मुक्तपीठ टीम
CBSEच्या 10वी, 12वी निकालाची वाट पाहत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. CBSEने इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांच्या निकालांबद्दल एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, CBSE परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून, त्यांच्या डिजीलॉकर खात्यांवर सहा अंकी सुरक्षा पिन इंस्टॉल केला आहे. तो अॅक्टिव्हेट करण्यासाठी CBSEने कळवले आहे. विद्यार्थ्यांसाठीचे हे पिन शाळांना डाऊनलोड करावे लागतील. ते शाळांनी कसे डाऊनलोड करायचे आणि विद्यार्थ्यांनी ते कसे अॅक्टिव्हेट करायचे, त्याची CBSEने दिलेली माहिती पुढील प्रमाणे आहे…
CBSE परिपत्रक काय सांगतं?
- CBSE 10वी, 12वीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.
- विद्यार्थ्यांना त्यांच्या डिजीलॉकर खात्यांद्वारे सीबीएसई बोर्डाकडून त्यांची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे प्रदान केली जातात.
- बोर्डाने सुरक्षिततेच्या दुष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या डिजीलॉकर खात्यालर सहा अंकी पिन इंस्टॉल केला आहे.
- विद्यार्थ्यांना त्यांच्या डिजीलॉकर खात्यांवर सहा अंकी सिक्युरिटी पिन अॅक्टिव्हेट करावा लागेल.
- हे पिन क्रमांक शाळांद्वारे दिले जातील.
- निकाल जाहीर झाल्यानंतर, ‘ISSUED DOCUMENTS’ विभागात जा आणि ‘DEGITAL ACADEMIC RECORD’ वर क्लिक करा.
- तेथून विद्यार्थी त्यांची १०वी किंवा १२वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतील.
सीबीएसई बोर्डाने शाळांसाठी या संपूर्ण प्रक्रियेसाठी टप्प्यांनुसार सूचना जारी केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत:
शाळांना अशा प्रकारे मिळेल सुरक्षा पिन…
- बोर्डाच्या परिपत्रकानुसार, शाळांना डिजिलॉकर पोर्टल, digilocker.gov.in वर भेट द्यावी लागेल किंवा Google Play Store किंवा iOS App Store वरून Digilocker मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. यानंतर, त्यांना LOC तपशील भरावा लागेल आणि लॉगिन विभागात ‘Log-in as School’ निवडून सबमिट करावे लागेल.
- त्यानंतर नवीन पेजवर डाऊनलोड पिन फायनलवर क्लिक करा आणि त्यानंतर नवीन पेजवर संबंधित इयत्ता १० वी किंवा १२ वी लिंकवर क्लिक करा.
- यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे पिन एका फाईलमध्ये डाऊनलोड केले जातील, जे विद्यार्थ्यांना शाळांद्वारे वितरित केले जातील.
- याशिवाय, एक युजर मॅन्युअल देखील शाळा डाउनलोड करू शकते आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ शकते.