मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षांमध्ये बरेच बदल झालेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षेचे नवीन नियम तयार केले होते. आता कोरोना महामारी संपुष्टात आली आहे आणि म्हणूनच बोर्डाने त्यांचे नियम बदलले आहेत. सीबीएसई बोर्डाने १०वी आणि १२वी वार्षिक परीक्षा २०२३ साठी शाळांना दोनदा प्री-बोर्ड परीक्षा घेण्यास सांगितले आहे.
वर्षातून २ वेळा होणार १०वी, १२वी प्री-बोर्ड परीक्षा!
- सीबीएसई १०वी आणि १२वी बोर्डाच्या परीक्षांपूर्वी, यावेळी शाळांमध्ये दोनदा प्री-बोर्ड परीक्षा घेण्यात येणार आहेत.
- यासंदर्भात सीबीएसईने सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत.
- पहिली प्री बोर्ड डिसेंबरमध्ये आणि दुसरी जानेवारीमध्ये होईल.
- यादरम्यान कोणत्याही विद्यार्थ्यांचा बोर्डपूर्व निकाल खराब लागल्यास त्या विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वतीने जादा वर्ग आयोजित करून तयारी करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची भीती नाहीशी करण्यासाठी प्री-बोर्ड परीक्षा…
- बोर्डाच्या दोन्ही पूर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका शाळेकडूनच तयार केल्या जातील.
- शाळांनाही बोर्डपूर्व निकाल सुरक्षित ठेवावे लागणार आहेत.
- विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची भीती नाहीशी करण्यासाठी बोर्डाची पूर्व परीक्षा दोनदा घेण्याची योजना आखण्यात आली आहे.
- ज्या विद्यार्थ्यांना प्री-बोर्डमध्ये कमी गुण मिळतील, असे विद्यार्थी सेकंड प्री-बोर्डमध्येही बसू शकतात.
- परीक्षेतील प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे देण्यात येणार आहेत.
३४ लाख विद्यार्थ्यांचा परीक्षेला अर्ज…
- यावेळी सुमारे ३४ लाख विद्यार्थी CBSE २०२३ बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहे.
- एकूण विद्यार्थ्यांपैकी १८ लाख विद्यार्थ्यांनी १०वीसाठी तर १६ लाख विद्यार्थ्यांनी १२वीसाठी नोंदणी केली आहे.
- आता विद्यार्थी तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
कधी होणार बोर्डाची परीक्षा?
- विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान वर्ग सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- परीक्षेची उत्तरपत्रिका शाळा प्रशासनाकडूनच उपलब्ध करून दिली जाईल.
- CBSE ची बोर्ड परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे.
- रात्यक्षिक परीक्षेची संभाव्य तारीख १ जानेवारी आहे.
- परीक्षेच्या तारखेच्या स्पष्टतेसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.