Uncategorized गायरान जमीन वाटप प्रकरणी विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा! – अजित पवार December 29, 2022
Uncategorized माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा – संचालक हेमराज बागूल December 28, 2022
Uncategorized क्रीडा थोडक्यात: १) भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका पुण्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. ही मालिका २३ मार्चपासून सुरु होणार आहे. सध्याच्या घडीला पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार या मालिकेत रोहित, रिषभ आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खेळवण्यात येणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता वनडे मालिकेतही मोठा धक्का बसू शकतो. २) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. मात्र हा रेकॉर्ड मैदानावर नसून मैदानाबाहेर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या १० कोटी झाली असून तो पहिलाच भारतीय आणि विशेष म्हणजे पहिलाच क्रिकेटर ठरला आहे. जगभरातील खेळाडूंच्या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी आणि नेमार ज्युनिअर यांचीही नावे आहेत. तसेच १० क्रिकटर्समध्ये इन्स्टाग्रामवर प्रयोजित पोस्टच्या माध्यमातून कमाई करणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटर आहे. ३) यश नाहर आणि अंकित बावणे यांच्या दमदार शतकी खेळीमुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात पुदुचेरीवर १३७ धावांनी मात केली. मात्र या विजयानंतरही महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने बाद फेरीत मजल मारण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. ४) टोक्यो ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची असून महिला एकेरीत सिंधू आणि सायना यांच्यावर भारताची भिस्त आहे. सिंधूची पहिल्या फेरीत तुर्कीच्या नेसलिहान यिग्टशी गाठ पडणार आहे. सायनापुढे सलामीला कोरियाच्या संग जी ह्य़ुनचे आव्हान असेल. सिंधू आणि सायना या दोघींनीही अपेक्षेनुसार कामगिरी केली, तर उपांत्य फेरीत त्या एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू शकतात. सिंधूने ऑलिम्पिक पात्रता मिळवली असली तरी सायनासाठी मात्र ही स्पर्धा महत्त्वाची आहे. ५) भारतामधील कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ आता १-२ अशा पिछाडीवर आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीमध्ये इंग्लंडचा संघ लवकर बाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला आता मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. इंग्लंड क्रिकेट मंडळाने फलंदाजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू मार्कस ट्रेस्कॉटीकची निवड केली आहे. त्याचबरोबर आता इंग्लंड क्रिकेट मंडळाने वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकांचीही यावेळी नेमणूक केली आहे. by Vrushali Kotwal March 16, 2021 0 Read more
Uncategorized गुन्हे महत्त्वाचे: 1)मुंबई पोलिसांनी वरळीतील ७७ वर्षीय महिलेच्या हत्या प्रकरणी नोकरासह त्याच्या मित्राच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुरुवारी (२५) फेब्रुवारीला वरळीतील सर पोचखानवाला रोडपरिसरात महिलेची हत्या करुन घरातून सोने आणि पैशांची चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी निशाद आणि अभिजीत जोरिया अटक केली आहे. वरळीतील या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. हत्या झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींकडून सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. 2)नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेला करोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने तिला महापालिकेच्या कल्याण पश्चिम येथील आर्ट गॅलरीमधील करोनारुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना सोमवारी संध्याकाळी रुग्णालयातील वॉर्डबॉय श्रीकांत मोहिते याने तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला. रुग्णालयात नातेवाईकांना येण्यास बंदी असल्याने या महिलेने तातडीने फोनवरून पतीशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर सदर महिलेच्या पतीने बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत सदर वॉर्डबॉयविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली 3)मिरा-भाईंदरच्या काशिमिरा पोलिसांनी बेकायदेशी २० लाख रुपये किंमतीच्या गुटख्याची वाहतूक करताना टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांना दोघांना अटक करत गुन्हे दाखल केले आहेत. 4)भारतीय नोटा देण्याच्या बदल्यामध्ये एक हजार ४४० इतके अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करून भाईंदर येथील रहिवासी डेनिस पाटील यांची तीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. 5)अंधेरीत सात बंगला परिसरात असलेल्या एक्सिस बँकेच्या बाहेर एका कुत्र्याची सतत भुंकत राहतो म्हणून पाच हजारांची सुपारी देत हत्या करविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वर्सोव्यात सोमवारी उघड झाला. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी चौघांना अटक केली असून , यात सोसायटी चेअरमॅनने हे करविल्याचे पोलिसांनी सांगितले. by Apeksha Sakpal March 3, 2021 0 Read more
