Uncategorized गायरान जमीन वाटप प्रकरणी विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा! – अजित पवार December 29, 2022
Uncategorized माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा – संचालक हेमराज बागूल December 28, 2022
Uncategorized महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – (१६ फेब्रुवारीपर्यंतचा) • आज राज्यात ३,६६३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,७१,३०६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे- • आज २,७०० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,८१,४०८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६६% एवढे झाले आहे. • आज राज्यात ३,६६३ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज ३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,९६,४४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,७१,३०६ (१३.४५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात १,८२,९७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. • राज्यात आज रोजी एकूण ३७,१२५ सक्रिय रुग्ण आहेत. by Apeksha Sakpal February 17, 2021 0 Read more
Uncategorized महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – १५ फेब्रुवारी २४ तास – • आज ३,१०५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,७८,७०८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७% एवढे झाले आहे. • आज राज्यात ३,३६५ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज २३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५३,५९,०२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,६७,६४३ (१३.४६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात १,७४,७०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. by मुक्तपीठ टीम February 16, 2021 0 Read more
Uncategorized क्रीडा थोडक्यात: १) सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पोटाच्या दुखापतीसह ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील आपला ३००वा विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने प्रवेश केला. जोकोव्हिचने स्वित्झर्लंडच्या १४व्या मानांकित मिलोस राओनिकला ७-६ (७-४), ४-६, ६-१, ६-४ असे चार सेटमध्ये नमवले. २) आयपीएल लिलावाच्या आधी अर्जुन तेंडुलकरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रविवारी पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट अ च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात अर्जुनने आपण फक्त गोलंदाज नाही तर वेळ पडली तर धमाकेदार फलंदाजी देखील करू शकतो हे दाखवून दिले. त्याने ३१ चेंडूत ७७ धावांची वादळी खेळी केली. त्यात त्यांनी ५ चौकार आणि आठ षटकार मारले. by Vrushali Kotwal February 16, 2021 0 Read more
Uncategorized *मनोरंजन महत्वाचं* १) ती सध्या काय करते नंतर आता अभिनय बेर्डे प्रेक्षकांच्या भेटीस पुन्हा येणार आहे. अभिनयच्या ‘मन कस्तुरी रे’ या आगामी सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्याने सोशल मिडीयाद्वारे याबाबत माहिती दिली. २) अभिनेत्री दीपिका पदुकोण ही नेहमीच चर्चेत असते, याशिवाय ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. एका युजरने नुकतेच दीपिकाला इन्स्टाग्रामवर मेसेज करून अपशब्द वापरले. दीपिकाने त्याला थेट कोणतीही प्रतिक्रिया न देता, तिने त्याच्या मेसेजचे स्क्रिनशॉट काढून तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आणि यासोबतच तिने लिहिले, ‘छान! तुझे कुटुंबीय आणि मित्रांना तुझा नक्कीच अभिमान वाटेल.’ ज्यावर दीपिकानंही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. ३) अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राची मुलगी समिषा आज १५ फेब्रुवारी रोजी एक वर्षांची झाली आहे. शिल्पाने आजपर्यंत तिच्या मुलीचा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. समिषाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने तिने एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समिषा ‘मम्मा’ बोलताना दिसत आहे. ४) दंगल म्हटलं की आठवतो तो अभिनेता आमिर खान, यावर्षी तो एकाचवेळी तीन चित्रपटांवर काम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तो व्यक्तिरेखेत शिरून, खूप मन लावून भूमिका करतो. त्यासाठी मेहनतही घेतो म्हणूनच तो वर्षांला एकच चित्रपट करायचे हे सूत्र गेली कित्येक वर्ष तो जपत आला आहे. मात्र पूर्वीप्रमाणे एक वर्ष, एक चित्रपट हे त्याचे समीकरण आता यापुढे राहणार नाही अशी चर्चा आहे. by Rohini Thombare February 16, 2021 0 Read more
