Uncategorized गायरान जमीन वाटप प्रकरणी विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा! – अजित पवार December 29, 2022
Uncategorized माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा – संचालक हेमराज बागूल December 28, 2022
Uncategorized गुन्हे महत्त्वाचे : 1)नालासोपाऱ्यात एका रिक्षाचालकाची चाकूने हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालवीत असताना एका अज्ञात व्यक्तीने रिक्षा थांबविली. त्याने रिक्षाचालकाचा मोबाइल खेचला. यामध्ये झालेल्या झटापटीत त्याने रिक्षाचालकावर वार केला. 2)वसईतील रिक्षाचालकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी मनोर पोलिसांनी पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वसई येथील रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी पत्नी आणि प्रियकर हे दोघंही पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं उघड झालं आहे. 3)‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, सुरक्षित मुंबई’ या शीर्षकांतर्गत मुंबई महानगरपालिकेने क्लीनअप मार्शल ही संकल्पना राबवायला सुरुवात केली होती. पण अगदी पहिल्या दिवसापासूनच क्लीनअप मार्शल वादात सापडू लागले. दंडाच्या नावाखाली क्लीनअप मार्शल मुंबईकरांकडून एक प्रकारे वसुलीच करु लागले होते. असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल अशोक तावडे या क्लीनअप मार्शलला अटकही केली आहे. 4)उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक येथील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केला असल्याचं या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी पोलीस नाईक हरिभाऊ कोळेकर याच्यावर उस्मानाबाद शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 5)दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी आज (बुधवार) जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडे विनापरवाना पिस्तुल, चार राऊंड, दोन तलवारी अशी शस्त्रे आढळली. by Apeksha Sakpal March 5, 2021 0 Read more
Uncategorized *मनोरंजन महत्त्वाचे* १) अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत मुंबईमधील रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत आहे. दरम्यान अभिनेता विकास गुप्ता राखीच्या आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तेथील एक व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. २) अभिनेत्री रवीना टंडने करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रवीनाचा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.रवीनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रवीना स्वत: वर सॅनिटायजरचा स्प्रे करताना दिसत आहे. ३) अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी लवकरच चित्रपटसृष्टीत मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. मिलन लुथ्रिया दिग्दर्शित ‘तडप’ या चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात आहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ४) बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या ‘गर्ल ऑन द ट्रेन’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. परिणीतीच्या भूमिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय. परिणीती चोप्रा बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालच्या बायोपिकमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ५) बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच ‘धमाका’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर प्रदर्शित होणार आहे. by Rohini Thombare March 22, 2021 0 Read more
Uncategorized गुन्हे महत्त्वाचे : 1)ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत एका तरुणाने आपल्या मालकाच्या पत्नीची हत्या केली. मालकाच्या पत्नीकडे त्याने शरीरसुखाची मागणी केली. विरोध केल्यानंतर त्याने तिची हत्या केली. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात आरोपी तरुणाला अटक केली. गुड्डू कुमार उर्फ रंजन असे आरोपीचे नाव आहे. आरोपी तरूण हा डोंबिवलीतील एका किराणा दुकानात काम करत होता. 2)कौटुंबिक कलहातून वडिलाने ब्लेडने गळा चिरून दोन वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर ब्लेडने स्वत:च्याही गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुटीबोरीतील गणेशपूर परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. राधिका किशोर सोयाम, असे मृत चिमुकलीचे तर किशोर सुखदेव सोयामअसे मारेकरी वडिलाचे नाव आहे. 3)साताऱ्यातील सासवड (ता फलटण) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्च दाबाची पाइपलाइन फोडली आणि दोन हजार लिटर पेट्रोल लंपास करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठं भगदाड पाडलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत भगदाड बंद करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. 4)जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 5) नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 4 येथे वास्तव्यास असलेले प्रकाश शेट्टीयांचे घर काही दिवसांपासून बंद होते. याचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किमतीचं सोनं लंपास केलं आहे by Apeksha Sakpal March 4, 2021 0 Read more
