Uncategorized

#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या सोमवार, २९ मार्च २०२१   पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा...

Read more

जनरल महत्वाच्या : १)कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या लक्षणात अनेक बदल दिसून येत असल्याने उपचार करताना अनेक अडचणी समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेतील  कोरोना अधिक घातक ठरत असल्याने कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस कोरोनाच्या प्रारंभिक लक्षणात सर्दी, ताप, खोकला आला की कोरोनाची ही प्रमुख लक्षणे मानली जायची. आणि त्यानुसार चाचणी करून डॉक्टर उपचार करत. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या विषाणूंमध्ये अनेक बदल दिसून येत आहेत. त्यानुसार रुग्णांना विविध प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी,अशक्तपणा, जुलाब, चव जाणे, डोकेदुखी इत्यादी प्रकारची नवी लक्षणे दिसून येत आहेत. २) मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणांसोबतच आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या कमी झाली नाही, तर कडक निर्बंध करण्यासोबतच लॉकडाऊनचाही इशारा देण्यात आला आहे. नागरिकांकडून वारंवार कोरोना नियमांची पायमल्ली होत असताना आता प्रशासन मात्र कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, हेच स्पष्ट होत आहे. ३) महिन्यात २५ फेब्रुवारीला, हे महागडे औषध अमेरिकेतून रुग्णालयात पोहचले हे औषध देण्याचा परवाना हिंदुजा रुग्णालयाकडे आहे. शुक्रवारी २६ फेब्रुवारी रोजी हे औषध तीराला सलाईन मार्फत देण्यात आले असून एक दिवस तिला रुग्णालयात देखरेखी खाली ठेवण्यात येईल आणि शनिवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. अशा पद्धतीने या आजारांवर औषध मिळणारी तीरा मुंबईतील दुसरे मूल असून यापूर्वी अशाच स्वरूपाचे इंजेक्शन एका बाळाला महिन्यापूर्वीच याच रुग्णालयात देण्यात आले आहे. ४) मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गामुळे आधीच हैराण असलेले नागरिकांना आता उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मुंबई शहरासह, नाशिक, सोलापूर, अकोला, सिधुदुर्ग, रत्नागिरीत उकाडा वाढला आहे. पुढच्या काही दिवसांत उष्णता आणखी वाढणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ५) राज्यात ११ मार्चला हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून १४ मार्चला ठरलेल्या तारखेला एमपीएससीची परीक्षा घेण्यात यावी या मागणी केली होती. यावेळी पुण्यात विद्यार्थ्यांनी जोपर्यंत परीक्षा १४ मार्चला होतील हे सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हलणार नाहीत असा निर्णय घेतला होता. त्यावेळी कोरोना काळात एकत्र येण्यास बंदी असताना देखील विद्यार्थी रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरून आंदोलन केले त्यामुळे शासनाने लागू केलेल्या नियमांची पायमल्ली झाली आहे. हे कारण समोर करत राज्यभरात हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून परीक्षा २१ मार्चला होणार असल्याची माहिती दिली होती. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्यांनतर २१  मार्चला एमपीएससीच्या परीक्षा सुरळीत पार देखील पडल्या. परंतु यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. याबाबत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली. 

Read more

गुन्हे महत्वाचे : 1)स्वत:च्या मुलीवर व अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोप प्रकरणात विशेष पोक्सो न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपीला नुकतेच दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 2)आईचा दुसरा पती अर्थात सावत्र वडिलाने आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून महेंद्र या नराधमाला अटक केली. 3)महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिस मुख्यालयातील हवालदारावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यास आत्महत्या करण्याची धमकी संबंधित पोलिसाने महिलेला दिली होती. 4) लग्न खरेदीच्या नावाखाली बनावट पेटीएम अ‍ॅपद्वारे दुकानदारांना हजारोंचा गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील या अट्टल चोरट्यांकडून जवळपास 75 हजारांचे कपडे ताब्यात घेण्यात आले आहेत. 5)गुजरातहून स्पोर्ट्स बाईकने येऊन मुंबईतील व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या चोरट्यांना दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोघा लुटारुंकडून तब्बल 13 लाख रुपयांची रोकड आणि एक स्पोर्ट्स बाईक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. व्यापाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्या हातातील रोकड लुटण्याची त्यांची मोडस ऑपरेंडी होती.

Read more

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

सामनाचा 'रोख' कुणाला 'ठोक'णारा? "वाझेसारख्या सामान्य फौजदाराचे महत्व का वाढले?" http://muktpeeth.com/who-is-saamana-sanjay-rauts-target/   १०० कोटींची महावसुली! देशमुखांवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी...