Uncategorized क्रीडा थोडक्यात: १) कोरोना साथीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने जबरदस्त पुनरागमन केले आहे. रविवारी विनेशने कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या विनेशला ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली. विनेशने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर कॅलाडझिन्स्कायने ४-४ अशी बरोबरी केली. विनेशने पुन्हा ६-४ अशी आघाडी घेतली. दडपण वाढवत कॅलाडझिन्स्कायने ४ गुणांची कमाई केली. पण अखेर विनेश हिने १०-८ अशा फरकाने विजय मिळविला. २)भारतीय पुरुष हॉकी संघाने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत यजमान जर्मनीचा ६-१ असा धुव्वा उडवत जर्मनी हॉकी दौऱ्याची शानदार सुरुवात केली. निळकंठ शर्मा (१३व्या मिनिटाला), विवेक सागर प्रसाद (२७व्या आणि २८व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (४१व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (४२व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग (४७व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहेय. तर चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला विजय भारताने मिळविला आहे. ३) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १४व्या हंगामातील सामन्यांसाठी चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळूरु आणि दिल्ली अशा पाच शहरांची निवड केली होती. परंतु महाराष्ट्र शासनाने प्रेक्षकांविना सामन्यांना शनिवारी परवानगी दिल्यामुळे या यादीत मुंबई या सहाव्या शहराची भर पडली आहे. हैदराबाद, चंडीगड आणि जयपूरला सामने होणार नसल्यामुळे अनुक्रमे सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांना घरच्या मैदानात खेळण्याची संधी मिळणार नाही आहे. ४) इंग्लंड विरोधातील अहमदाबादमध्ये कमी धावसंख्येच्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा याने आयसीसीकडून जाहीर झालेल्या रॅकिंगमध्ये सहा स्थानांनी झेप घेतली आहे. तो आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानावर पोहचला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ६६ धावा केल्या, तर दुसर्या डावात नाबाद २५ धावा केल्या. त्यासोबतच आयसीसीने म्हटले आहे की, आता मालिका संपल्यावर रँकिंग जाहीर होण्याऐवजी मार्चपासून दर आठवड्याला रँकिंग जाहीर होणार आहे. ५) टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कसोटी सामना पार पडल्यानंतर होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत वरूण चक्रवर्थीची पदार्पणाची संधी पुन्हा एकदा हुकण्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्थी हा अपयशी ठरला असल्याचे सांगितले जात आहे. by Vrushali Kotwal March 2, 2021 0 Read more
Uncategorized गुन्हे महत्त्वाचे: 1)पोटच्या मुलाचाच खून केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरून शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील टिळक नगर येथील एका महिलेची शिक्षा अखेर मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या अपिलावर निर्णय देताना रद्दबातल ठरवली. त्यामुळे मागील सात वर्षांहून अधिक काळापासून मुंबईतील भायखळा महिला तुरुंगात तुरुंगवास भोगत असलेल्या या महिलेला सुटकेचा दिलासा मिळाला आहे. मात्र, याच हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला तत्कालीन पोलिस अधीक्षक शिवाजी नरवणे याचे अपिल न्यायालयाने फेटाळून लावले. 2)एका १७वर्षीय मुलीसमोर जाणीवपूर्वक व लैंगिक हेतूने अश्लिल हावभाव व वर्तन केल्याबद्दल विशेष पोक्सो न्यायालयाने नुकतीच एकाला एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ‘प्रत्यक्ष शारीरिकदृष्ट्या लैंगिक शोषण नसले तरी आरोपीने केलेली आक्षेपार्ह कृती ही लैंगिक हेतूने केलेली आहे’, असे निरीक्षण नोंदवून न्या. एच. सी. शेंडे यांनी व्यवसायाने वाहनचालक असलेल्या आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४(अ) (अश्लिल लैंगिक हावभाव करत विनयभंग)अन्वये आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. 3)घरात एकट्याच राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेकडील दत्त आळी या गजबजलेल्या परिसरात घडली आहे. हंसाबेन ठक्कर असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 4)शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल ऑउट’ अभियान राबविले. या अभियानांतर्गत शहरातील २१७ ठिकाणी कारवाई (कोम्बिग) करून ३८ फरार आरोपींना अटक करण्यात आली. 5)शनिवारी अंधेरीत विवाहितेच्या हत्येची घटना समोर आली. मुंबईत हत्या सत्र सुरू असून, गेल्या सहा दिवसांत सहा हत्येची घटनांची नोंद मुंबई पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे. by Apeksha Sakpal March 2, 2021 0 Read more