Uncategorized *मनोरंजन महत्वाचं* 1) अभिनेत्री दिया मिर्झा पुन्हा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. तिने वैभव रेखी या बिझनेसमन मित्रासोबत लग्न करायचे ठरवले आहे. दिया मिर्झा विवाह बंधनात अडकणार आहे. १५ फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार आहे. 2) अभिनेत्री तापसी ‘टाईम ट्रॅव्हल’; ‘दोबारा’चा रहस्यमय टीझर प्रदर्शित करणार आहे. सगळीकडे ही चर्चा पसरलेली आहे. दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपने त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. तापसी पन्नूची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. 3) चित्रपटसृष्टीतील बाहुबली आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासनं आपल्या नव्या चित्रपटाबद्दल आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. प्रभासचा आगामी चित्रपट राधे श्याम प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. व्हॅलेंटाईन डेला याचा फर्स्ट लूक पाहायला मिळणार आहे. 4) दबंग अभिनेता सलमान खान आणि सिरिअल किसर इम्रान हाश्मी झळकणार एका पडद्यावर, आगामी चित्रपट ‘टायगर ३’ ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यासोबत या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण इस्तंबुलमध्ये होणार असल्याचं म्हटले जात आहे. 5) अभिनेता सुयश टिळकने केला सोशल मीडिला राम-राम, त्यानं एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. नुकतीच त्यानं एक इन्स्टा स्टोरीही शेअर केली होती. ‘ऑफलाइन इज द न्यू लक्झरी’ असं त्यानं त्यात म्हटलं आहे. त्यानं असं का केलं असावं, अशी त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे. by Rohini Thombare February 15, 2021 0 Read more
Uncategorized थोडक्यात महत्तावाच्या 1). जळगावातील रस्त्यावर खड्डे चुकवण्याच्या नादात पपईचा ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात १५ मजूर जागीच ठार झाले. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 2) हळदीच्या सौद्यात उच्चांकी १० हजार ३०० रुपयांचा दर मिळाला, हिंगोलीच्या मार्केट वेळात सात ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव, सांगलीनंतर हिंगोली व त्यापाठोपाठ वसमत बाजारपेठेत हळदीला सध्या उच्चांकी दर 3) बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला ईडीकडून अटक, ओमकार रिअॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे, अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची १८ तास चौकशी करण्यात आली होती. 4)नवीन वाहन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित चालकाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चाचणी न देताच थेट लायसन्स मिळणार, यासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच मसुदा अधिसूचना काढली, त्यानुुसार नवीन वाहन प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहेत. 5) मध्य मुंबईतील भोईवाडा परिसरात एका माथेफिरूने प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने चार वार केले. या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘ व्हॅलेंटाइन डे ‘ला हा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. by Apeksha Sakpal February 16, 2021 0 Read more
Uncategorized थोडक्यात महत्वाचं – 1. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना भेटल्याचा भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांचा दावा. पवारांनी वडिलकीच्या नात्याने लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही सांगितले. आजवर शांततेत मोर्चे निघाले पण आरक्षण मिळाले नाही तर काय होईल ते सांगता येत नाही, असा राज्य सरकारला इशारा. 2. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मनसेसोबत युतीसाठी तयार असल्याची भूमिका, पण अमराठी नको, ही भूमिका मनसेने बदलावी, अशी अट मनसेने ही भूमिका सोडली तर मनसेबरोबर युती होऊ शकते, असे यापूर्वीही सांगितल्याची आठवण. 3. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली, लोकसभेत गोंधळ; शेम-शेम च्या घोषणा 4. कोरोना लसीकरण मोहिम संपताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू केला जाणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा 5. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६ हजार १०७ झाले कोरोनामुक्त, २५ रुग्णांचा मृत्यू, तर ३ हजार २९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३० हजारांपर्यंत खाली आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९५.८४ टक्क्यांपर्यंत पोहचले. by Tulsidas Bhoite February 16, 2021 0 Read more