Read more

#मुक्तपीठ शुक्रवारचे व्हायरल बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र शुक्रवार, २६ मार्च २०२१   संजय राऊतांची ठाकरे सरकारवर का नाराजी? वाचा आणि समजून घ्या कारणे......

Read more

गुन्हे महत्वाचे : 1)दारूच्या नशेत विवाहितेने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे. मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत शिंदे यांनी प्रसंगावधान साधत तिचा जीव वाचविला. यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट करत त्यांचे कौतुक केले आहे. 2)मोबाईल चोरीच्या संशयावरुन डोंबिवलीत एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. संबंधित व्यक्तीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी दोन जणांना अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. 3)अभ्यासाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ६९ वर्षांच्या शिक्षकास तर दुसऱ्या घटनेतील २४ वर्षीय युवकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. चंद्रकांत वामन भालेराव आणि राहुल दौलत बोडके असे या आरोपींची नाव आहेत. 4)नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुरुवारी रात्री मोठी कारवाई केली. मुंबई शहरातील सर्वात मोठ्या ड्रग्ज सप्लायरच्या मुलाला अटक केली आहे. त्याच्याकडून २ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. 5)तळोजा येथील पिसार्वे गाव परिसरामध्ये हेरॉईन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने व अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी संध्याकाळी सापळा लावून अटक केली आहे. जसविंदर दलजित सिंग व साबिर रझाक पठाण अशी या दोघांची नावे असून गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांजवळ असलेले १०३ ग्रॅम वजनाचे १० लाख ३० हजार रुपये किमतीचेहेरॉइन तसेच, त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली स्कुटी व पल्सर मोटरसायकल जप्त केली आहे.

Read more

#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या शुक्रवार, २६ मार्च २०२१   पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा...

Read more

गुन्हे महत्वाचे : 1)लाकडी बॅटने केलेल्या मारहाणीत एका श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना गोवंडी परिसरातून समोर आली आहे. याबाबत प्राणीमित्राच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी श्वानाची हत्या करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2)’कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलवायचे झाल्यास आगाऊ तीन दिवसांची (सुट्यांचे दिवस वगळून) स्पष्ट नोटीस द्यावी. तसेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करायची झाल्यास आगाऊ ७२ तासांची स्पष्ट नोटीस द्यावी, जेणेकरून त्यांना योग्य न्यायालयासमोर दाद मागता येईल’, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिला. त्यामुळे गोस्वामींना दिलासा मिळाला आहे. 3)’लिव्ह इन रिलेशन’मध्ये गेल्या अठरा वर्षांपासून राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मित्रासोबत संगनमत करून बाबासाहेब पिराजी सातदिवे (४९, रा. बजाजनगर) याच्यावर जीवघेणा चाकूहल्ला केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी महिला व तिच्या साथीदाराविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.4)रेल्वेच्या दारात लटकून प्रवास करणं किती जीवघेणं ठरु शकतं, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आलंय. दरवाजात लटकून प्रवास करताना रेल्वेच्या खांबाला डोकं आपटून शिर धडावेगळं झाल्याची घटना मुंबईजवळच्या अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ लोकलमध्ये रात्री एक वाजता धड नसलेलं शिर लगेजच्या डब्यात सापडल्याने ही घटना उघडकीस आली. 5)कल्याणमध्ये शिवसेना माजी नगरसेवकाचा वाढदिवस गाजावाजा करत साजरा करण्यात आला. शेकडो समर्थक जमले. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याच दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणीतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

Read more

*मनोरंजन महत्त्वाचे*: १. लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता लवकरच अॅनिमेटेड स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका खास लहान मुलांसाठी बनविण्यात आली आहे. २. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा नुकताच आलेला टीव्हीवरील ‘डान्स दीवाने ३.’या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान, हेलन आणि आशा पारेख या हजेरी लावणार आहेत. तर माधुरीने त्यांच्यासोबत डान्स केला असून सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ३. अभिनेत्री एरिका फर्नाडिस म्हणजेच ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणा. ही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या ती मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यामुळे तिचे हॉट लूकमधील फोटो चर्चेत आहेत. ४. मराठमोळी अभिनेत्री तसेच लावणीची क्विन म्हणजेच मानसी नाईक आपल्या हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. मानसीने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मानसीने बाथरुममध्ये फोटोशूट केले आहे. यात ती सुंदर दिसत आहे. ५. आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ चित्रपट एकाच दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहेत. एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणे हे काही नवीन नाही. परंतु बाप-लेकाचे हे चित्रपट एकाच दिवशी येत आहेत म्हणून ही चर्चा रंगली आहे.

Read more
Page 13 of 23 1 12 13 14 23

ताज्या बातम्या

error: Content is protected !!