Uncategorized *मनोरंजन महत्त्वाचे*: 1) अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इसाबेलचा काही दिवसांपूर्वी अभिनेता सूरज पांचोली याच्यासोबतच्या ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सलमानने ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करत “ऑल द बेस्ट टीम” असे कॅप्शन सलमानने दिले आहे. 2) प्रभासचा ‘सलार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. प्रभासने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे. 3) बाहुबली चित्रपटामधला भल्लालदेव म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबतीचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. 4) आपली भूमिका अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडणारे कलाकार नवाझुद्दीन सिद्दिकी यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या ते एका नव्या चित्रपटात काम करत आहेत. आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून त्यानी ही माहिती दिली आहे. 5) स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहम आदेश बांदेकर अभिनेता म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्चपासून सुरू होणार आहे. by Rohini Thombare March 2, 2021 0 Read more
Uncategorized महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: आजही नवे रुग्ण आठ हजारावर, ४८ तासात २९ मृत्यू by tdadmin September 6, 2026 0 मुक्तपीठ टीम महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ आज राज्यात ८,२९३ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज रोजी... Read more
Uncategorized *मनोरंजन महत्त्वाचं*: १) मराठी रसिकप्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे चला ‘हवा येऊ द्या’. या मंचावर अनेक कलाकार उपस्थित होते. नुकतेच या कार्यक्रमात लोकप्रिय मालिका “येऊ कशी तशी मी नांदायला”मधील कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या भागात ओम आणि स्वीटूने अनेकांचं लक्ष वेधून घेतले आणि धम्माल केली. २) अभिनेत्री सारा अली खान सोशल मिडियावर कायम ऍक्टीव्ह असते. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बहिणीसोबतचा म्हणजेच इनायासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोने तिच्या चाहत्यांचे जिंकले आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू आहे. ३) मराठी शो ‘बिग बॉस’ तसेच ‘रोडीज’सारख्या रिअॅलिटी शो मधून आपली ओळख निर्माण करणारा शिव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणारा शिव अनेकदा त्याचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतेच त्याने ‘लोकल’ प्रवास करत तृतीयपंथीयांशी संवाद साधला. शिवचे हे फोटो चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत असून त्यावर ते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ४) सोशल मीडियावर सलमान खानच्या गाण्यांची आणि चित्रांची चर्चा होत असते. यावेळीदेखील सलमान त्याच्या चित्रकलेमुळे चर्चेत आला असून त्याने रेखाटलेलं एक चित्र बंगळुरुमधील कलाप्रदर्शनात ठेवण्यात आलं आहे. याविषयी एक पोस्ट शेअर करत सलमानने माहिती दिली आहे. ५) झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत त्यांनी “अण्णा नाईक… परत येणार!!! ‘रात्रीस खेळ चाले ३’ लवकरच…” असे कॅप्शन दिले आहे. by Rohini Thombare May 1, 2021 0 Read more
Uncategorized *मनोरंजन महत्त्वाचे*: 1) अभिनेत्री परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातलं ‘मतलबी यारीयाँ’ हे गाणं परिणीतीने स्वतः म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिने याबद्दल माहिती दिली आहे. 