मुक्तपीठ टीम
दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपीय देशांमध्ये कोरोना प्रभाव वाढत असल्याने भारत सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. डॉ. मनसुख मांडविया यांनी या बैठकीत दक्षता, आक्रमक जीनोम सिक्वेन्सिंग आणि परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय…
- चीन, सिंगापूर, हाँगकाँग, व्हिएतनाम आणि काही युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली.
- नीती आयोगाचे डॉ. व्हीके पॉल, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि आरोग्य सचिव या बैठकीला उपस्थित होते.
- कोरोनासंदर्भात आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
- बैठकीदरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दक्षता, आक्रमक जीनोम सिक्वेन्सिंग आणि परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले.
डब्ल्यूएचओचा कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा…
- चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढली आहेत.
- आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या बैठकीत भारतात कोरोनाबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचा निर्णय घेण्यात आला.
- यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे.
- यासोबतच कोरोना चाचणी गांभीर्याने घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- संबंधित अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त कोरोना चाचणीची खात्री करण्यास सांगितले आहे.
- कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चीनने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत इशारा दिला आहे.