मुक्तपीठ टीम
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि इतर ११ जणांचा मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या हेलिकॉप्टर अपघाताविषयी आता संशयाचं धुकं तयार होऊ लागलं आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारने लोकांच्या मनातील संशय दूर करावा, अशी मागणी केली आहे.
हेलिकॉप्टर अपघाताविषयी संशयाचं धुकं
- हेलिकॉप्टर सर्वात सुरक्षित, तर अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड की काही वेगळेच?
- Mi-17 V-5 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानले जाते.
- त्यामुळे पंतप्रधानांसह इतर व्हीव्हीआयपी वापरतात.
- यात दुहेरी इंजिन आहे. ते सीडीएस पदावरील व्यक्तीसाठी वापरले जाण्यापूर्वी खूपच काटेकोरपणे तपासले गेले असणार.
- हे हेलिकॉप्टर इतके सुरक्षित असेल तर हा अपघात कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
हवामान खराब होते हे आधी कळले नाही?
कुन्नूरमध्ये हा अपघात होण्याचे कारण धुकं आणि खराब दृश्यमानता असू शकते असे मत काही तज्ज्ञ मांडत आहेत. जर तसे होते तर मग उड्डाणापूर्वी हेलिकॉप्टर पायलटना हवामानाची कल्पना दिली गेली होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांना जर तशी माहिती मिळाली असती तर त्यांनी आपल्या अधिकारात उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला असता. तसे केले जाते.
हेलिकॉप्टरमधून डिस्ट्रेस कॉल का नाही?
- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सकाळी ८.४७ वाजता भारतीय हवाई दलाच्या एम्बर विमानाने पालम एअरबेसवरून निघाले आणि
- ११.३४ वाजता सुलूर एअरबेसवर पोहोचले.
- सुलुर येथून त्यांनी एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टरने ११:४८ वाजता वेलिंग्टनसाठी उड्डाण केले.
- त्यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर दुपारी १२.२२ वाजता कोसळले.
- अपघातापूर्वी हेलिकॉप्टरमधून कोणताही डिस्ट्रेस कॉल आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
- अशा स्थितीत असे काय घडले की अपघातापूर्वी क्रू मेंबर्सना डिस्ट्रेस कॉलही करता आला नाही, असा प्रश्नही काही उपस्थित करत आहेत.
- लँडिंग करण्यापूर्वी, पायलटला संदेश होता की तो ४००० फूट उंचीवर आहे आणि लँडिंग बेसपासून ५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, जनरल चीन आणि पाकिस्तानविरुद्ध कारवाईच्या नियोजनात गुंतले होते. तांत्रिकदृष्ट्या प्रगत हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना असा अपघात होतो, तेव्हा शंका निर्माण होते.
खासदार संजय राऊतांना संशय
संजय राऊत म्हणाले, “देशातील शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण करण्याची जबाबदारी बिपीन रावत यांच्याकडे होती. त्यांनी पाकिस्तान आणि चीनविरुद्धच्या मोहिमांमध्ये योगदान दिले. पुलवामानंतर लष्कराविरोधातील कारवाईत महत्त्वाचे योगदान दिले. जेव्हा तांत्रिकदृष्ट्या प्रगत हेलिकॉप्टरचा असा अपघात झाला, तसे भारतात फिरताना घडते, मग नक्कीच प्रश्न निर्माण होतात. लोकांच्या मनात शंका आहेत. चौकशी सरकार करेल. पण या शंका दूर करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांची आहे.” ते पुढे म्हणाले की, भारत आणि चीनमध्ये तणाव असताना अपघाताबाबत शंका निर्माण होतात.
सत्य कसं कळणार?
सामान्य माणसं, जाणकार तसेच राजकीय नेते असा दुर्घटनांनंतर संशय व्यक्त करतातच. ती एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण तज्ज्ञांकडून तांत्रिक आणि इतर बाबींची चौकशी केल्यानंतरच अपघाताचे कारण कळू शकेल. सध्याच्या या अंदाजांपेक्षा वेगळेही ते कारण असू शकेल.
भारतीय हवाई दलाकडून केल्या जाणाऱ्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीनंतरच या अपघाताच्या तपासामागील खरे कारण समजेल.
हेलिकॉप्टरच्या अवशेषांच्या पुढील फॉरेन्सिक तपासणीतून अपघाताची बाह्य कारणे होती की नाही हे देखील स्पष्ट होऊ शकते.
काय आहे ब्लॅक बॉक्समध्ये?
अपघातग्रस्त Mi-17V5 हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर सापडला आहे. जरी याला ब्लॅक बॉक्स म्हटले जात असले तरी, फ्लाइट डेटा रेकॉर्डर चमकदार केशरी रंगाचा आहे आणि फ्लाइट डेटा आणि कॉकपिटची अॅक्टिव्हिटीला रेकॉर्ड करतो.
हे व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर जगात सर्वात आधुनिक!
- Mi-17 V-5 VVIP हेलिकॉप्टरची निर्मिती रशियात केली जाते.
- हे जगातील सर्वात आधुनिक हेलिकॉप्टर मानले जाते.
- त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते ६००० मीटर उंचीवरही उडू शकते.