Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी कायदे मागे घेण्यास मंजुरी! समजून घ्या आता पुढे काय होणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
farm laws repeal

मुक्तपीठ टीम

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या लढ्याला पहिलं यश मिळालं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी राष्ट्रीय न्यूज चॅनल्सवर सुत्रांच्या हवाल्याने तशा बातम्या आल्या आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेमुळे सरकार आणि शेतकरी यांच्यातील गेल्या १४ महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येईल, अशी अपेक्षा होती. गेल्या एक वर्षापासून शेतकरी तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलनं करत होते. यात अनेक शेतकरी शहीद झाले. तरीही आजही अनेक शेतकरी आपले प्राण पणाला लावून लढत आहेत. मात्र, शेतकरी नेत्यांनी हे कायदे जिथे अस्तित्वात आले त्या संसदेतच ते मागे घेतले जाईपर्यंत तसेच किमान हमी दराला कायद्याचं अधिष्ठान मिळेपर्यंत लढा सुरुच राहिल अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाच्या प्रस्तावानंतर शेतकऱ्यांच्या मनात सरकारच्या हेतूविषयी अधिक विश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

२९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे. शेती कायदे रद्दबातल विधेयक, २०२१ विधेयक ‘शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रमोशन आणि सुविधा) कायदा, २०२० शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमती’ कृषी सेवा कायदा, २०२० आणि जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२० रद्द करण्यासाठी प्रस्ताव मांडला जाईल.

 

कृषी कायदे कसे रद्द होणार?

  • भारत सरकारने २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेच्या बुलेटिनमध्ये द फार्म लाज रिपील बिल, २०२१ सूचीबद्ध केले आहे.
  • कायदे मागे घेण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींकडून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल.
  • राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ते राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल.

किमान हमी दराचं काय?

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की, केंद्र सरकार तीन कृषी कायदे रद्द करेल आणि या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक विधेयके आणेल. किमान हमी दर म्हणजेच एमएसपी ठरवण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करेल. अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली होती.

 

२०२० मध्ये केंद्राने कायदा केल्यापासून शेतकरी संघटना तीन कृषी कायद्यांना सातत्याने विरोध करत आहेत. सरकारच्या निर्णयानंतरही कायदे संसदेत परत येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्या संघटनांनी केला आहे.

 


Tags: central ministryfarm laws repealFarmers ActFarmersProtestmuktpeethpmo narendra modiUnion Cabinet Meetingकृषी कायदेकेंद्र सरकारकेंद्रीय मंत्रिमंडळ बैठकतीन कृषी कायदेपंतप्रधान नरेंद्र मोदीभारत सरकारशेतकरी संघटनासंसद हिवाळी अधिवेशन
Previous Post

मच्छिमारांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन

Next Post

विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध कारवाई होणार

Next Post
mumbai mantralaya

विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध कारवाई होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!