मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. एकप्रकारे दिवाळीच्या निमित्ताने महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची जबरदस्त भेट दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८वरून ३१ टक्क्यांवर पोहचला आहे.
अनुराग ठाकूर म्हणाले की, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २८ वरून ३१ टक्के झाला आहे. महागाई भत्त्यात ही वाढ १ जुलैपासून लागू होईल. यापूर्वी, जुलै महिन्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ केली होती, त्यामुळे त्यांचा डीए १७ वरून २८ टक्के करण्यात आला होता. कोरोना काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ प्रलंबित होती. महागाई भत्त्यातील वाढ जानेवारी २०२०पासून थांबवण्यात आली होती, जी जुलै २०२१ मध्ये पूर्ववत करण्यात आली.
Dearness Allowance (DA) for Central Government employees and Dearness Relief to Pensioners to be increased from 28% to 31%; 47.14 lakh Central Govt employees and 68.62 lakh pensioners will be benefited: Union Minister @ianuragthakur https://t.co/0RdPkh7E6L #CabinetDecisions pic.twitter.com/DHC4yvvhSP
— PIB India (@PIB_India) October 21, 2021
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. यामुळे केंद्र सरकारवर ९ हजार ४८८ कोटींचा बोजा पडणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या टीए, पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्येही लाभ मिळणार आहे.