Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारावर सीबीआयचा गुन्हा, मासे घोटाळ्याचा आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
CBI Registers Case Against NCP Lakshadweep MP

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे गेले कित्येक महिने तुरुंगात आहेत. त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे. त्यांना अद्याप जामीन मिळालेला नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदारावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टून माशांच्या निर्यातीत भ्रष्टाचार केल्याप्रकणी हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दिल्ली, कालिकत आणि लक्षद्वीपमधील आरोपींच्या सहा ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

  • मोहम्मद फैजल हे लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत.
  • याप्रकरणी फैजल यांचा पुतण्या आणि श्रीलंका येथील एसआरटी जनरल मर्चंट्स या कंपनीला देखील सह आरोपी करण्यात आलं आहे.
  • फैजल आणि त्यांचा पुतण्या यांच्यावर टून माशांच्या निर्यातीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.
  • फैजल यांचा पुतण्या हा एसआरटी जनरलचा प्रतिनिधी म्हणून काम करतो.
  • टून माशांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४०० रुपये प्रतीकिलो आहे.
  • फैजल यांनी लक्षद्वीप सहकारी विपणन संघाच्या माध्यमातून स्थानिक मच्छिमारांकडून टून मासे खरेदी केले आणि एसआयटी या कंपनीला निर्यात केले.
  • या कंपनीकडून मच्छिमारांना त्याचा कोणताही मोबदला मिळाला नाही.
  • त्यामुळे या प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे करण्यात आली.

यापूर्वी असे समोर आले होते की, सीबीआय आणि लक्षद्वीप प्रशासनाच्या दक्षता अधिकाऱ्यांनी अनेक विभागांमध्ये अचानक तपासणी केली होती. या विभागांमध्ये लक्षद्वीप को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (LCMF), मत्स्यव्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, खादी मंडळ आणि सहकारी संस्था आणि पशुसंवर्धन विभाग यांचा समावेश आहे. त्यानंतर हा घोटाळा उघड झाला. तपासणीदरम्यान सीबीआय अधिकाऱ्यांनी घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रेही जप्त केली, त्या आधारे पुढील कारवाई करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीनंतर निर्यात प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले.


Tags: CBILakshadweepMohammed FaisalNCPTuna Fish Export Caseघडलं-बिघडलंटून मासामोहम्मद फैजलराष्ट्रवादी काँग्रेसलक्षद्वीपसीबीआय
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

Next Post

पावसाचं धुमशान! आजही राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट, सतर्कतेचं आवाहन

Next Post
Maharashtra Rain Updates In Marathi

पावसाचं धुमशान! आजही राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट, सतर्कतेचं आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!