2) ‘बिग बॉस’ १४ मधील गायक राहुल वैद सध्या चांगलाच चर्चेत आहे. राहुल वैद्यने या शोच्या माध्यमातून अनेकांची मनं जिंकली. राहुलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गर्लफ्रेंड दिशा परमारसोबत एक फोटो शेअर केला आहे. ते हेलिकॉप्टरमध्ये बसून एन्जॉय करताना दिसत आहे, त्यामुळेल सध्या ते चर्चेत आहेत. 3) अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच रवीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिची मुलगी राशा थडानी हिच्या सोबतच फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. रवीनाची मुलगी राशाने तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी रवीनाने हे फोटो शेअर केले आहेत आणि शुभेच्छा दिल्या आहेत. 4) ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटात अजय आणि आलियाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 5) अभिनेत्री सनी लिओनीची मुलगी निशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये निशा वडिल डॅनियल वेबरला पाहून पळत त्यांच्याकडे जाते आणि त्यांना मिठी मारते. यामुळे सोशल मीडियावर याची भरपूर चर्चा आहे. by Rohini Thombare March 1, 2021 0 Read more
Uncategorized *मनोरंजन महत्त्वाचं*: १) मराठी अभिनयसृष्टीमधील अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांनी नुकतीच सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला असून ‘काल आमच्या दोघांमध्ये तिसरी आली’ असे कॅप्शन दिले आहे. ही तिसरी म्हणजे त्यांची नवी कार आहे. २) अभिनेत्री जान्हवी कपूरने सध्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत परिधान केलेल्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. जान्हवीने परिधान केलेल्या या ड्रेसची खरी किंमत $३,८०० म्हणजेच २ लाख ७५ हजार २१७ रूपये इतकी आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे. ३) अतिशय लोकप्रिय असलेला शो ‘बिग बॉस १४’मध्ये राखी सावंतचा सहभाग होता. तिने १४ लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिची आई हॉस्पिटलमध्ये कॅन्सवर उपचार घेत असल्याचे सांगितले. राखीने नुकताच तिच्या इन्स्टाकग्राम अकाऊंटवर आईसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राखीची आई ज्यांनी कोणी मदत केली आहे त्यांचे आणि सलमानचे आभार मानताना दिसत आहे. ४) अभिनेता सोनू सूद हा त्याच्या वेगवेगळ्या कामगीरींनी नेहमीच चर्चेत असतो. आता सोनूने पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणाऱ्या ग्रामस्थांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ५) आता यशोमान आपटे पहिल्यांदाच म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे. फुलपाखरू मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता यशोमान आपटे, ‘नको रुसवा नको दुरावा, सतत वाटे तू इथे जवळी रहा’ या नव्या म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. by Rohini Thombare May 1, 2021 0 Read more
Uncategorized क्रीडा थोडक्यात: १) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अवघ्या दोन दिवसांत अहमदाबाद कसोटी जिंकून इतिहास घडविला. भारत-इंग्लंड डे नाइट कसोटीत यजमान भारताने १० विकेट्स राखून सहज विजय मिळवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २२वेळा दोन दिवसांत निकाल लागले आहेत. अहमदाबाद कसोटीपूर्वी २१ वेळा सामन्याचा निकाल दोन दिवसांत लागला होता, परंतु भारतासाठी १२ तासांत विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. २) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्याच दिवशी इंग्लंडचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. या पराभवासोबतच इंग्लंडच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. आतापर्यंत कोणत्याही कसोटी सामन्यात ज्या दिवशी डाव सुरू झाला त्याच दिवशी संघ बाद होणे आणि दोन्ही डावात मिळून २०० धावांचा टप्पाही न ओलांडणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला. ३) पृथ्वी शॉ याने गुरुवारी विजय हजारे करंडक ५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला. पृथ्वीने १५२ चेंडूंत ३१ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने उभारलेल्या नाबाद २२७ धावांच्या खेळीमुळे मुंबईने ४ बाद ४५७ धावांचा विक्रमी डोंगर उभारला. त्यामुळे ड-गटात मुंबईने पुदुचेरीवर २३३ धावांनी दिमाखदार विजय नोंदवला. ४) ४०० बळी घेत भारतीय गोलंदाज अश्विन याने विक्रम आपल्या नावे केला आहे. सर्वात जलद ४०० बळी घेणाऱ्यांमध्ये अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने ७७ डावांत ४०० बळींचा टप्पा पार केला आहे. तर श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरन यानं ७२ डावांत पराक्रम केला आहे. आर. हॅडली आणि डेल स्टेन यांनी ८० कसोटीत ४०० बळींचा टप्पा पार केला आहे. तर रंगना हेरथ याने ८४ व्या कसोटीत हा पराक्रम केला आहे. by Vrushali Kotwal March 16, 2021 0 Read more
featured न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण? by Tulsidas Bhoite October 6, 2026 0
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी! September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण? September 5, 2026