मुक्तपीठ टीम
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत, त्या कोणत्या क्षेत्रांसाठी आहेत, त्याची एकत्रित मांडणी:
- कर रचनेत कोणताही बदल नाही
- ७५ पेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक आयटी रिटर्नपासून मुक्त
- पेट्रोल आणि डिझेलवर २ आणि ४ रुपये शेती अधिभार
- आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद, आता दोन लाख २३ हजार ८४६ कोटी, यापूर्वी ही तरतूद फक्त ९४ हजार कोटी
- कोरोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी
- ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजना, सहा वर्षासाठी ६४,१८० कोटी रुपये
- किमान वेतन कायदा सर्व क्षेत्रांमध्ये लागू करण्यात येणार
- शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट
- बँकांमधील सामान्यांच्या पैशाच्या सुरक्षिततेचा उद्देश, सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद
- विमा कायद्यात सुधारणा, विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७४ टक्के
- नाशिक मेट्रोसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतुदीची घोषणा
- नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचं जाळं उभारण्यासाठी पाच हजार ९०० कोटी रुपये
- टॅक्स ऑडिटची मर्यादा पाच कोटींवरुन १० कोटींवर
- पहिल्या डिजिटल जणगणनेसाठी तीन हजार ६८ कोटींची तरतूद
- डिजिटल व्यवहारास चालना देण्यासाठी १५०० कोटी
- १०० नवे सैनिक स्कूल उभारले जाणार
- सोने व चांदी काही प्रमाणात स्वस्त होण्याची चिन्हे, सोन्यावरील शुल्क कपातीची घोषणा
- राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत १५ हजार शाळांमध्ये गुणात्मक सुधारणार होणार
- ग्रामीण पायाभूत सुविधांसाठीचा निधी ३० हजार कोटींवरुन ४० हजार कोटींवर
- खोल समुद्रातील संशोधनासाठी ४ हजार कोटी
- महिलांना सर्व स्तरांवर काम करण्याची परवानगी
- महिलांना आता नाईट शिफ्टमध्येही काम करता येणार. यासाठी त्यांना सुरक्षाही प्रदान केली जाईल
- ग्रामीण भागात जलजीवन मिशनसाठी २.८७ लाख कोटी रुपये पुढील पाच वर्षांसाठी खर्च केले जाईल
- मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरची घोषणा, ११०० किमी लांबीचा नॅशनल हायवे केरळमध्ये होणार त्यासाठी ६५ हजार कोटींचा खर्च
- १७ नवीन पब्लिक हेल्थ युनिट सुरु केले जाणार, ९ बायोलॅब, चार नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी बांधणार
- उज्ज्वला योजनेचा आणखी १ कोटी लाभार्थ्यांना लाभ देणार. जम्मू काश्मीरमध्ये गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट राबविणार
- ऑटो स्पेअर पार्ट्सवर कस्टम ड्युटी वाढवून १५ टक्के करण्यात आली, यामुळे स्पेअर पार्ट महागणार