Uncategorized क्रीडा घडामोडी: १)भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावातही अपयशी; पहिल्या डावात एक धाव तर आज शुन्यावर बाद २)ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान समालोचक रिकी पाँटिंग याच्या घरी चोरट्यांनी केले हात साफ, पार्किंगमध्ये उभी असलेली कार चोरली ३)शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारालाही कोरोनाचा फटका; पुरस्कार पुढील वर्षी दिले जाणार, क्रीडामंत्री सुनील केदारेंची माहिती ४)ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी सामन्यात ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम आणि जर्मनीचा अॅलेक्झांडर झ्वेरेव्ह यांची पहिल्या दिवशी विजयी सलामी by Vrushali Kotwal February 11, 2021 0 Read more
Uncategorized गुन्हेगारी बातम्या-१)मुंबईत तरुणावर प्राणघातक हल्ला,जुन्या वादातून पाच ते सहा जणांनी डोक्यात बियरची बाटली फोडली,काळा चौकी पोलिसांनी तिघांना केली अटक २)मुंबईतील बोरिवलीत पत्नीची हत्या,चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळला,बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीला अटक ३)मानखुर्दमधील चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या, नराधमाला अटक करण्यात तीन दिवसांनी अखेर मानखुर्द पोलिसांना यश, नराधमाने चिमुरडीचे अपहरण करण्याआधी तिच्या आईशी संवादही साधला होता ४)डोंबिवलीत एका रिक्षाचालकाने भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा केला प्रयत्न, दोन सतर्क तरुणांमुळे रिक्षाचालकाचा फसला हा प्रयत्न ५)तरुणीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, भक्कम पुराव्यानिशी २४ तासात आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयांत दोषारोपत्र सादर by Apeksha Sakpal February 11, 2021 0 Read more
Uncategorized थोडक्यात महत्वाचं १) पुणे जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला काम देण्यास सुरुवात केली, त्यासाठी १०० दिवस कामाचे उपक्रमाची सुरुवात २) नाशिक जिल्ह्यातील बागलाण पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेचे कान्हू अहिरे यांनी अचानक राजीनामा दिला, पद पटकावण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली ३)काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात अश्रू, निरोप देताना केले भावूक भाषण ४)“शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो,” शिवसेना नेते खा. संजय राऊतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना प्रत्युत्तर ५)उत्तराखंड आपत्तीच्या तिसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरुच, ३५ कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम ६) जगातील १५ प्रमुख शेअर बाजारांमध्ये मुंबई शेअर बाजार दुसऱ्या क्रमांकावर, मार्केट कॅपिटलमध्ये सौदी अरेबिया आणि कॅनडालाही मागे टाकले ७)बंगालमध्ये भाजपने संपूर्ण बळ उतरवले, नरेंद्र मोदी, अमित शाहांनंतर जे.पी.नड्डा, स्मृति इराणी, राजनाथ सिंह प्रचार युद्धात सहभागी म्यानमारमध्ये लष्करी ८)राजवटीच्याविरोधात जनता रस्त्यावर, संचारबंदीची पर्वा न करता लोकशाहीसाठी आंदोलन ९) अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगास बुधवारपासून सुरुवात, समर्थकांना चिथावून कॅपिटल हिल परिसरात हिंसाचाराचा आरोप १०)पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमेरिकेच्या अध्यक्षांशी फोनवर चर्चा, जो बायडन यांच्या शपथविधीच्या १९ दिवसानंतर संवाद by Tulsidas Bhoite February 11, 2021 0 Read more
featured हवेतील बेवड्या प्रवाशांमुळे अखेर डीजीसीए कडक भूमिकेत! विमान कंपन्यांना इशारा!! by Sushrusha Jadhav January 7, 2023 0
६व्या महिन्यात जन्म, ४०० ग्रॅम वजन, ९४ दिवस रुग्णालयात…डॉक्टरांच्या प्रयत्नांनी वजन वाढवून बाळ घरी! January 7, 2023