Uncategorized

“देवेंद्रजी, महाराष्ट्र भारतातच! दुसऱ्या देशांच्या पॅकेजेसचे मोदींना सांगणार का?”

मुक्तपीठ टीम   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन शुक्रवारी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

Read more

सातारा जिप, गडहिंग्लज आणि राहाता पंचायत समित्यांसह १६ ग्रामपंचायतींना केंद्राचे पुरस्कार

मुक्तपीठ टीम   केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये राज्यातील सातारा जिल्हा परिषद, गडहिंग्लज (जि....

Read more

नाकारली रिकामी लोअर बर्थ, आता रेल्वेला ३ लाखांचा दंड!

मुक्तपीठ टीम   उपलब्ध असूनही ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ नाकारणे रेल्वेला महाग पडले आहे. घटना दहा वर्षांपूर्वीची आहे. एका ज्येष्ठ...

Read more

महिंद्रांचं मोठं मन…सहा क्रिकेटर्सना ‘थार’ गाडीची भेट

मुक्तपीठ टीम   भारतीय संघाचा नवा वेगवान गोलंदाज टी नटराजनने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नटराजनशिवाय शुबमन गिल,...

Read more

लॉकडाऊन नाही, पण इशारा! टीका करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले!!

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रात सध्या तरी लॉकडाऊन नसणार. मात्र, जर परिस्थिती सुधारली नाही, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला नाही तर दोन...

Read more

ग्रामीण भागात अवघ्या साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुले

मुक्तपीठ टीम राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन २० नोव्हेंबर २०२० पासून...

Read more

“पुढील वर्षापासुन ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्कार देणार” – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुक्तपीठ टीम राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी व संस्थेस राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार...

Read more

ठळक बातम्या: १) शासनाच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ गेल्या कित्येक वर्षांपासून सुरळीत सुरू होता. मात्र, शासन आणि प्रशासनाच्या संगनमताने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमाने गव्हाच्या जागेवर निकृष्ट दर्जाचा मका देऊन गरिबांची थट्टा केली आहे, अशा अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महेश पवार यांनी केली आहे. २) औरंगाबादमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे दोघेही आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत हे आता हळूहळू सर्वसामान्य लोकांनाही कळू लागले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी होण्याऐवजी तो वाढत चालल्यामुळे औरंगाबादकरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. ३)  सांगली शहरातील राजवाडा चौक परिसरात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास  एका चहावाल्यासह काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान बिबट्या अद्यापही रॉकेल लाईन परिसरातील एका पडक्या घरात लपला असून वनविभागाकडून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सांगली शहरात बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली आहे. राजवाडा चौक याठिकाणी हा बिबट्या दबा धरून बसला असून त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. ४) पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये देशभरात बँका १५ दिवस बंद राहतील. महाराष्ट्रात पुढील महिन्यात बँका १० दिवस बंद राहतील.  त्यामुळे पुढील महिन्यात महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करायचे असतील तर बँका कधी सुरु आहेत आणि कधी बंद आहेत, हे माहिती असणे गरजेचं आहे. तुमची सर्व महत्त्वपूर्ण कामे वेळेत करुन घेण्यासही मदत होईल. येत्या २०२१- २२ (एप्रिल ते मार्च) आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस १ एप्रिल रोजी बँका बंद राहणार आहेत. ५) हापूस! कोकणचा राजा. जगाच्या बाजारपेठेत देखील हापूसला मोठी मागणी आहे.  पण, यंदा नैसर्गिक संकटांमुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्यानं अद्याप देखील अपेक्षित प्रमाणात हापूस बाजारपेठेत दाखल झालेला नाही. लांबलेला पाऊस, थंडीचं कमी प्रमाण, त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस यामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला. हे नैसर्गिक संकट कमी म्हणून की काय वाढत्या उष्णतेचा परिणाम आता हापूसवर झाला आहे. 

   

Read more

ठळक बातम्या : १) पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता केवळ एक दिवस उरला असून ३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड ला  आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद पडणार आहे. केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. २) राज्यात आणि मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. परिणामी मुंबई महापालिकेने कोरोनासंबंधी नवी गाईडलाईन जारी केली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत. कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत वॉर्ड वॉर रुम तयार करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांना थेट बेड न देण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली आहे.  ३) राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.  पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत ही जमावबंदी लागू आहे. २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध १५ एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.  मुंबईत जमावबंदीचे पालन काटेकोरपण केलं जात आहे. रात्री मुबंईत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. ४) करोनावर मेडिकलमध्ये (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने सोमवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकलच्या बेसमेंटमध्ये मागच्याच आठवड्यात सुरू झालेल्या वार्डात हा प्रकार घडला आहे. ५) जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा आज, मंगळवारी ३० मार्च होणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीतर्फे सोहळ्याची तयारी करण्यात आली असून, यंदा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. त्यामुळे देहू गावाच्या हद्दीत दोन दिवसांची संचारबंदी लागू असून, देऊळवाडा आणि गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Read more
Page 12 of 25 1 11 12 13 25

ताज्या बातम्या

error: Content is protected !!