Uncategorized क्रीडा थोडक्यात: १) भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्ट नापास झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर टीममधील अधिकाऱ्यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे की राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये वरुण नापास झाला. पण त्याला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. २) सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणारी मेरी कोम तसेच आशियाई सुवर्णपदक विजेता अमित पांघल यांच्यासह भारताच्या १२ बॉक्सिंगपटूंनी एकही लढत न खेळता बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पदकापासून ते फक्त एक विजय दूर आहेत. भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले नऊ तसेच अन्य पाच बॉक्सिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर मेरी कोम (५१ किलो) पहिल्यांदाच रिंगणात उतरत आहे. तिला सलामीच्या लढतीत इटलीच्या जिओर्डना सोरेन्टिनो हिच्याशी लढत द्यावी लागेल. ३) भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा विवाहबंधनात अडकण्याची चर्चा असल्याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेलासुद्धा मुकण्याची शक्यता बळावली आहे. त्याशिवाय अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. १२ ते २० मार्चदरम्यान अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२०, तर २३ ते २८ मार्चदरम्यान पुण्यात एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ४) भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि वेस्ट इंडिजचा उदयोन्मुख फलंदाज कायले मेयर्स यांची ‘आयसीसी’ने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन नामांकनात निवड केली आहे. इंग्लंडच्या विरुद्धच्या तीन कसोटींमध्ये २४ बळी घेत १७६ धावा केल्या. तर जो रुटने द्विशतकासह ३३३ धावा करत ६ बळी घेतले. तसेत कायले मेयर्स हा सुद्धा या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. ५) इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टीत फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्याउलट फलंदाजांनी फिरकीपटूंविरुद्ध कशा प्रकारे कामगिरी उंचावता येईल, याकडे लक्ष द्यावे, असे स्पष्ट मत भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले. “चौथ्या कसोटीसाठी मोटेराच्या खेळपट्टीत फारसे बदल होणार नाहीत. तिसऱ्या कसोटीत गुलाबी चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळल्याने फलंदाजांची भंबेरी उडाली. परंतु त्यामुळे पूर्णपणे फलंदाजांना पोषक खेळपट्टी बनवण्यात येणार नाही,” असे रहाणे म्हणाला. by Vrushali Kotwal March 8, 2021 0 Read more
Uncategorized *मनोरंजन महत्त्वाचे*: १) अभिनयातून हिरोपंती करून प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता टायगर श्रॉफचा आज ३१ वा वाढदिवस आहे. त्याला ‘मुक्तपीठ’च्या हार्दिक शुभेच्छा… २) अभिनेत्री आणि गायिका श्रद्धा कपूर हीने सध्या मालदीव मधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती तिच्या भावाच्या लग्नासाठी मालदीवला गेली आहे. तिच्या या व्हिडीओमुळे तीने चाहत्यांचे मन घायाळ केले आहे. यामुळे ती सध्या चर्चेत आहे. ३) वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक जण आता अभिनय क्षेत्रात उतरताना दिसतात. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्थ आहे. तो लवकरच ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ४) बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारेच आपल्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चाहत्यांना अमिताभ यांची काळजी होती. पण नुकतेच अमिताभ यांनी ब्लॉग पोस्ट करत डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता त्यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. ५) अभिनेता विकी कौशल आणि मिस वर्ल्ड म्हणजे मानुषी छिल्लर हे दोघे लवकरच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा एक विनोदी चित्रपट असल्याची माहिती मिळाली आहे. पण अजूनही या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. by Rohini Thombare March 3, 2021 0 Read more
Uncategorized क्रीडा थोडक्यात: १) भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका पुण्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. ही मालिका २३ मार्चपासून सुरु होणार आहे. सध्याच्या घडीला पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार या मालिकेत रोहित, रिषभ आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खेळवण्यात येणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता वनडे मालिकेतही मोठा धक्का बसू शकतो. २) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. मात्र हा रेकॉर्ड मैदानावर नसून मैदानाबाहेर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या १० कोटी झाली असून तो पहिलाच भारतीय आणि विशेष म्हणजे पहिलाच क्रिकेटर ठरला आहे. जगभरातील खेळाडूंच्या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी आणि नेमार ज्युनिअर