Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सायकल दिवस: सायकलिंगचे फायदे भरपूर…प्रदूषणमुक्त प्रवास…फिटनेसचा बोनस!

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
cycle

रोहिणी ठोंबरे

आरोग्याच्या दृष्टीकडे चांगली वाटचाल. प्राणायम, योगासने हा आरोग्यासाठी एक चांगला उपाय आहे, पण त्याचबरोबर सायकलिंग करणे हे सुद्धा अतिशय फायदेशीर आहे. आज जगभरात सायकल दिन साजरा केला जातो. लोकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहित केले जाते. विशेषत: शहरांमध्ये जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकी किंवा इतर डिझेल-पेट्रोलवर आधारित वाहनांऐवजी सायकलचा वापर केला, तर दररोज हजारो लिटर पेट्रोलचा वापर कमी होईल आणि प्रदूषणाची पातळीही कमी होईल.

२०१८ पासून जागतिक सायकल दिन साजरा करण्यात येतो

  • ३ जून २०१८ रोजी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेद्वारे प्रथमच जागतिक सायकल दिन अधिकृतपणे साजरा करण्यात आला.
  • उद्घाटन समारंभाला संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, राजकारणी, क्रीडापटू, सायकलिंग समुदायाच्या वकिलांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
  • सायकल चालवणाऱ्या लोकांना सेवा देण्याचे अनेक मार्गही यावेळी सांगण्यात आले.

जागतिक सायकल दिन साजरा करण्यामागील हेतू म्हणजे, सायकलिंगला वाहतुकीचे सोपे, परवडणारे साधन म्हणून प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यात मदत करणे हा आहे. त्याच वेळी, आरोग्य तज्ञ सायकलिंग हा एक परिपूर्ण व्यायाम मानतात.

सायकलिंग केल्याने होणारे फायदे कोण-कोणते आहेत?

१. निरोगी हृदय

सायकलिंगला हा एक चांगला व्यायाम आहे. जेव्हा सायकल चालवता तेव्हा हृदयाला खूप फायदा होतो. अशाप्रकारे हृदय अधिक निरोगी होते आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका देखील कमी होतो.

२. सांधेदुखीपासून आराम

सायकल चालवण्याचा एक मोठा फायदा असा आहे की, यामुळे सांधेदुखी कमी होते. सायकल चालवणे हा संपूर्ण पायाचा व्यायाम आहे. सायकलिंगमध्ये पायांच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो आणि त्यामुळे गुडघे आणि पाय दुखण्यापासून आराम मिळतो.

३. रोगप्रतिकार प्रणाली सुरळीत होते

सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या कार्य करते. दररोज अर्धा तास सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक पेशी सक्रिय होतात आणि आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

४. कॅलरीज बर्न होतात

सायकल चालवल्याने अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते. सायकल चालवून एक्स्ट्रा कॅलरीज सहज बर्न करता येतात.


Tags: Cycle dayscycling benefitsfitnessPollution Freeप्रदूषणमुक्तफिटनेससायकल दिवससायकलिंग फायदे
Previous Post

आयटीआय विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या कोणत्याही शाखेत प्रवेश!

Next Post

“ओबीसी जनगणनेत आधार क्रमांक जोडा! दुहेरी गणनेचा फुगवटा टाळा!!”

Next Post
Chhagan Bhujbal ANd Jayant Patil

"ओबीसी जनगणनेत आधार क्रमांक जोडा! दुहेरी गणनेचा फुगवटा टाळा!!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!