Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नांदेडमध्ये उभारणार कौशल्य विकासाधारित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीवर कौशल्य विकासमंत्र्यांनी दिली तत्वतः मान्यता

February 11, 2021
in सरकारी बातम्या
0
ashok chavan

मुक्तपीठ टीम

नांदेडमधील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीस कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी तत्वतः मान्यता दिली. या केंद्रासाठी जागा व इतर बाबीसंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मलिक यांनी यावेळी दिले.

नांदेडमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करणे, आर्थिक मागास विद्यार्थी व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणे यासंदर्भात नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या सचिव अंन्शु सिन्हा, कौशल्य विकास आयुक्त दीपक कुशवाह आदी यावेळी उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले की, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी तसेच कौशल्याधारित व्यवसायासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करण्यात येणार आहे. नांदेडमध्ये हे केंद्र सुरू झाल्यामुळे तेथील युवकांना चांगले प्रशिक्षण मिळणार आहे. या केंद्रासाठी २० एकर जागेची आवश्यकता आहे. तसेच सेंटर उभारण्यासाठी आवश्यक बाबीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश नवाब मलिक यांनी दिले.

 

वसतीगृहासाठी जागेचा प्रस्ताव पाठवावा

आर्थिक मागास घटकातील विद्यार्थी तसेच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक कॉलेजमागील जागा द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. वसतीगृह उभारण्यास मान्यता देऊन यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी दिले.

जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक कॉलेज यांच्यामध्ये दोन्ही विभागाची जागा उपलब्ध आहे. या जागेवर सुमारे दोनशे विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारण्याचे नियोजन आहे. ही जागा देण्यासाठी कौशल्य विकास विभागाची मंजुरी मिळावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात वसतीगृह उभारण्यासंदर्भातही प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश नवाब मलिक यांनी यावेळी दिले.


Tags: Center of Excellencenandedकौशल्य विकास मंत्री नवाब मलिकपालकमंत्री अशोक चव्हाणसेंटर ऑफ एक्सलन्स
Previous Post

महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता

Next Post

थोडक्यात महत्वाचं – 1. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना भेटल्याचा भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांचा दावा. पवारांनी वडिलकीच्या नात्याने लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही सांगितले. आजवर शांततेत मोर्चे निघाले पण आरक्षण मिळाले नाही तर काय होईल ते सांगता येत नाही, असा राज्य सरकारला इशारा. 2. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मनसेसोबत युतीसाठी तयार असल्याची भूमिका, पण अमराठी नको, ही भूमिका मनसेने बदलावी, अशी अट मनसेने ही भूमिका सोडली तर मनसेबरोबर युती होऊ शकते, असे यापूर्वीही सांगितल्याची आठवण. 3. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली, लोकसभेत गोंधळ; शेम-शेम च्या घोषणा 4. कोरोना लसीकरण मोहिम संपताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू केला जाणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा 5. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६ हजार १०७ झाले कोरोनामुक्त, २५ रुग्णांचा मृत्यू, तर ३ हजार २९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३० हजारांपर्यंत खाली आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९५.८४ टक्क्यांपर्यंत पोहचले.

Next Post

थोडक्यात महत्वाचं - 1. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना भेटल्याचा भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांचा दावा. पवारांनी वडिलकीच्या नात्याने लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही सांगितले. आजवर शांततेत मोर्चे निघाले पण आरक्षण मिळाले नाही तर काय होईल ते सांगता येत नाही, असा राज्य सरकारला इशारा. 2. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मनसेसोबत युतीसाठी तयार असल्याची भूमिका, पण अमराठी नको, ही भूमिका मनसेने बदलावी, अशी अट मनसेने ही भूमिका सोडली तर मनसेबरोबर युती होऊ शकते, असे यापूर्वीही सांगितल्याची आठवण. 3. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली, लोकसभेत गोंधळ; शेम-शेम च्या घोषणा 4. कोरोना लसीकरण मोहिम संपताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू केला जाणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा 5. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६ हजार १०७ झाले कोरोनामुक्त, २५ रुग्णांचा मृत्यू, तर ३ हजार २९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३० हजारांपर्यंत खाली आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९५.८४ टक्क्यांपर्यंत पोहचले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!