यांचीही नावे आहेत. तसेच १० क्रिकटर्समध्ये इन्स्टाग्रामवर प्रयोजित पोस्टच्या माध्यमातून कमाई करणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटर आहे. ३) यश नाहर आणि अंकित बावणे यांच्या दमदार शतकी खेळीमुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात पुदुचेरीवर १३७ धावांनी मात केली. मात्र या विजयानंतरही महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने बाद फेरीत मजल मारण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. ४) टोक्यो ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची असून महिला एकेरीत सिंधू आणि सायना यांच्यावर भारताची भिस्त आहे. सिंधूची पहिल्या फेरीत तुर्कीच्या नेसलिहान यिग्टशी गाठ पडणार आहे. सायनापुढे सलामीला कोरियाच्या संग जी ह्य़ुनचे आव्हान असेल. सिंधू आणि सायना या दोघींनीही अपेक्षेनुसार कामगिरी केली, तर उपांत्य फेरीत त्या एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू शकतात. सिंधूने ऑलिम्पिक पात्रता मिळवली असली तरी सायनासाठी मात्र ही स्पर्धा महत्त्वाची आहे. ५) भारतामधील कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ आता १-२ अशा पिछाडीवर आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीमध्ये इंग्लंडचा संघ लवकर बाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला आता मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. इंग्लंड क्रिकेट मंडळाने फलंदाजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू मार्कस ट्रेस्कॉटीकची निवड केली आहे. त्याचबरोबर आता इंग्लंड क्रिकेट मंडळाने वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकांचीही यावेळी नेमणूक केली आहे. by Vrushali Kotwal March 16, 2021 0 Read more
Uncategorized गुन्हे महत्त्वाचे: 1)मुंबई पोलिसांनी वरळीतील ७७ वर्षीय महिलेच्या हत्या प्रकरणी नोकरासह त्याच्या मित्राच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुरुवारी (२५) फेब्रुवारीला वरळीतील सर पोचखानवाला रोडपरिसरात महिलेची हत्या करुन घरातून सोने आणि पैशांची चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी निशाद आणि अभिजीत जोरिया अटक केली आहे. वरळीतील या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. हत्या झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींकडून सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. 2)नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेला करोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने तिला महापालिकेच्या कल्याण पश्चिम येथील आर्ट गॅलरीमधील करोनारुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना सोमवारी संध्याकाळी रुग्णालयातील वॉर्डबॉय श्रीकांत मोहिते याने तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला. रुग्णालयात नातेवाईकांना येण्यास बंदी असल्याने या महिलेने तातडीने फोनवरून पतीशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर सदर महिलेच्या पतीने बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत सदर वॉर्डबॉयविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली 3)मिरा-भाईंदरच्या काशिमिरा पोलिसांनी बेकायदेशी २० लाख रुपये किंमतीच्या गुटख्याची वाहतूक करताना टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांना दोघांना अटक करत गुन्हे दाखल केले आहेत. 4)भारतीय नोटा देण्याच्या बदल्यामध्ये एक हजार ४४० इतके अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करून भाईंदर येथील रहिवासी डेनिस पाटील यांची तीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. 5)अंधेरीत सात बंगला परिसरात असलेल्या एक्सिस बँकेच्या बाहेर एका कुत्र्याची सतत भुंकत राहतो म्हणून पाच हजारांची सुपारी देत हत्या करविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वर्सोव्यात सोमवारी उघड झाला. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी चौघांना अटक केली असून , यात सोसायटी चेअरमॅनने हे करविल्याचे पोलिसांनी सांगितले. by Apeksha Sakpal March 3, 2021 0 Read more
Uncategorized क्रीडा थोडक्यात: १) कोरोना साथीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने जबरदस्त पुनरागमन केले आहे. रविवारी विनेशने कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या विनेशला ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली. विनेशने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर कॅलाडझिन्स्कायने ४-४ अशी बरोबरी केली. विनेशने पुन्हा ६-४ अशी आघाडी घेतली. दडपण वाढवत कॅलाडझिन्स्कायने ४ गुणांची कमाई केली. पण अखेर विनेश हिने १०-८ अशा फरकाने विजय मिळविला. २)भारतीय पुरुष हॉकी संघाने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत यजमान जर्मनीचा ६-१ असा धुव्वा उडवत जर्मनी हॉकी दौऱ्याची शानदार सुरुवात केली. निळकंठ शर्मा (१३व्या मिनिटाला), विवेक सागर प्रसाद (२७व्या आणि २८व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (४१व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (४२व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग (४७व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहेय. तर चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला विजय भारताने मिळविला आहे. ३) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १४व्या हंगामातील सामन्यांसाठी चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळूरु आणि दिल्ली अशा पाच शहरांची निवड केली होती. परंतु महाराष्ट्र शासनाने प्रेक्षकांविना सामन्यांना शनिवारी परवानगी दिल्यामुळे या यादीत मुंबई या सहाव्या शहराची भर पडली आहे. हैदराबाद, चंडीगड आणि जयपूरला सामने होणार नसल्यामुळे अनुक्रमे सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांना घरच्या मैदानात खेळण्याची संधी मिळणार नाही आहे. ४) इंग्लंड विरोधातील अहमदाबादमध्ये कमी धावसंख्येच्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा याने आयसीसीकडून जाहीर झालेल्या रॅकिंगमध्ये सहा स्थानांनी झेप घेतली आहे. तो आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानावर पोहचला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ६६ धावा केल्या, तर दुसर्या डावात नाबाद २५ धावा केल्या. त्यासोबतच आयसीसीने म्हटले आहे की, आता मालिका संपल्यावर रँकिंग जाहीर होण्याऐवजी मार्चपासून दर आठवड्याला रँकिंग जाहीर होणार आहे. ५) टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कसोटी सामना पार पडल्यानंतर होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत वरूण चक्रवर्थीची पदार्पणाची संधी पुन्हा एकदा हुकण्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्थी हा अपयशी ठरला असल्याचे सांगितले जात आहे. by Vrushali Kotwal March 2, 2021 0 Read more
Uncategorized गुन्हे महत्त्वाचे: 1)पोटच्या मुलाचाच खून केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरून शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील टिळक नगर येथील एका महिलेची शिक्षा अखेर मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या अपिलावर निर्णय देताना रद्दबातल ठरवली. त्यामुळे मागील सात वर्षांहून अधिक काळापासून मुंबईतील भायखळा महिला तुरुंगात तुरुंगवास भोगत असलेल्या या महिलेला सुटकेचा दिलासा मिळाला आहे. मात्र, याच हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला तत्कालीन पोलिस अधीक्षक शिवाजी नरवणे याचे अपिल न्यायालयाने फेटाळून लावले. 2)एका १७वर्षीय मुलीसमोर जाणीवपूर्वक व लैंगिक हेतूने अश्लिल हावभाव व वर्तन केल्याबद्दल विशेष पोक्सो न्यायालयाने नुकतीच एकाला एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ‘प्रत्यक्ष शारीरिकदृष्ट्या लैंगिक शोषण नसले तरी आरोपीने केलेली आक्षेपार्ह कृती ही लैंगिक हेतूने केलेली आहे’, असे निरीक्षण नोंदवून न्या. एच. सी. शेंडे यांनी व्यवसायाने वाहनचालक असलेल्या आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४(अ) (अश्लिल लैंगिक हावभाव करत विनयभंग)अन्वये आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. 3)घरात एकट्याच राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेकडील दत्त आळी या गजबजलेल्या परिसरात घडली आहे. हंसाबेन ठक्कर असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 4)शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल ऑउट’ अभियान राबविले. या अभियानांतर्गत शहरातील २१७ ठिकाणी कारवाई (कोम्बिग) करून ३८ फरार आरोपींना अटक करण्यात आली. 5)शनिवारी अंधेरीत विवाहितेच्या हत्येची घटना समोर आली. मुंबईत हत्या सत्र सुरू असून, गेल्या सहा दिवसांत सहा हत्येची घटनांची नोंद मुंबई पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे. by Apeksha Sakpal March 2, 2021 0 Read more
Uncategorized *मनोरंजन महत्त्वाचे*: 1) अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इसाबेलचा काही दिवसांपूर्वी अभिनेता सूरज पांचोली याच्यासोबतच्या ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सलमानने ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करत “ऑल द बेस्ट टीम” असे कॅप्शन सलमानने दिले आहे. 2) प्रभासचा ‘सलार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. प्रभासने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे. 3) बाहुबली चित्रपटामधला भल्लालदेव म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबतीचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. 4) आपली भूमिका अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडणारे कलाकार नवाझुद्दीन सिद्दिकी यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या ते एका नव्या चित्रपटात काम करत आहेत. आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून त्यानी ही माहिती दिली आहे. 5) स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहम आदेश बांदेकर अभिनेता म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्चपासून सुरू होणार आहे. by Rohini Thombare March 2, 2021 0 Read more
featured हवेतील बेवड्या प्रवाशांमुळे अखेर डीजीसीए कडक भूमिकेत! विमान कंपन्यांना इशारा!! by Sushrusha Jadhav January 7, 2023 0
६व्या महिन्यात जन्म, ४०० ग्रॅम वजन, ९४ दिवस रुग्णालयात…डॉक्टरांच्या प्रयत्नांनी वजन वाढवून बाळ घरी! January 7, 2023