Uncategorized

ग्रामीण भागात अवघ्या साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुले

मुक्तपीठ टीम राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन २० नोव्हेंबर २०२० पासून...

Read more

“पुढील वर्षापासुन ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्कार देणार” – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुक्तपीठ टीम राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी व संस्थेस राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार...

Read more

ठळक बातम्या: १) शासनाच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ गेल्या कित्येक वर्षांपासून सुरळीत सुरू होता. मात्र, शासन आणि प्रशासनाच्या संगनमताने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमाने गव्हाच्या जागेवर निकृष्ट दर्जाचा मका देऊन गरिबांची थट्टा केली आहे, अशा अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महेश पवार यांनी केली आहे. २) औरंगाबादमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे दोघेही आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत हे आता हळूहळू सर्वसामान्य लोकांनाही कळू लागले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी होण्याऐवजी तो वाढत चालल्यामुळे औरंगाबादकरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. ३)  सांगली शहरातील राजवाडा चौक परिसरात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास  एका चहावाल्यासह काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान बिबट्या अद्यापही रॉकेल लाईन परिसरातील एका पडक्या घरात लपला असून वनविभागाकडून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सांगली शहरात बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली आहे. राजवाडा चौक याठिकाणी हा बिबट्या दबा धरून बसला असून त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. ४) पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये देशभरात बँका १५ दिवस बंद राहतील. महाराष्ट्रात पुढील महिन्यात बँका १० दिवस बंद राहतील.  त्यामुळे पुढील महिन्यात महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करायचे असतील तर बँका कधी सुरु आहेत आणि कधी बंद आहेत, हे माहिती असणे गरजेचं आहे. तुमची सर्व महत्त्वपूर्ण कामे वेळेत करुन घेण्यासही मदत होईल. येत्या २०२१- २२ (एप्रिल ते मार्च) आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस १ एप्रिल रोजी बँका बंद राहणार आहेत. ५) हापूस! कोकणचा राजा. जगाच्या बाजारपेठेत देखील हापूसला मोठी मागणी आहे.  पण, यंदा नैसर्गिक संकटांमुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला असल्यानं अद्याप देखील अपेक्षित प्रमाणात हापूस बाजारपेठेत दाखल झालेला नाही. लांबलेला पाऊस, थंडीचं कमी प्रमाण, त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस यामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला. हे नैसर्गिक संकट कमी म्हणून की काय वाढत्या उष्णतेचा परिणाम आता हापूसवर झाला आहे. 

   

Read more

ठळक बातम्या : १) पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता केवळ एक दिवस उरला असून ३१ मार्चपर्यंत पॅन कार्ड ला  आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद पडणार आहे. केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. २) राज्यात आणि मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. परिणामी मुंबई महापालिकेने कोरोनासंबंधी नवी गाईडलाईन जारी केली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत. कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत वॉर्ड वॉर रुम तयार करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांना थेट बेड न देण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली आहे.  ३) राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.  पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत ही जमावबंदी लागू आहे. २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध १५ एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.  मुंबईत जमावबंदीचे पालन काटेकोरपण केलं जात आहे. रात्री मुबंईत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. ४) करोनावर मेडिकलमध्ये (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) उपचार घेत असलेल्या एका वृद्धाने सोमवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकलच्या बेसमेंटमध्ये मागच्याच आठवड्यात सुरू झालेल्या वार्डात हा प्रकार घडला आहे. ५) जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा आज, मंगळवारी ३० मार्च होणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायतीतर्फे सोहळ्याची तयारी करण्यात आली असून, यंदा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. त्यामुळे देहू गावाच्या हद्दीत दोन दिवसांची संचारबंदी लागू असून, देऊळवाडा आणि गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Read more

#मुक्तपीठ मंगळवारचे व्हायरल बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र मंगळवार, ३० मार्च २०२१   लॉकडाऊनविरोधात भाजपाशी राष्ट्रवादीची युती! उद्योगपती आनंद महिंद्रांचेही खडे बोल http://muktpeeth.com/ncp-nawab-malik-anand-mahindra-maharashtra-lockdown/  ...

Read more

गुन्हे महत्वाचे: 1) संबंधित विभाग आणि शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरीत्या कलांवतीण सुळक्यावर प्रबळगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची दीड फूड उंचीची व १२ किलो वजनाची सिंहासनावर बसलेल्या मूर्तीची स्थापना करून स्मारकाचे उद्धाटन केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2)बहिणीनेच भावाचा खून केल्याच्या या धक्कादायक प्रकाराने बहीण-भावाच्या पवित्र नात्याला एकप्रकारे कलंकच लावला आहे,’ असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच एका निकालात नोंदवले. पुण्यातील बावधनमधील डीएसके राणवारा सोसायटीमधील जगजितकौर निर्मलसिंग या बहिणीने जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात केलेले अपिल फेटाळून लावताना न्या. साधना जाधव व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. 3)पुण्यातील वारजे येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. 4)तुर्भे सेक्टर-२१ भागात राहाणाऱ्या आकाश बाळासाहेब शिंदे या तरुणाचा मृतदेह तुर्भे येथील तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मित्राला तुर्भे येथे सोडून बेलापूर येथे जात असल्याचे सांगून तो बाहेर पडला, मात्र गुरुवारी रात्रीपासून तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी तुर्भे येथील तलावात आढळून आला. आकाश तलावात पडला की त्याने आत्महत्या केली याबाबत एपीएमसी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 5)दापोली तालुक्यातील मुरुडमध्ये एका पोस्ट मास्तरने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. पोस्टमास्तर पूर्वी तुरे यांनी पोस्ट कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पूर्वी तुरे या मुळच्या दापोली तालुक्यातील हर्णेमधील मोठी गोडीबावच्या रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्रीपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. तेव्हा तपास केला असता पोस्ट कार्यालयात त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून आलं.

Read more

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या मंगळवार, ३० मार्च २०२१   पाहा व्हिडीओ: आज रोहिणी...

Read more

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिने नुकतेच काही मनमोहक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात तिने आपल्या अदा दाखवत चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली आहे. 2. अभिनेत्री मिथिला पालकरचा हा बोल्ड लूक सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती अलिबागमध्ये तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत सुट्टी एनजॉय करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. तर आता तिने या बोल्ड लूकचे फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे ती आणखीणच चर्चेत आहे. 3. ‘फिल्म फेअर’ हा सिनेसृष्टीतील प्रतिष्ठीत पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचे फिल्म फेअर साध्य करणे हे स्वप्न असते. सध्या २०२१च्या ६६व्या फिल्मफेअर पुरस्काराची घोषणा झाली. बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता इरफान खान यांना हा सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. 4. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील कमेंट केली आहे. अमिताभ यांनी कमेंट करताच त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. 5. सध्या सर्वत्र आरआरआर या सिनेमाची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे याची सगळीकडे चर्चा पसरली आहे.

Read more

#मुक्तपीठ सोमवारचे व्हायरल बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र सोमवार, २९ मार्च २०२१   'कोरोना निवडणूक गर्दी होणाऱ्या राज्यांमध्ये निष्प्रभ! महाराष्ट्रातच का धुमाकूळ?" मुंबईचे पालकमंत्री...

Read more
Page 12 of 23 1 11 12 13 23

ताज्या बातम्या

error: Content is protected !!