मुक्तपीठ टीम
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी मतदान केंद्रांचे जियो टॅगिंग आणि जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या रूट चार्टमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी राज्यांना निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेशी तडजोड न करता विश्वासूपणे नवीन उपक्रम आणि नवकल्पनांची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले. त्यांनी राज्य अणि आयोगाद्वारे विकसित सर्व सामुगेरीपर्यंत पोहचण्यासाठी एका डिजिटल पोर्टलची आवश्यकता व्यक्त केली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट येथे आयोजित केलेल्या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (सीईओ) परिषदेत राजीव बोलत होते. २०२१ आणि २०२२ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीचे अनुभव आणि शिकण्यासोबतच निवडणूक नियोजन, खर्चाचे निरीक्षण, मतदार यादी, आयटी ऍप्लिकेशन्स, डेटा मॅनेजमेंट, EVM/VVPAT, SWIP स्ट्रॅटेजी, मीडिया आणि कम्युनिकेशन या विषयांवर परिषदेत चर्चा झाली.
सशस्त्र दलांच्या मानधनातही वाढ झाली…
- २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल आयोगाने गृह मंत्रालय, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला.
- यासोबतच निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या तदर्थ कमांडंट आणि कमांडंटच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली.
- आयोगाने ए-वेब इंडिया जर्नल ऑफ इलेक्शन्सची नवीनतम आवृत्ती देखील जारी केली.