मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने कोरोनासंदर्भात राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. कोरोना अतिशय वेगाने पसरत आहे, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी फेब्रुवारी महिन्यात घसरलेले महाराष्ट्रातील साप्ताहिक कोरोना संसर्गाचे प्रमाण ६ टक्क्यांहून २४ टक्क्यांपर्यंत वाढणे चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. कोरोना संसर्गाचा वेग वाढता असल्याने पुढचे चार आठवडे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, असा इशाराही दिला आहे.
नीती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल कोरोना महामारी संसर्गाचा वेग वाढता असला तरी नियंत्रण अशक्य नाही. त्यासाठी संसर्ग जास्त असलेले भाग ओळखणे, तपासणीचे नियम अधिक प्रभावीपणे राबवावेत, पायाभूत आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा व्हावी आणि त्वरित लसीकरण मोहीम राबविणे हे उपाय आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासारख्या काही राज्यांत परिस्थिती इतरांपेक्षा वाईट आहे परंतु देशभरातही संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. दुसर्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. पुढील चार आठवडे खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. संपूर्ण देशाला संघटित होऊन कोरोनाविरोधी लढाईसाठी प्रयत्न करावे लागतील. ‘
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, सध्या सक्रिय प्रकरणात छत्तीसगडचा दुर्ग जिल्हा पहिल्या दहा जिल्ह्यांपैकी एक आहे.
सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्णसंख्येचे जिल्हे
१. दुर्ग
२. पुणे
३. मुंबई
४. ठाणे
५. नागपूर
६. नाशिक
७. औरंगाबाद
८. अहमदनगर
९. बंगळुरू
१०. दिल्ली (जिल्हा म्हणून धरले आहे)
केंद्राने उच्च स्तरीय सार्वजनिक आरोग्य पथके तयार केली आहेत. जी संसर्ग जास्त असलेल्या राज्यांना भेट देत लक्ष ठेवत आहेत.