मुक्तपीठ टीम
सध्या दहावी- बारावीच्या परीक्षा सुरू असून त्यानंतर प्रवेशाची लगबग सुरू होते. प्रवेशासाठी जात प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रे काढण्यासाठी अडचणी येत असतात हीच समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र तर्फे तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्रे काढले असून त्याचे वितरण करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रम २४ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थित होणार असून या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष ॲड. अकरमखान पठाण यांनी केले आहे.
बदनापूर तालुका शैक्षणिकदृष्टया मागास म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील शिक्षणाला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र तर्फे तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशात अडचण येऊ नये म्हणून जात प्रमाणपत्रे मोफत काढून देण्यात येतात. या पूर्वीही महाराष्ट्र तेली परिषदेतर्फे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षी मोफत जात प्रमाणपत्र काढून ते वितरीत करण्यात येतात. या वर्षीही हा हकार्यक्रम २४ मार्च रोजी सकाळी १० वाजता पोलिस ठाण्याशेजारी, बदनापूर येथे होणार असून या कार्यक्रमाच्या उदघाटक उपविभागीय अधिकारी संदीपान सानप असणार असून अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू हे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जात पडताळणी समितीचे सचिव प्रदीप भोगले, तहसीलदार रमेश मुंडलोड, गटविकास अधिकारी व्ही. आर. हरकळ, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, दैनिक पार्श्वभूमीचे संपादक दिलीप राठी, विधिमंडळ व मंत्रालय संपादक-पत्रकार संघाचे सरचिटणीस तथा रामविचारचे संपादक विजय सकलेचा, प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तथा दैनिक तुफान लोकशाहीचे संपादक इलियास खान, निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर, नूर हॉस्पीटलचे डॉ. इलियास सर, प्रेस कॉन्सील महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दिपक शेळके, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, सेवा निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी सी. डी. शेवगन, दैनिक आनंदनगरीचे संपादक रवींद्र बांगड, नगराध्यक्षा मंगलताई बारगाजे, भारतीय स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक प्रितम शिंगाडे, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, सी. ए. गोवींद मुंडदा, प्रसिध्द व्यापारी राजेंद्र तापडीया, मौलाना नदीम मुफती, प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रचे जालना सरचिटणीस महेश जोशी, उपाध्यक्ष सय्यद रफीक अली, साप्ताहिक एकांतचे सपांदक सय्यद रफिक आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला जात प्रमाणपत्रधारकांसह मुस्लीम तेली परिषदेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व मुस्लिम तेली समाजबांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष तथा विधिमंडळ व मंत्रालय संपादक-पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲड. अकरमखान पठाण यांनी केले आहे.
जात प्रमाणपत्र शिबिराचा लाभ घ्यावा : डॉ. पाथ्रीकर
उच्च शिक्षणासाठी व व्यवसायिक शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. जेणे करून तुम्हाला शिक्षणामध्ये सवलती मिळत असतात त्यामुळे जात प्रमाणपत्र शिबिरे होऊन तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना याचा उचित लाभ मिळावा म्हणून जात प्रमाणपत्र शिबिरांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन जास्तीत जास्त प्रमाणपत्रे काढावी, असे प्रतिपादन निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी केले आहे.