मुक्तपीठ टीम
आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ म्हणजे वर्षा जलसंचय अभियानाला सुरुवात झाली आहे. नेमके हे जलशक्ती अभियान आहे तरी काय, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न.
‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’
- नद्यांना जोडण्याचा राष्ट्रीय योजनेंतर्गत ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ हा पहिला प्रकल्प असणार आहे.
- देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान राबविले जाईल.
- “कुठेही पडेल, कधीही पडेल, पावसाचे पाणी जमा करायचे” असा या अभियानाचा नारा असणार आहे.
- हे अभियान २२ मार्चपासून ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत चालणार आहे.
- प्रत्येक गावात या अभियानाला जनआंदोलन म्हणून राबविली जाईल. त्यामाध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग सुनिश्चित केले जाईल. ज्यामुळे भूजल पातळीत सुधारणा होईल.
Launching Catch the Rain movement on #WorldWaterDay. https://t.co/8QSbNBq6ln
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2021
गावागावात जल शपथ
या मोहिमेच्या शुभारंभानंतर निवडणूक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्यांतील सर्व जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा बैठक घेणार असून पावसाच्या पाण्याची साठवण करण्याबाबत चर्चा केली जाईल. ग्रामसभेच्या वतीने जल शपथ कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.
अभियानाची रुपरेषा
- या अभियानाअंतर्गत जलस्त्रोतांवरील अतिक्रमण हटविणे आणि त्यांची स्थिती सुधारण्याचे काम केले जाईल. जेणेकरून अधिक काळासाठी पाण्याचा साठा कायम राहिल. तसेच खराब बोअरवेल्स आणि सुकलेल्या विहिरी दुरूस्त केल्या जातील.
- तसेच सर्व कामांना मदत करण्यासाठी सर्व राज्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात रेन सेंटर्स सुरू केले जातील.
- या रेन सेंटर्सचा मोबाइल नंबर लोकांना देण्यात येईल.
- प्रत्येक केंद्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमचे तज्ज्ञ असतील जे लोकांना तांत्रिक माहिती देतील.
- सर्व शहरांमधील सर्व इमारतींच्या छतावर आरडब्ल्यूएच (रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम) स्थापित केले जाईल.
- यामुळे शहरी भागातील भूजल पातळी वाढेल आणि रस्त्यांवरील पाणी साचण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळेल.
- या मोहिमेत सर्व जिल्हा दंडाधिकारी, आयआयएम, आयआयटी, केंद्रीय विद्यापीठे, खासगी विद्यापीठे, रेल्वे अध्यक्ष, विमानतळ प्राधिकरण, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, केंद्रीय सशस्त्र दलाचे डीजी यांच्याकडून मदत घेतली जाईल.
- कॅच द रेन मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असेल.