्रेम असे की त्यांनी ही इंडस्ट्री सोडली नाही. ते काम करीत राहिले. डेली पेंड आर्टिस्ट म्हणून नाचत राहिले. ६०० हून अधिक चित्रपटांत त्यांनी काम केले.

 

दादर-पूर्व येथील शिंदेवाडीतील ‘लल्लूभाई मॅन्शन’मधील दोन खोल्यांत त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ४ फेब्रुवारी, २००२ रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. गिरणगावातल्या चाळीतून सुरू झालेली एक यशोगाथा चाळीतच निमाली.

jitendra awahd

(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)


Tags: bhagwan dadaChalitale TowerDr Jitendra Awhadडॉ. जितेंद्र आव्हाड
Previous Post

राज्यात ३,१०५ नवे रुग्ण, ३,१६४ रुग्ण बरे! दोनच जिल्हे पाचशेवर!!

Next Post

तांदळाच्या स्टार्चपासून बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचे उत्पादन!

Next Post
rice

तांदळाच्या स्टार्चपासून बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचे उत्पादन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!