Uncategorized

#व्हाअभिव्यक्त मोदी सरकार सरकारी कंपन्या विकून खरंच देश विकतंय?

सदानंद घोडगेरीकर   मोदी सरकारी कंपन्या विकत आहेत, देश अंबानी अदानीना विकत आहेत हे वाक्य राहुल गांधी यांच्याकडून सतत ऐकायला...

Read more

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, १६ मार्च २०२१:   आज राज्यात १७,८६४ नवीन रुग्णांचे निदान. आज ९,५१० रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण १,३८,८१३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,५४,२५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७७ % एवढे झाले आहे. राज्यात आज ८७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण ८७ मृत्यूंपैकी ३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. ३१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७७,१५,५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,४७,३२८ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५२,५३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. ६,०६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read more

क्रीडा थोडक्यात: 1) भारत आणि इंग्लंड यांच्यामधील ट्वेन्टी-२० मालिका सुरु असताना आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ट्वेन्टी-२० मालिकातील पाचपैकी दोन सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडले आहेत. पहिल्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. पण उर्वरीत तीन सामन्यांसाठी गुजरात क्रिकेट संघटनेने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. संघटनेच्या या निर्णयामुळे चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. 2) भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसाठी १६ मार्च ही तारीख खूप खास आहे. १२ मार्च २०११ रोजी विश्वकरंडक स्पर्धेत सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले ९९वे शतक केले होते. त्यानंतर अनेक सामने खेळल्यानंतरही सचिनला शतक करता आले नव्हते. शेवटी, बांगलादेशच्या मुशरफी मुर्तझाच्या चेंडूवर फटका खेळत सचिनची मोठ्या विक्रमाची प्रतीक्षा संपली. या सामन्यात सचिनने ११४ धावांची धमाकेदार खेळी केली होती. सचिनचा शतकांच्या शतकाचा विक्रम आजही अबाधित असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू म्हणून सचिनची ख्याती आहे. 3) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या १५ वा सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका लीजण्डस संघाने बांगलादेश लीजण्डस संघावर १० गडी राखून मात मिळवली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या मालिकेच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ पहिल्या स्थानावर असून इंडिया लीजण्डसचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशवरील विजयामुळे आफ्रिकेने तिसरे स्थान मिळवले आहे. तर, इंग्लंड आणि वेस्ट इंडिंज यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर चौथ्या स्थानी कोण येणार, हे स्पष्ट होईल. 4) फेडरेसन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अन्नू राणी हिने नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. राणीने ६३.२४ मीटर अशी कामगिरी करत स्वत:चाच ६२.४३ मीटरचा विक्रम मोडीत काढला. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष ६४ मीटर इतका आहे. त्यामुळे ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही. 5) भारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा थरार अनुभवण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एप्रिल २०१९मध्ये या लीगची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. परंतु काही कारणांनी खो-खो लीग पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता पुन्हा या स्पर्धेच्या आयोजनाकरिता महासंघाने पावले उचलली आहेत. देश-विदेशातील पुरुष खो-खोपटू आणि १८ वर्षांखालील मुलांच्या समावेशासह खेळवल्या जाणाऱ्या अल्टिमेट लीगच्या लढतींचे हिंदी, इंग्रजी भाषेतील समालोचनासह थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने खो-खो प्रेमींसाठी चांगली पर्वणी असणार आहे.

Read more

#मुक्तपीठ मंगळवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

मुक्तपीठ www.muktpeeth.com टॉप १० व्हायरल बातमीपत्र मंगळवार, १६ मार्च २०२१   महाराष्ट्रातील प्रत्येकाला लस द्या, उद्योगपती महिंद्रांची मागणी आर्थिक केंद्र...

Read more

गुन्हे महत्त्वाचे: 1)तुर्भे सेक्टर-२१ भागात राहाणाऱ्या एका तरुणाने आपल्याच घरातील तब्बल ७ लाख ७८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. मतिन नूर कासम शेख असे या तरुणाचे नाव असून त्याच्या वडिलांनीच त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 2)एकतर्फी प्रेमातून कॉलेज युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईतील एव्हरशाईन परिसरात ही घटना घडली आहे. लग्नासाठी नकार दिल्याने घरात घुसून माथेफिरु तरुणाने तरुणी आणि तिच्या आईवर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. 3) हडपसर गावातील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांचा समावेश आहे. आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्यारे आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 4)केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी १५ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि त्यांचे सहकारी सुहास मढवी यांचा समावेश आहे. आतापर्यंत केडीएमसीचे ३७ अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. केडीएमसीमध्ये बांधकाम आणि बांधकामातून मिळणारा पैसा हा किती प्रमाणात वसूल केला जातो, हेच यातून उघड होत आहे 5)खर्चासाठी पाचशे रुपये न दिल्याचा राग आल्याने एकाने विश्रांतवाडीतील ‘शांती हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक’ दुकानाच्या मालकावर रविवारी दुपारी एकच्या सुमारास कोयत्याने वार केले. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Read more

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या मंगळवार, १६ मार्च २०२१ • रोज सकाळी ९ वाजता...

Read more

गुन्हे महत्त्वाचे: 1)उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी सहायक निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक झाल्यावर मुंबई आणि ठाण्यातील आणखी काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी ‘एनआयए’च्या निशाण्यावर आहेत. उपायुक्त दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. 2)उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकीवरून आलेल्या तरुणाने घराबाहेर सुकत ठेवलेले तरुणीचे अंतर्वस्त्र चोरून ते दुचाकीच्या डीक्कीत ठेवून तो पसार झाला. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.यात हा जादूटोण्याचा प्रकार असू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 3)सरपण तोडण्यावरून २४ वर्षीय महिलेला तिच्या जावेने आणि चुलत सासूने पेटवून दिल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मनोली गावात घडली. मुले मदतीला धावल्याने महिलेचा जीव वाचला खरा; पण ती ६० टक्के भाजली आहे. पेटवून देणाऱ्या दोघी महिलाच होत्या. त्यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4)परभणीच्या पाथरी तालुक्यातील मुदगल येथे आजारी असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पतीने धारदार शस्त्राने वार करत पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5)बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन साबळे यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशनचे विद्यमान पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, त्यांच्या आधीचे पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण या तिघांविरोधात ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे.

Read more

*मनोरंजन महत्त्वाचे*: १. भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. अभिनेत्री गीता बसरा म्हणजेच हरभजनची पत्नी हीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये गीताने स्वतःचे बेबी बम्पसोबतचे फोटोज शेअर केले आहेत. २. सध्या सोशल मीडियावर रंगलेला झोमॅटोचा विषय, यावर अनेकांनी आपले मत मांडत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर या प्रकरणावर अभिनेत्री परिणिती चोप्राने केलेले ट्वीट चर्चेत आहे. ‘झोमाटो इंडिया- कृपया सत्य शोधा आणि जाहीरपणे कळवा जर तो माणूस निर्दोष असेल तर, त्या महिलेला दंड देण्यास मदत करा. मी यासाठी कशा प्रकारे मदत करू शकते हे मला कळवा’ या आशयाचे ट्वीट तिने केले आहे. ३. बॉलिवूडच्या भाईजानच्या लवकरच येणाऱ्या ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या ईदला म्हणजेच १४ मे ला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. सलमान खानने सोशल मीडियावरुन त्याच्या चाहत्यांना ही गूड न्यूज दिली आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. ४. भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. बुमराह हा स्पोर्ट्स सुत्रसंचालक संजना गणेशननशी लग्न करणार आहे. याबद्दलची माहिती, अभिनेत्री तारा शर्मा सलुजाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ५. मागील वर्षापासून ‘सूर्यवंशी’ चित्रपट सिनेमागृहात झळकण्याची आतुरता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख समोर आली आहे. ३० एप्रिल २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे म्हटले आहे.

Read more

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र रविवार, १४ मार्च २०२१ सचिन वाझेंच्या संपर्कातील विधान परिषदेचा 'तो' आमदार कोण? http://muktpeeth.com/sachin-vaze-in-touch-with-mlc-alleged-sameer-thakkar/ सरकारसाठी शुभसंकेत नाहीत...चाणक्यांनी...

Read more

गुन्हे महत्त्वाचे : 1)विरारच्या खाणीवडे गावात एका माथेफिरु तरुणाने घरात घुसून कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून माथेफिरु तरुणाने हल्ल्यानंतर स्वत:ला बाथरुममध्ये बंद करुन हाताची नस कापून घेऊन स्वत:लाही जखमी करुन घेतले आहे. स्थानिक गावकऱ्यांनी माथेफिरुला सुरक्षित पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 2)वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी पालघर पोलिसांच्या ऑपरेशन ऑलआऊटमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. पालघरमधील ३५ वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 3)’लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदानमधील आदर्शनगर येथे शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. स्विटी ऊर्फ चित्रा राज धुर्वे असे तिचे नाव आहे. ती मूळ काटोल येथील रहिवासी होती. 4)लग्नाचे आमिष दाखवून ४५ वर्षीय विधवा महिलेवर पोलिस निरीक्षकाने अत्याचार केला. तिच्याकडील एक लाखाची रोख व दागिने घेऊन निरीक्षक पसार झाला. ही घटना गिट्टीखदान भागात उघडकीस आली. या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. 5)बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघा भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्याच्याजवळ असलेल्या १ लाख रुपयांच्या रक्कमेतील २७,५०० रुपयांच्या नोटा चोरून पलायन केल्याची घटना कळंबोलीतील पंजाब नॅशनल बँकेत शुक्रवारी दुपारी घडली. कळंबोली पोलिसांनी या घटनेतील दोघा भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Read more
Page 16 of 23 1 15 16 17 23

ताज्या बातम्या

error: Content is protected !!